Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आपल्या समाजातील शेवटच्या घटकाला आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी सोप्या मराठी भाषेतून मार्गदर्शन मिळावे या हेतूने 'महामनी' वेबपोर्टलची स्थापना करण्यात आली आहे. 'महामनी' वेबपोर्टलच्या माध्यमातून आम्ही वस्तुनिष्ठ, अचुक आणि संशोधनावर आधारित माहिती देत आहोत.

आम्ही कोणताही आर्थिक किंवा व्यावसायिक सल्ला देत नसून सद्यस्थितीत सुरू असलेल्या आर्थिक घडामोडीशी संबंधित मार्गदर्शन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. 

मोठे आर्थिक निर्णय घेणे बऱ्याच जणांना कठीण वाटते. अशा लोकांसाठी नियमित बचत, गुंतवणूक, कर्ज व्यवस्थापन आणि आयुष्यातील आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्याचे मार्गदर्शन आम्ही देत आहोत.

डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या डिजिटल आर्थिक व्यवहारांचे प्रमाण हल्ली वाढत आहे. त्याचबरोबर डिजिटल व्यवहारात आर्थिक फसवणुकीच्या घटना देखील वाढत आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी आमच्या वेबपोर्टलवर विविध लेख आणि व्हिडीओ सादर केले जातात. 

बँका, विविध वित्तीय संस्था आणि सरकारी पातळीवर आर्थिक साक्षरतेचा प्रचार केला जात आहे. त्याला जोड म्हणून आणि सामाजिक जबाबदारीचे भान राखत आम्ही 'महामनी'च्या रुपात आर्थिक साक्षरतेची ही चळवळ सुरू केली आहे.

आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन आम्ही वित्तीय नियोजन, बजेट आणि बचत यांचा योग्य मेळ कसा घालता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत.

आम्ही कोणत्याही वित्तीय उत्पादन सेवेचे समर्थन करत नाही किंवा कोणताही वित्तीय सल्ला देत नाही. योग्य आणि अचूक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

या आर्थिक चळवळीत सहभागी होऊन आपल्या ज्ञानात भर घालण्याची इच्छा असणाऱ्यांनी आपली वैयक्तिक माहिती contact@mahamoney. com या ई-मेल वर पाठवावी.