Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Alliance Air: आर्थिक संकटात सापडलेल्या अलायन्स एअरला संजीवनी, केंद्र सरकार 300 कोटींची मदत करणार

Alliance Air: एअर इंडियाची टाटा ग्रुपला विक्री केल्यानंतर केंद्र सरकारकडे अलायन्स एअर ही विमान कंपनी आहे. मात्र ही कंपनी देखील प्रचंड तोट्यात आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अलायन्स एअरला 447.76 कोटींचा तोटा झाला होता. मागील काही महिन्यांपासून अलायन्स एअरला आर्थिक चणचण सोसावी लागत आहे.

Read More

MG Motor मध्ये हिस्सेदारी घेण्यास रिलायन्ससह अनेक भारतीय कंपन्या उत्सुक

चीन-भारत संबंध सीमावादामुळे बिघडले आहेत. त्यामुळे चिनी MG Motor कंपनीला भारतामध्ये निधी उभारण्यात अडचणी येत आहेत. कंपनीने आता भारतीय उद्योगाला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्ससह अनेक बड्या कंपन्यांसोबत बोलणी सुरू आहे. पाच हजार कोटी उभारून कंपनीला भारतात उद्योगाचा विस्तार करायचा आहे.

Read More

Go First Crises: 'गो फर्स्ट'ची दिवाळखोरीची याचिका अखेर राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दाखल

Go First Crises:वाडिया ग्रुपच्या 'गो फर्स्ट' या विमान कंपनीने सादर केलेली दिवाळखोरीची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (NCLT) दाखल करुन घेतली आहे. लवादाने अभिलाष लाल यांची इंटरिम रिझोल्युशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती केली आहे. 'गो फर्स्ट'वर 6521 कोटींचे कर्ज आहे. आर्थिक चणचण असल्याने कंपनीने 19 मे 2023 पर्यंत विमान सेवा खंडीत केली आहे.

Read More

Physics Wallah Investment: यूपीएससी कोचिंगमध्ये उतरणार फिजिक्सवाला, 100 कोटींची गुंतवणूक करणार

Physics Wallah Investment:देशात यूपीएससी आणि राज्य पातळीवरील लोकसेवा आयोगाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहता एड्युटेक स्टार्टअप्स म्हणून नावारुपाला आलेल्या 'फिजिक्सवाला'ने (Physics Wallah) आता या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीएससीशीसंबधित कंटेट तयार करुन तो विविध भाषांमध्ये वितरित करण्याचे नियोजन 'फिजिक्सवाला'ने केले आहे.

Read More

Corporate Bond: कॉर्पोरेट बाँडची संख्या रोडावली; कंपन्यांकडून निधी उभारणी संथ गतीने सुरू

कॉर्पोरेट कंपन्यांनी एप्रिल महिन्यात रोख्यांद्वारे (बाँड्स) कमी निधी गोळा केला. मार्च महिन्यामध्ये कॉर्पोरेट बाँड इश्यू करण्याचे प्रमाण तुलनेने जास्त होते. कंपन्यांना निधीची गरज कमी भासल्यामुळे बाँड इश्यू करण्याचे प्रमाण घटले, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. मागील काही दिवसांपासून आरबीआयने व्याजदरात मोठी वाढ केली आहे, त्यामुळे बाँडमधून मिळणारा परतावाही कमी झाला आहे.

Read More

Summer Products: अवकाळी पावसामुळे AC, कूलर, फ्रिजची विक्री रोडावली; FMCG कंपन्यांनाही फटका

AC, कूलर, रेफ्रिजरेटर तसेच आइसक्रीम, शीतपेयांना उन्हाळ्यात मोठी मागणी असते. मात्र, यंदा अवकाळी पावसाचा परिणाम उत्पादनांच्या मागणीवर झाला आहे. उत्तर भारतातील मार्केटवर अवकाळी पावसाचा सर्वाधिक परिणाम झाला. महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्याचा परिणाम ग्राहकोपयोगी वस्तू आणि FMCG उत्पादनांच्या विक्रीवर झाला.

Read More

Indian Roots American Soil: भारतीय कंपन्यानी 425,000 अमेरिकन नागरिकांना दिला रोजगार, भारतीय उद्योग परिसंघाचा अहवाल…

Confederation of Indian Industry च्या 'इंडियन रूट्स, अमेरिकन सॉइल' (Indian Roots American Soil) या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत 40 बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याचे म्हटले आहे. खरे तर भारतीय भांडवली बाजाराची घोडदौड दाखवणारा हा अहवाल आहे.

Read More

Media and Entertainment Industry:डिजिटल इंडियाला चालना, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राने ओलांडला 2 लाख कोटींचा टप्पा

Media and Entertainment Industry: जागतिक पातळीवर भारत झपाट्याने मिडीया अ‍ॅंड एंटरटेंन्मेंट इंडस्ट्रीजची मोठी बाजारपेठ म्हणून विकसित होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतीयांकडून सर्व प्रकारच्या कॉंटेटची मागणी वाढत आहे. यामुळे कोरोना संकटातून झपाट्याने सावरणारे क्षेत्र म्हणून मिडिया अ‍ॅंड एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीकडे बघितले जाते,

Read More

Go First Collapsed: 'गो फर्स्ट एअर'पूर्वी भारतातील 'या' प्रमुख एअरलाईन्सनी आर्थिक बेशिस्तीमुळे गाशा गुंडाळला होता

Go First Collapsed: डोईजड कर्जे आणि पुरवठादारांची देणी थकवणारी ‘गो फर्स्ट’ ही पहिलीच भारतीय विमान कंपनी नाही. कंपन्यांचे प्रवर्तक आणि व्यवस्थापनाच्या आर्थिक बेशिस्तीमुळे किंगफिशर एअरलाईन्स आणि जेट एअरवेज यासह अनेक एअरलाईन्सला यापूर्वी बिझनेस गुंडाळावा लागला होता.

Read More

Maharashtra Day 2023: थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्रच अव्वल, 22 वर्षांत राज्यात झाली 10 लाख कोटींची गुंतवणूक

Maharashtra Day 2023: परदेशी गुंतवणूकदारांसाठी मागील 22 वर्षात महाराष्ट्रच भारतातील पहिल्या पसंतीचे राज्य असल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2000 पासून 2022 या 22 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणुकीतून 1088502 कोटींची गुंतवणूक झाली आहे.

Read More

Sudan Crisis: सुदानमधील गृहयुद्धामुळं शीतपेय उद्योगावर परिणाम; पेप्सी, कोकाकोला कंपन्यांना कशाची वाटतेय भीती?

सध्या उन्हाळा सुरू आहे. पेप्सी, कोकाकोला या कंपन्यांसह इतरही अनेक कंपन्यांची शीतपेये तुमची तहान भागवत असतील. ही शीतपेय तयार करताना त्यात (gum arabic) डिंक वापरला जातो. याचे सर्वाधिक उत्पादन सुदान देशात घेतले जाते. मात्र, तेथे गृहयुद्ध सुरू आहे. जर युद्ध लांबले तर दुकानांतून कोलड्रिंक्स गायब होऊ शकतात.

Read More

Core sectors Growth: अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांमध्ये मरगळ; स्टील, सिमेंट, गॅससह 'या' क्षेत्रांना फटका

अर्थव्यवस्थेतील प्रमुख आठ मूलभूत क्षेत्रांच्या प्रगतीची आकडेवारी हाती आली आहे. सिमेंट, स्टील, कोळसा यासह इतर पाच उद्योगांची मार्च महिन्यातील कामगिरी कशी राहिली, हे सरकारने जाहीर केले आहे. फेब्रुवारी महिन्यापेक्षा मार्च महिन्यात आठ क्षेत्रांची सरासरी कामगिरी सुमार दर्जाची राहिली. औद्योगिक उत्पादनांची मागणी अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवत असते.

Read More