Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Falguni Nayar Net Worth: Nykaa च्या सर्वेसर्वा फाल्गुनी नायर पॉवर वुमनच्या यादीत त्या 89 व्या स्थानावर!

Falguni Nayar

Image Source : www.biz.crast.net.com

Nykaa सुरू करण्यासाठी फाल्गुनी नायर यांनी नोकरी सोडली.स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आता एका दशकानंतर, फाल्गुनी नायर यांनी फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2022 मध्ये 44 व्या क्रमांकावर पदार्पण केले आहे. साठ वर्षीय फाल्गुनी नायर यांची संपत्ती $2.2 अब्ज (रु. 182,244,517,600 ) इतकी आहे. जगातील पॉवर वुमनच्या यादीत त्या 89 व्या स्थानावर आहेत.

फाल्गुनी नायर यांनी 2012 मध्ये त्यांची बँकर म्हणून नोकरी सोडली आणि सौंदर्य आणि पर्सनल केयर उत्पादनांसाठी Nykaa हे ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू केले. कंपनीने 28 ऑक्टोबर 2021 रोजी आपली प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) उघडली. कंपनीत 53.5% भागभांडवल असलेल्या नायर, सूचीच्या दिवशी भारतातील सर्वात श्रीमंत स्व-निर्मित महिला अब्जाधीश बनल्या होत्या. कुठलीही उद्योगाची, उद्योगसमूहाची पार्श्वभूमी नसताना फाल्गुनी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

नायर या  Nykaa च्या चेअरपर्सन, CEO आणि MD आहेत . IIM अहमदाबाद मधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले,तर मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी. कॉम ही पदवी मिळवली. आपल्या कारकिर्दीची सुरुवात कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनीपासून त्यांनी केली. या कंपनीत त्या व्यवस्थापकीय संचालकपदापर्यंत पोहोचल्या. त्यानंतर नोकरी सोडून उद्योजकीय मार्ग स्वीकारण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

"व्यक्तिशः माझ्यासाठी 2012 मध्ये जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला आणि आज जी परिस्थिती आहे त्यात काही विशेष बदल नव्हता," मागीलवर्षी मनीकंट्रोलला दिल्या गेलेल्या एका खास मुलाखतीत त्या बोलत होत्या. “आम्ही एक विशेष असा ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत जो ग्राहकांच्या मनात दीर्घकाळ टिकेल आणि असा व्यवसाय उभा करू इच्छितो जो दीर्घकाळ टिकणारा असेल.”

यंदाच्या फोर्ब्स इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीतील 44 व्या क्रमांकावर आज त्या आहेत. मागीलवर्षीपेक्षा त्यांच्या संपत्तींत 3.17% वाढ झालेली पाहायला मिळते आहे. ही वाढ एकूण 68 मिलियन डॉलर इतकी आहे. आजघडीला त्या भारतातील पहिल्या 10 श्रीमंत महिला अब्जाधीशांपैकी एक आहेत. Nykaa च्या गुंतवणूकदारांमध्ये यूएस प्रायव्हेट इक्विटी दिग्गज TPG ग्रोथ तसेच अब्जाधीश हर्ष मारीवाला आणि हॅरी बंगा यांचा समावेश आहे. Nykaa, ज्याचा अर्थ 'स्पॉटलाइटमधील एक' असा आहे, नायका सध्या 4,500 हून अधिक ब्रँड्सची ऑनलाइन विक्री करत आहे तसेच संपूर्ण भारतभर 100 हून अधिक स्टोअर्सद्वारे ते आपला व्यवसाय चालवत आहेत.नायर यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये Nykaa सार्वजनिक केले आणि या प्रक्रियेत फाल्गुनी नायर या भारतातील सर्वात श्रीमंत स्वयंनिर्मित महिला उद्योजक बनल्या.त्यांना 2 जुळी मुलगी आणि मुलगा आहेत. दोघेही त्यांच्या आईला व्यवसायात हातभार लावत आहेत.

फोर्ब्सच्या मते, सावित्री जिंदाल (Savitri Jindal) या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत ज्यांची संपत्ती 16.5 अब्ज डॉलर आहे. विनोद राय गुप्ता, रेखा झुनझुनवाला, लीना तिवारी, दिव्या गोकुलनाथ, किरण मुझुमदार-शॉ आणि अनु आगा या यादीतील इतर महिला आहेत.