Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shiv Nadar: अंबानी आणि अदानीनंतर देशातील सर्वात मोठे उद्योगपती आहेत शिव नडार, जाणून घ्या सविस्तर

Shiv Nadar

नुकतीच फोर्ब्सने भारतातील 100 श्रीमंतांची नवी यादी जाहीर केली आहे.फोर्ब्सच्या यंदाच्या यादीनुसार भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे 92 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. याआधी पहिल्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट झाल्यानंतर ते 68 अब्ज डॉलर्स संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेच असेल. परंतु अंबानी आणि अदानी यांच्यानंतर तिसरी व्यक्ती कोण आहे हे तुम्हांला माहिती आहे का? नसेल तर याबद्दल जाणून घ्या या लेखात…

नुकतीच फोर्ब्सने भारतातील 100 श्रीमंतांची नवी यादी जाहीर केली आहे.फोर्ब्सच्या यंदाच्या यादीनुसार भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे 92 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. याआधी पहिल्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट झाल्यानंतर ते 68 अब्ज डॉलर्स संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर आहेत शिव नडार

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत उद्योगपती शिव नडार. फारच कमी नागरिकांना त्यांच्याबद्दल माहिती आहे. HCL कंपनीचे सर्वेसर्वा असलेले शिव नडार हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 55 व्या क्रमांकावर आहेत आणि भारताचा विचार केल्यास ते तिसरे सर्वाधिक धनी भारतीय आहेत. त्यांच्या संपत्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर फोर्ब्सच्या यादीनुसार त्यांच्याकडे 28.9 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.मुळचे तामिळनाडू येथील रहिवासी असलेले शिव नडार सध्या दिल्लीत वास्तव्यात आहेत आणि तेथून ते आपल्या कंपनीचा संपूर्ण कारभार बघतात.

आयटी क्षेत्रात मानाचे स्थान 

भारतातील आयटी क्षेत्रात HCL कंपनीचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. तामिळ भाषेत प्राथमिक शिक्षण झालेल्या शिव नडार यांना माहिती तंत्रज्ञान विषयाचे पहिल्यापासून आकर्षण होते. आपल्या जवळच्या मित्रांच्या मदतीने त्यांनी 1976 साली एका छोट्याश्या जागेत एचसीएल कंपनीची स्थापना केली. आधुनिक तंत्रज्ञानात सुरु असलेले प्रयोग आणि त्याचा सामान्यांना होणारा त्याचा फायदा याबद्दल त्यांनी संशोधन केले आहे.

शिव नडार हे एक दानशूर उद्योगपती म्हणूनही ओळखले जातात. HCL कंपनी सध्या 60 पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत असून कंपनीत सध्या  225,000 पेक्षा जास्त कमर्चारी कार्यरत आहेत.

शिव नडार हे सामाजिक क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात कार्यरत असून त्यांनी सामाजिक कामासाठी शिव नाडर फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाउंडेशनच्या मदतीने ते समाजातील सुधारणावादी कामांना प्रोत्साहन देत असतात. मागील आर्थिक वर्षात त्यांनी 1.1 अब्ज डॉलर्स रुपयांचे दान केले आहे.