• 29 Jan, 2023 13:47

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Budget 2023 Expectation: सरकार पशु विमा योजना आणण्याच्या तयारीत, पशुपालन उद्योगाला मिळेल संजीवनी!

2023-24 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करू शकते. गेल्या वर्षी लाखो शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा लम्पी व्हायरसच्या (Lumpy Skin Disease) संसर्गाने मृत्यू झाला होता.या रोगाने पशुसंपत्तीचे मोठे नुकसान झाले होते. येत्या अर्थसंकल्पात सरकार पशु1 विमा आणण्याच्या तयारीत आहे.याद्वारे पाळीव पशूंचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल.

Read More

Budget 2023 Expectation: भरडधान्यांना विशेष प्रोत्साहन दिले जाईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे सरकारचे प्रयत्न

Union Budget 2023: मागील अर्थसंकल्पातच केंद्र सरकारने 2023 हे वर्ष ‘भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने जागतिक स्तरावर ‘भरडधान्य वर्ष’ (International Year Of Millets 2023) म्हणून घोषित केले आहे. या प्रस्तावाला 70 देशांचा पाठिंबाही मिळाला आहे.

Read More

Gratuity and Pension Rule: पेंशन आणि ग्रॅच्युइटी होऊ शकते बंद, सरकारचा मोठा निर्णय

Gratuity and Pension New Rule: सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा नियम आणला आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना कामाच्या बाबतीत कुठलीही दिरंगाई, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही याबाबत कडक इशारा दिला आहे. कर्मचार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास निवृत्तीनंतर त्यांना निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युइटी गमवावी लागू शकते.

Read More

Unemployment Allowance: छत्तीसगड सरकार देणार बेरोजगारांना विशेष भत्ता, महाराष्ट्रातही मागणीला जोर

Chhattisgarh News: ​​आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगढ सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महिन्याला 2500 रुपये बेरोजगार भत्ता जाहीर करण्यात आला आहे. या योजनेसाठी सरकार सध्या निकष, रक्कम आणि अर्थसंकल्पीय वाटप यावर काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Read More

Budget 2023 Expectation: सरकार देशातील स्टार्टअप उद्योगांना मोठे अर्थसहाय्य देण्याच्या तयारीत

केंद्र सरकार देशातील स्टार्टअप इकोसिस्टमला (Startup Ecosystem) अधिक बळकट करण्याच्या तयारीत आहे, येत्या अर्थसंकल्पात PLI बाबत घोषणा केली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

Read More

EPFO Higher Pension: 25,000 पेंशनधारकांना झटका, पेंशनची रक्कम कमी होणार!

उच्च पेंशन घेणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना चिंतेत टाकणारी एक बातमी आली आहे. EPFO च्या या निर्णयामुळे काही कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 5,000 रुपये किंवा 6,500 रुपये पगाराच्या आधारावर सुधारणा केली जाणार आहे. EPFO ने या परिपत्रकात EPS-95 च्या परिच्छेद 11(3) चा संदर्भ दिला आहे जो कर्मचाऱ्याच्या कमाल पेन्शनपात्र पगाराबद्दल आहे.

Read More

Budget 2023 Expectation: VRS घेणाऱ्यांना किती कर भरावा लागेल? जाणून घ्या काय आहेत शक्यता

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी, स्थानिक प्राधिकरण, राज्य सरकारी कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी, IIT, IIM, विद्यापीठ कर्मचारी आणि केंद्र, राज्य किंवा प्रांतिक कायद्यांतर्गत स्थापन झालेल्या कोणत्याही प्राधिकरणाच्या कर्मचार्‍यांना स्वेच्छानिवृत्तीवर (Voluntary Retirement Scheme) प्राप्त झालेल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर ही कर सूट मिळते येत्या आर्थिक संकल्पात या कर सवलतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More

Agriculture Infrastructure Fund: अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड ठरतोय वरदान, आतापर्यंत 30000 कोटी उभारले

Agriculture Infrastructure Fund: शेतात पिकाची कापणी झाल्यानंतर विक्री पर्यंतच्या सुविधांसाठी तयार केलेल्या व्यवस्थापनांसाठी अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड (Agriculture Infrastructure Fund) कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरला आहे. अॅग्रीकल्चर इन्फ्रा फंडातून 30000 कोटी उभारले आहेत.

Read More

Government Scheme : केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे? यामागील सत्य जाणून घ्या

देशातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजना (Government Scheme) राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना त्यांची माहिती द्यावी लागते. पण सायबर गुन्हेगार चुकीच्या माहितीच्या आधारे लोकांची फसवणूक करतात. अशाच एका बनावट योजनेचा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. त्यापासून सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

Agriculture News: शेती बियाणांच्या किंमती कमी होणार, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

केंद्र सरकारने येत्या वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी आता सरकारने मोठी योजना आखली असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त बियाणे मिळणार असून बियाणांची निर्यात देखील वाढणार आहे.

Read More

PM Kisan Samman Nidhi: केंद्र सरकारची शेतकऱ्यांना भेट, PM किसान योजनेत 6 ऐवजी मिळणार 8 हजार रुपये!

यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2023) केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या योजना घेऊन येऊ शकते. अशी अपेक्षा आहे की सरकार पीएम किसान सन्मान निधीमध्ये (PM Kisan Samman Nidhi) दरवर्षी मिळणारी रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपयांपर्यंत वाढवू शकते. संपूर्ण माहिती येथे वाचा...

Read More

Post Office Scheme: जाणून घ्या, पोस्टाच्या कोणत्या योजनेत एफडीपेक्षा ही सर्वाधिक व्याज मिळते

Post Office Scheme: तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, पण कुठे गुंतवणूक करायची हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर जाणून घ्या पोस्ट आॅफिससारख्या अनेक सुरक्षित अशा योजना आहेत, जिथे एफडीपेक्षा ही सर्वाधिक व्याज मिळते. या अनेक योजनेबाबत जाणून घेवुयात.

Read More