जगातील सर्वात मोठी आणि नामांकित मोबाईल उत्पादक कंपनी नोकियाने त्यांच्या तब्बल 14,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एकदम तडकाफडकी कंपनीने घेतलेल्या या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कंपनीचा महसूल मंदावला असून, स्मार्टफोनची म्हणावी तितकी अपेक्षित विक्री होत नसल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी थेट 20% कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीतील सुमारे 14,000 कर्मचाऱ्यांना आपला रोजगार गमवावा लागणार आहे.
किती महसूल घटला?
कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीच्या अहवालात कंपनीचा एकूण 20% महसूल कमी झाला असल्याचे म्हटले आहे. तसेच पैशाच्या रुपात बोलायचे झाले तर कंपनीला गेल्या तिमाहीत 4.98 बिलियन युरोचे नुकसान झाले आहे असे कंपनीने म्हटले आहे.
#Nokia on Thursday said it would cut up to 14000 jobs as part of a #costreduction plan following a plunge in 3rd-quarter earnings
— Digital Startup (@digitalstartup5) October 19, 2023
Nokia said that it will reduce its cost base and increase operation efficiency to “address the challenging market environment" https://t.co/3jdTmMiIqR
म्हणजेच काय तर कंपनीला झालेल्या तोट्याची कसर भरून काढण्यासाठी कंपनीने त्यांचा खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तब्बल 14,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक बाजारपेठेत मंदी
सध्या जागतिक पातळीवर सुरु असलेल्या आर्थिक घडामोडींचा परिणाम कंपनीच्या विक्रीवर झाला असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याशिवाय सध्या अनेक प्रतिस्पर्धी कंपन्या मोबाईल उत्पादन क्षेत्रात उतरल्या आहेत. नवनवीन तंत्रज्ञान रोज विकसित होत आहे, आपल्या ग्राहकांना त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, नवीन तंत्रज्ञान असलेले मोबाईल उपलब्ध करून देण्यासाठी देखील कंपनी प्रयत्न करणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.