शॉपिंग मॉल्समध्ये विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री होते. काही वेळा उत्पादनांवर, वस्तूंवर सवलत देखील असते. शॉपिंग मॉल्समधील बहुतेक दुकाने फक्त किरकोळ व्यवसाय करतात, रस्त्यावरील किंवा इतर दुकानांमध्ये आपण ज्याप्रमाणे वस्तूचे भाव करतो. त्याप्रमाणे शॉपिंग मॉलमध्ये करता येत नाही. एमआरपीवर दिलेल्या किंमतीत आपल्याला वस्तू खरेदी करावी लागते. आपण येथे सौदेबाजी करू शकत नाही. आज मोठ्या उद्योजकांचे (Industry) शॉपिंग मॉल आहेत. त्यातून ते बक्कळ पैसा कमवत आहेत. तेव्हा शॉपिंग मॉल सुरु करायला किती पैसे लागतात? ते आज आपण पाहूया.
Table of contents [Show]
शॉपिंग मॉलचे बिझनेस मॉडेल
शॉपिंग मॉल अशी जागा आहे जिथे एक किंवा अधिक इमारती असतात. फॅशन, जीवनशैली, फूड, मनोरंजन आणि मुलांसाठी खेळ अशी शॉपिंग मॉलची एकंदरित रचना असते. इथे लोकांची एंट्री फ्री असते. शॉपिंग मॉलमध्ये जवळपास सगळ्या ब्रँड्सचे अधिकृत शोरूम, फ्रँचाइझ आणि थर्ड पार्टी व्हेंडर असोसिएशन असतं. आता तुम्ही विचार करत असाल की इथे लोकांना मोफत प्रवेश का मिळतो? पैशांशिवाय लोकांना इथे का जाऊ दिलं जातं? कारण जे आज इथे फुकट गेले आहेत, तेच लोक उद्या नक्कीच काहीतरी विकत घेतील.
मार्केट पोझिशनिंग म्हणजे काय?
मार्केट पोझिशनिंग ही शॉपिंग मॉल उघडण्याची पहिली पायरी आहे. शॉपिंग मॉल उघडण्यापूर्वी स्थान काय असेल? मॉलचे नाव काय असेल? टॅगलाइन काय असेल? यावर विचार करणे आवश्यक आहे. शॉपिंग मॉल उघडण्यासाठी एक मजबूत, कार्यरत योजना असावी लागते. जसे की मुख्य पुरवठादार, सुविधा, स्वच्छता, वीज बिल, मनुष्यबळ, अभियंते, सुरक्षा रक्षक अशा गोष्टींवर लाखो रुपये खर्च केले जातात, त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एक टीम ठेवावी लागते. यामध्ये व्यवस्थापक, कार्यालयीन कर्मचारी, कायदेशीर सल्लागार, विक्री आणि विपणन व्यवस्थापक, संगणक आणि नेटवर्क अभियंता यासारख्या लोकांची आवश्यकता असते.
मॉल उघडण्यासाठी किती खर्च येईल?
शॉपिंग मॉल कॉम्प्लेक्स उघडण्यासाठी किती खर्च येतो? हे पाहूया. शॉपिंग मॉल कॉम्प्लेक्स उघडण्यासाठी करोडो रुपये लागतात. तुम्हाला एखादी जागा पाहावी लागेल जी तुम्ही एकतर विकत घ्याल किंवा भाड्याने घ्याल आणि मग तुम्हाला ते बांधावे लागेल. मॉल तयार होण्यासाठी एक किंवा दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. शॉपिंग मॉल कॉम्प्लेक्स बांधल्यानंतर, इंटिरिअर डिझाइन करण्यासाठी खूप पैसे लागतात.
बँकेकडून कर्ज घेणे
शॉपिंग मॉल सुरु करण्यासाठी बँकेकडून कर्ज देण्यात येते. पण कोणतीही बँक तुम्हाला 100% कर्ज देत नाही, तेव्हा तुम्हाला बँकेकडून 70% कर्ज मिळेल आणि तुम्हाला 30% रक्कम स्वतः गुंतवावी लागेल. एसबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक या बँका तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज देतात, या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही खाजगी गुंतवणूकदाराकडून निधी घेऊ शकता किंवा तुम्हाला व्हेंचर कॅपिटलिस्ट देखील सापडू शकता. तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्हाला जाहिरात प्रचार मोहीम चालवावी लागेल जेणेकरून लोकांना कळेल की त्यांच्या शहरात एक नवीन मॉल सुरू झाला आहे, यामुळे तुमचे ग्राहक आणि इतर व्यावसायिक लोकांचे लक्ष वेधणे वेधणे सोपे होईल.
कंपनी रजिस्टर करा
शॉपिंग मॉल म्हणजे दुकान नाही, त्यामुळे भविष्यात तुम्हाला तुमची स्वतःची कंपनी रजिस्टर करावी लागेल, त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करा, ज्याच्या बॅनरखाली सर्व काम केले जाईल. व्यापार परवाना, अग्निसुरक्षा परवाना, इमारत विमा, स्थानिक प्राधिकरण महानगरपालिकेची परवानगी, प्रदूषण नियंत्रण मंडळ (NOC), जमीन आणि वन विभाग (NOC) आदिंची परवानगी मिळवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.