Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Media and Entertainment Industry:डिजिटल इंडियाला चालना, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राने ओलांडला 2 लाख कोटींचा टप्पा

Ficci Frames 2023

Media and Entertainment Industry: जागतिक पातळीवर भारत झपाट्याने मिडीया अ‍ॅंड एंटरटेंन्मेंट इंडस्ट्रीजची मोठी बाजारपेठ म्हणून विकसित होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतीयांकडून सर्व प्रकारच्या कॉंटेटची मागणी वाढत आहे. यामुळे कोरोना संकटातून झपाट्याने सावरणारे क्षेत्र म्हणून मिडिया अ‍ॅंड एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीकडे बघितले जाते,

सिनेमा, OTT, ऑनलाईन गेमिंग या उद्योगांनी अर्थव्यवस्थेला कोरोना संकाटतून बाहेर काढण्यात मोठे योगदान दिले आहे. वर्ष 2022 मध्ये मिडिया आणि एंटरटेन्मेंट उद्योगाने 2 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यात डिजिटल मिडिया आणि त्यातून होणारा डेटा वापर आणि लाखो रोजगारांचा वाटा आहे. मुंबईत आयोजित केलेल्या फिक्की फ्रेम्स 2023 या वार्षिक परिषदेत मिडिया अ‍ॅंड एंटरटेन्मेंट उद्योगाच्या प्रगतीचा आढावा घेणाऱ्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अभिनेता आयुष्यमान खुराना याची विशेष उपस्थिती होती. (FICCI Frames 2023 Report on Media and Entertainment Industry)

जागतिक पातळीवर भारत झपाट्याने मिडीया अ‍ॅंड एंटरटेंन्मेंट इंडस्ट्रीजची मोठी बाजारपेठ म्हणून विकसित होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतीयांकडून सर्व प्रकारच्या कॉंटेटची मागणी वाढत आहे. यामुळे कोरोना संकटातून झपाट्याने सावरणारे क्षेत्र म्हणून मिडिया अ‍ॅंड एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीकडे बघितले जाते, असे मत अर्नेस्ट अ‍ॅंड यंगचे भारतातील प्रमुख आशिष फेरवानी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की वर्ष 2022 मध्ये भारतातील मिडिया अ‍ॅंड एंटरटेंन्मेंट इंडस्ट्रीजने 2 लाख कोटींची उलाढालीचा टप्पा पूर्ण केला. 2027 मध्ये ही इंडस्ट्री 3 लाख कोटी डॉलर्स पर्यंत वाढेल, इतकी यात क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. मागील वर्षात व्हिडिओ, ऑडिओ, टेक्स्ट अशा सर्वच प्रकारात वाढ झाली आहे. डिजिटल जाहिरातींची उलाढाल 1 लाख कोटींवर गेल्याचे फेरवानी यांनी सांगितले.

डेटाचा विचार केला तर दर महिन्याला भारतीयांकडून सरासरी 20 जीबी डेटा कन्झ्युम केला जातो. हे प्रमाण 2027 मध्ये सरासरी 46 जीबी इतके वाढेल असा अंदाज फिक्कीच्या मिडिया अ‍ॅंड एंटरटेन्मेंट इंडस्ट्री विभागाच्या प्रमुख आणि व्हायकॉम 18 च्या सीईओ ज्योती देशपांडे यांनी व्यक्त केला. स्मार्टफोन्सचा वापर, टीव्ही  आणि परवडणाऱ्या दरातील 5जी सेवा यामुळे भविष्यात डिजिटल इंडिया आकारास येईल. या उद्योगाची उलाढाल 2025 पर्यंत 2.86 लाख कोटींपर्यंत वाढेल, असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला. दोन ऑस्कर पुरस्कारांमुळे भारतातील मिडिया अ‍ॅंड एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीला आणि टॅलेंटची जागतिक स्तरावर दखल घेतल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

फिक्की फ्रेम्स 2023 परिषदेच्या उद्घाटनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले की, केंद्र सरकारने मनोरंजन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता मुंबईत पुढील वर्षभरात नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समधून विविध अभ्यासक्रम सुरु केले जातील, असे चंद्रा यांनी सांगितले. याशिवाय जुने सिनेमा आणि शॉर्टफिल्म यांचे डिजिटायझेशनची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. केंद्र सरकारकडून लवकरच एव्हीजीसी मोहीमेची घोषणा करेल, असे चंद्रा यांनी सांगितले.

मागील वर्षभरात मिडीया अ‍ॅंड एंटरटेंन्मेट उद्योगात झालेले बदल

  • 2022 मध्ये मिडिया अ‍ॅंड एंटरटेंन्मेटची उलाढाल 2.1 लाख कोटी, त्यात 20% वाढ
  •  कोव्हीड पूर्व काळाच्या तुलनेत ही उलाढाल 10% अधिक आहे. 
  • टीव्ही सबस्क्रिप्शन वगळता सर्वच क्षेत्रांत झाली वाढ
  • डिजिटल,VFX आणि ऑनलाईन गेमिंगचा निम्मा वाटा
  • 2025 मध्ये या उद्योगाची उलाढाल 2.83 लाख कोटींपर्यंत वाढणार 
  • 2025 पर्यंत 50 कोटी भारतीय ऑनलाईन गेम्स खेळतील
  • डेटाचा वापर वाढण्यात 5 जी सेवा महत्वाची ठरणार