Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कमोडिटी

Onion Prices : कांद्याच्या किंमती वाढल्या, भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज

महाराष्ट्रात सामान्यतः वडापाव आणि भेळीसोबत कांदा देण्याची पद्धत आहे. बहुतांश ठिकाणी भेळीसोबत तर कांदा दिलाच जातो. मात्र आता कांद्याच्या किमती वाढल्या असल्याने भेळ प्रेमींना कोरडीच भेळ खावी लागत आहे. आधीच तेल, बेसन पीठ आणि इतर जिन्नस महागल्याने भाववाढ झालेला कांदा सध्या वडापाव आणि भेळीतून गायब झाल्याचे पाहायला मिळते आहे.

Read More

Basmati Rice Export : बासमती तांदळाची निर्यात रोडावली, किमती कमी करण्यासाठी सरकारच्या हालचाली

खरे तर बासमती तांदळाचे निर्यात दर वाढवल्यामुळे निर्यात काही प्रमाणात का होईना कमी होईल आणि देशांतर्गत पुरवठा कायम राहील असा सरकारचा अंदाज होता, मात्र निर्यात दर खूपच चढ्या भावाने ठरवल्याच्या तक्रारी केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

Read More

Wheat Price Hike : सणासुदीत महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सज्ज, खुल्या बाजारात 2.37 मिलियन टन गहू विकला

यंदा गव्हाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी निघेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर देशातील अन्नधान्य महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून गव्हाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने त्यांच्या अखत्यारीत असलेल्या गव्हाचा साठा खुल्या बाजारात विकला आहे.

Read More

Tomato prices crash : टोमॅटो पुन्हा रस्त्यावर; आवक वाढल्याने टोमॅटोला मिळतोय कवडीमोल दर

टोमॅटोचे दरही मोठ्या प्रमाणात घसरले असून शेतकऱ्यांच्या टोमॅटोला प्रति क्विंटल 100 ते 300 रुपये दर मिळत आहे. टोमॅटोसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवडाभरात टोमॅटोला 1 ते 3 रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे. तर राज्यातील इतर बाजार पेठेत टोमॅटोचे दर 3 ते 5 रुपये किलो आहे.

Read More

Milk Price Hike : मुंबईत दुधाच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ, महागाईने सामान्य नागरिक हैराण

मुंबईतील म्हशीच्या दुधाचा घाऊक दर आजपासून, म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून 85 रुपये प्रतिलिटरवरून 87 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई दूध उत्पादक संघाने केली आहे. दुध दरवाढीचे कारण आणि स्पष्टीकरण देखील दुध संघाने दिले आहे.

Read More

Rice Price : यावर्षी तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता,शेतकऱ्यांसाठी ICAR ने जारी केल्या सूचना

यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला देशभरात वरूण राजाने चांगलीच हजेरी लावली होती. मात्र गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. मागील वर्षी झालेल्या हवामान बदलामुळे आग्नेय आशियात ‘एल निनो’चा परिणाम जाणवू शकतो आणि आवर्षण परिस्थिती निर्माण होऊ शकते असा शास्त्रज्ञांनी आधीच अंदाज वर्तवला होता.

Read More

Food Inflation : ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे भाव नियंत्रणात राहावे म्हणून केंद्र सरकार करणार उपाययोजना…

ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे भाव वाढले तर सामान्य नागरिकांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागू शकते. यावर्षी देशांतर्गत झालेले साखरेचे उत्पादन, किरकोळ महागाईचा वाढता दर लक्षात घेता, केंद्र सरकारने काही खास उपापयोजना आखल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने मंगळवारी साखरेचा अतिरिक्त कोटा जारी करण्याची घोषणा केली आहे.

Read More

Ginger Price Hike : महागाई थांबेना! टोमॅटो आणि कांद्यानंतर अद्रक देखील महागली...

पुढचे काही दिवस ‘अद्रकवाली चाय’ पिताना तुम्हांला अधिक पैसे मोजावे लागू शकतील. याचे कारण म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे अद्रक उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा अद्रक शेतीमाल शेतात नासला आहे. पावसामुळे वेळेत अद्रक बाजारात पोहोचवण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

Read More

Inflation in India: देशातील किरकोळ महागाईचा दर 7.44%, भाज्या,कडधान्ये महागली…

देशातील किरकोळ महागाईच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ रोखणे गरजेचे असून त्यासाठी RBI आणि वित्त मंत्रालयाने उपापयोजना कराव्यात अशा सूचना वित्त विभागाच्या सल्लागार समितीने दिल्या आहेत. महागाईचा सर्वाधिक फटका हा आर्थिकदृष्या कमकुवत असलेल्या नागरिकांना बसतो, त्यामुळे त्यांचे जीवनमान बिघडू शकते असे समितीने म्हटले आहे.

Read More

Toor Dal : बापरे! 191 कोटींची तूर डाळ झाली खराब, फेकून द्यावी लागली कोटींची डाळ!

गोवा सरकारने खरेदी केलेली 1.91 कोटी रुपयांची तूर डाळ खराब झाली असून ती गाईगुरांना देखील खाण्यास योग्य नसल्याचे कॅगच्या अहवालात उघड झाले आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) चा 2021 चा अहवाल गुरुवारी राज्य विधानसभेत मांडण्यात आला, त्यात हा खुलासा करण्यात आला आहे.

Read More

Tomato Price Hike: टोमॅटोच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, आयातीची प्रक्रिया सुरु

केंद्र सरकार टोमॅटोच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसते आहे. यासाठी नेपाळमधून टोमॅटोची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. या आठवड्याच्या शेवटी नेपाळमधून टोमॅटोची पहिली खेप भारतात पोहोचेल असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

Read More

Food Inflation: पेरण्या कमी झाल्यामुळे डाळी महागणार! महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न

सरकारच्या पीक-पाहणी अहवालानुसार एकूण खरीप पिकातील कडधान्यांचा वाटा 11.3 टक्क्यांनी घटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.23 दशलक्ष हेक्टरने पेरणी घटली आहे. केवळ कडधान्येच नाही तर कापूस, मका, बाजरी आणि सोयाबीन या पिकांची पेरणी देखील रोडावली आहे. राज्यांबद्दल बोलायचे झाले तर कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात खरीप पिकांच्या लागवडीत घट झाली आहे.

Read More