भारतीय कंपन्या आता देशोविदेशात कार्यरत आहेत. अमेरिकेत तर भारतीय कंपन्यांनी 425,000 पेक्षा अधिक रोजगार निर्मिती केली आहे. भारतीय कंपन्या आता सातासमुद्रापार त्यांचा विस्तार करताना दिसतायेत.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (CII) 'इंडियन रूट्स, अमेरिकन सॉइल' (Indian Roots American Soil) या नावाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात ही माहिती दिली गेली आहे. भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत 40 बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे. खरे तर भारतीय भांडवली बाजाराची घोडदौड दाखवणारा हा अहवाल आहे.
इंडियन रूट्स, अमेरिकन सॉइल
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने जाहीर केलेल्या या अहवालाला ‘इंडियन रूट्स, अमेरिकन सॉइल’ असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेत भारतीय कंपन्या काय काम करतात, कसे काम करतात, किती नफा कमावतात आणि किती गुंतवणूक करतात याची माहिती दरवर्षी प्रकाशित केली जाते.
"As many as 163 Indian companies have invested $40 billion in the US, thus creating nearly 425,960 jobs in the country. 'The Indian Roots, American Soil' survey report is a "snapshot in time," reflecting the compilation of 163 companies' self-reported data and does not attempt to…
— ANI (@ANI) May 4, 2023
अहवालानुसार अमेरिकेतील टेक्सास शहरामध्ये सर्वाधिक भारतीय गुंतवणूकदार कंपन्या कार्यरत असून तेथे मोठ्या प्रमाणात अमेरिकन कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. टेक्सास पाठोपाठ जॉर्जिया, न्यू जर्सी, न्यूयॉर्क आणि मॅसॅच्युसेट्स शहरांत भारतीय कंपन्यांनी रोजगार निर्मिती केली आहे.
यांतील बऱ्यापैकी रोजगार हे वर्क फ्रॉम होम (Work From Home) श्रेणीतील आहेत. गेल्या वर्षभरात भारतीय कंपन्यांनी टेक्सासमध्ये 20,906 रोजगार,वॉशिंग्टनमध्ये 14,525 रोजगार, न्यू जर्सीमध्ये 17,713 रोजगार, न्यूयॉर्कमध्ये 19,162 रोजगार निर्माण केले आहेत.
अमेरिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत 14 अब्ज डॉलर रुपयांची गुंतवणूक करून 72,000 रोजगार निर्मिती केल्याचे म्हटले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (CII) मात्र या आकडेवारीशी ते सहमत नसल्याचे म्हटले होते. अमेरिकन प्रशासनाने सर्वेक्षण करताना सर्व भारतीय कंपन्यांना विचारात घेतलेले नाही असे CII ने म्हटले आहे. तसेच CII ने जाहीर केलेली आकडेवारी ही अचूक असल्याचा दावा केला आहे.
कुठल्या क्षेत्रात पैसा गुंतवतायेत भारतीय कंपन्या
अमेरिकेत कार्यरत असलेल्या 155 भारतीय कंपन्यांच्या माहितीच्या आधारे CII ने हा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार 29% कंपन्या या जीवन विज्ञान (Life Science), फार्मा (Pharmaceutical) आणि आरोग्य सेवा (Health Service) क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती करत आहे. 21% कंपन्या आयटी (Information Technology) आणि दूरसंचार क्षेत्रात (Telecommunication), 18% कंपन्या उत्पादन क्षेत्रात (Production), 10% कंपन्या वित्त (Finance), कायदेशीर (Legal), लॉजिस्टिक (Logistic) आणि डिझाइन सेवा (Design Service), 5% कंपन्या ऑटोमोटिव्ह (Automotive) 4% कंपन्या अन्न आणि कृषी (Food and Agriculture), 3% कंपन्या पर्यटन (Tourism) आणि आदरातिथ्य (Hospitality) आणि 2% कंपन्या ऊर्जा क्षेत्रात (Power Sector) कार्यरत आहेत.
जगभरात आर्थिक मंदीचे सावट असताना, मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करायला सुरुवात केली आहे. अमेरिकेतील सार्वजनिक क्षेत्रातील बँका देखील डबघाईला येताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय कंपन्यांची परदेशात वाढत असलेली गुंतवणूक भारतीय भांडवली व्यवस्थेची सुस्थिती दर्शवणारी आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.