• 07 Jun, 2023 23:35

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Credit Report Error: क्रेडिट स्कोअर रिपोर्टमधील चुकीची माहिती कशी दुरुस्त कराल?

आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. कार्ड पेमेंट, कर्जाचे हफ्ते किंवा इतर कोणतेही पेमेंट वेळेवर करायला हवे. बऱ्याच वेळा तुम्ही सर्व व्यवहार चोख करत असता तरीही तुम्ही अडचणीत येऊ शकता. क्रेडिट स्कोअर रिपोर्टमधील चुकीमुळे तुमचा स्कोअर खाली येऊ शकतो. त्यामुळे ही चूक कशी दुरूस्त करायची ते जाणून घ्या.

Read More

SBI Bank Update: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरधारकांना 30 जूनपूर्वी करावे लागेल 'हे' काम

SBI Bank Update: स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आणले आहे. हे अपडेट बँकेच्या लॉकरधारकांसाठी आहे. 30 जून 2023 पर्यंत बँकेच्या लॉकरधारकांना बँकेसोबत बँक लॉकर ऍग्रीमेंटची (Bank Locker Agreement) प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तसे आदेश आरबीआयने बँकांना दिले आहेत.

Read More

Bank Complaints: वर्षभरात बँकांकडे 1 कोटी तक्रारी; RBI च्या शिफारसी ग्राहकांना दिलासा देणार का?

बँकेकडे दरवर्षी साधारण 1 कोटी तक्रारी दाखल होत असतात. यातील बऱ्याच तक्रारी अनेक दिवस तशाच पडून राहतात. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या समितीने जलद तक्रारी सोडवण्यासाठी काही शिफारसी केल्या आहेत त्या पाहूया. बँका आणि इतर वित्तसंस्था आरबीआयद्वारे नियंत्रित केल्या जातात त्यांच्या कामातील सुधारणेसाठी या शिफारसी आहेत.

Read More

Highest Interest Rates On FD : देशातील 'या' सगळ्यात टॉपर 10 बँक एफडीवर देत आहेत सर्वाधिक व्याजदर

Highest Interest Rates On FD : सध्या सर्व बँकांमध्ये एफडीवर सर्वाधिक व्याज देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याची चढाओढ लागली आहे. त्यात देशातील टॉप 10 वर असलेल्या बँका देखील मागे राहील्या नाहीत. एसबीआय बँक पासून ते येस बँकेपर्यंत सर्वच बँकांनी एफडी संदर्भात वेगवेगळ्या ऑफर सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना देऊ केल्या आहेत.

Read More

Savings Account : महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या बचत खात्यावर कोणकोणत्या सुविधा मिळतात?

Savings Account : बचत खात्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, पगारदार वर्गासाठी वेगवेगळे बचत खाते ओपन करावे लागतात. प्रत्येक बचत खात्याचे नियम वेगवेगळे आहेत आणि त्यावर अनेक सुविधा देखील दिल्या जातात.

Read More

Bank of Baroda ICCW: एटीएम कार्ड नसेल तर नो टेंशन ! UPI स्कॅनद्वारे ATM मधून काढता येणार पैसे!

सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्वाची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदा (BoB) ने इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत आता ग्राहक UPI वापरून बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत. UPI द्वारे एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देणारी बँक ऑफ बडोदा ही बँक सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे.

Read More

Customer Services Standards : ग्राहकांच्या सेवेत कमतरता आढळली तर आता बँकांची खैर नाही, आरबीआयचे निर्देश काय?

Customer Services Standards : आरबीआयद्वारे नियंत्रित असलेल्या बँका आणि त्यांच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी. आरबीआयच्या माध्यमातून नियंत्रित असलेल्या बँका आणि संस्थांना त्यांच्या ग्राहकांना योग्य सेवा देणं बंधनकारक असणार आहे. नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय.

Read More

RBI MPC Meet: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची उद्या बैठक, रेपो दर 'जैसे थे'च राहणार

RBI MPC Meet: रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 6.50% इतका आहे. महागाई नियंत्रणासाठी मागील वर्षभरात आरबीआयने रेपो दरात 2.50% वाढ केली होती. त्याचे परिणाम आता दिसून आले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात महागाईचा पारा खाली आला. महागाईचा पारा कमी झाल्याने यंदाच्या पतधोरणात व्याजदर जैसे थेच ठेवण्याची शक्यताा जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Read More

KYC Update Fraud: केवायसी अपडेटच्या नावावर सायबर चोरांची लुटमार! अनोळखी नंबरवरून आलेली लिंक ओपन करूच नका!

नवनव्या तंत्रज्ञानाची समज नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालण्याची प्रकरणे समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका वृद्ध व्यक्तीची AnyDesk द्वारे फसवणूक झाली होती. असाच प्रकार आता दिल्लीतील एका ज्येष्ठ महिलेसोबत घडला आहे. AnyDesk च्या सहाय्याने सायबर चोरांनी या महिलेच्या कॉम्प्युटरचा स्क्रीन अॅक्सेस आणि OTP घेतला आणि तिच्या खात्यातून 1 लाख रुपयांची रक्कम लंपास केली.

Read More

Education Loan Scam: बंगळुरात शैक्षणिक कर्जातून 2000 विद्यार्थ्यांची फसवणूक, गिकलर्नच्या सीईओला अटक

Education Loan Scam: डेटा सायन्स कोर्ससाठी शैक्षणिक कर्ज मिळवून देतो असे आश्वासन देऊन गिकलर्नचा सीईओ श्रीनिवास याने 2000 विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे.श्रीनिवास याने प्रत्येक विद्यार्थ्याची किमान 2 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे बोलले जाते. या शैक्षणिक कर्जाच्या फसवणुकीतून 18 कोटींचा घोटाळा झाला आहे.

Read More

Free Laptop Scam: केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देतंय का? जाणून घ्या

स्कॅमर लोक इंटरनेटवर एक नवीन घोटाळा करतायेत. हे स्कॅमर लोकांना व्हाट्सॲपवर भारत सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे अशा आशयाचा मेसेज पाठवत आहेत. तसेच तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात असे देखील सांगितले जात आहे, जाणून घ्या नेमके काय आहे हे प्रकरण...

Read More

Fixed Deposit : 444 दिवसाच्या FD वर 'या' बँकेत मिळतोय उत्तम परतावा, जाणून घ्या व्याजदर किती?

Fixed Deposit : सध्या 444 दिवसांच्या FD बद्दल अधिक ऐकू येत आहे. ज्यामध्ये बँकेकडून भरपूर व्याजही दिले जात आहे. IDBI आणि BOI त्यांच्या गुंतवणूकदारांना FD वर जोरदार व्याज देत आहेत. ज्यामध्ये सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे व्याजदर आहेत.

Read More