Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिप्टो

एलीटकॉन इंटरनॅशनलचा जबरदस्त प्रवास: ₹1 वरून ₹184 पर्यंत झेप, कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक

स्मॉल-कॅप कंपनी एलीटकॉन इंटरनॅशनलने गुंतवणूकदारांना अफाट परतावा दिला आहे. पाच वर्षांत शेअर ₹1 वरून ₹184 पर्यंत झेपावून 13,600% पेक्षा जास्त वाढ झाली. एका वर्षातच स्टॉकने ५,६००% परतावा दिला आहे. कंपनीने कृषी क्षेत्रात विस्तार करत लँडस्मिल अ‍ॅग्रो व सनब्रिज अ‍ॅग्रो या दोन कंपन्यांमध्ये मोठा हिस्सा विकत घेतला. या अधिग्रहणामुळे FMCG व कृषी व्यवसायात कंपनीची ताकद वाढणार असून गुंतवणूकदारांच्या दृष्टीने

Read More

क्रिप्टो बाजारात मोठ्या प्रमाणावर बदल: इथेरियमने केली तेजी, बिटकॉइनला झटका

गेल्या आठवड्यात क्रिप्टो बाजारात लक्षणीय अस्थिरता दिसली. इथेरियमने जवळपास चार वर्षांचा उच्चांक गाठला, तर बिटकॉइनच्या किमतीत घट झाली.

Read More

Crypto Scam: अमेरिकेत 35 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक,OneCoin क्रिप्टो संस्थापकाला 20 वर्षांचा कारावास

Crypto Scam: वनकॉईन क्रिप्टो दिवाळखोरीत निघाली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे मातीमोल झाले.वर्ष 2014 ते 2016 या काळात बनावट क्रिप्टोंच्या विक्रीतून हा घोटाळा करण्यात आला. याबाबत वनकॉईनचा संस्थापक कार्ल सेबास्टीन ग्रीनवुड याला अमेरिकेतील न्यायलयाने दोषी ठरवले असून 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

Read More

Crypto Fraud: क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी इडीकडून 20 जणांना अटक; अकराशे कोटींची मालमत्ता जप्त

क्रिप्टो करन्सी व्यवहारात अनियमितता आढळून आल्याने सक्तवसुली संचालनालयाने 20 जणांना अटक केली. तर अकराशे कोटी मालमत्ता जप्त केली. मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

Read More

Crypto Price Today: बिटकॉईनची किंमत 30,000 डॉलरवर, तर XRP, Cardano मध्ये 5 टक्क्यांनी वाढ

Crypto Price Today: क्रिप्टो मार्केटमधील मागील 24 तासातील उलाढाल पाहता क्रिप्टोमधील सर्वांत महागडे कॉईन बिटकॉईन 30,000 डॉलरच्या खाली आला होता. पण त्याने त्यानंतर पुन्हा एकदा आपला 30,000 डॉलरचा टप्पा गाठला आहे. बिटकॉईनप्रमाणेच इथेरिअम ही करन्सीसुद्धा 1,900 डॉलरच्या खाली होती.

Read More

Binance layoff: क्रिप्टो जायंट बायनान्स कंपनीकडून 1 हजार कर्मचारी कपात

क्रिप्टो जायंट बायनान्स कंपनीने 1 हजार कर्मचारी कपात केल्याची माहिती पुढे आली आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी अडचणीत आली असून अमेरिका सरकारने गैरव्यवहार प्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतातील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही या नोकरकपातीचा फटका बसला आहे.

Read More

Tax On Crypto Currency: क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केलीय! तुम्हाला भरावा लागेल टॅक्स, किती तो जाणून घ्या

Tax On Crypto Currency: आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये क्रिप्टो करन्सीशीसंबधित ज्या गुंतवणूकदारांनी उत्पन्न मिळवले आहे अशांना आयकर रिटर्न भरताना क्रिप्टो करन्सीमधून मिळालेल्या उत्पन्नाचा तपशील सादर करावा लागेल. हे उत्पन्न भांडवली नफा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.

Read More

Crypto Price Update: बिटकॉईनमध्ये 1.53 टक्के तर इथेरिअममध्ये 1.86 टक्क्यांची घसरण

Cryptocurrency Price Update: क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मागील 24 तासात मोठ्या प्रमाणात अपडाऊन झालेले दिसून आले आहे. यामध्ये बिटकॉईन ही नेहमीच ट्रेंडिग राहिलेली क्रिप्टोकरन्सी आहे. पण यामध्येही गेल्या 24 तासात 1.53 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

Read More

Crypto Price: बिटकॉईन 4 टक्क्यांच्या घसरणीसह 27,000 डॉलरच्या खाली; टॉप-10 पैकी 8 करन्सी रेड झोनमध्ये

Crypto Price Fall: क्रिप्टो मार्केटमध्ये आज (दि. 12 मे) टॉप-10 क्रिप्टोकरन्सीपैकी 8 करन्सी रेड झोनमध्ये दिसून आल्या आहेत. एकूण क्रिप्टो मार्केटमध्ये गेल्या 24 तासांत 2.60 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Read More

Tax On Crypto: क्रिप्टो कर भरणे झाले सोपे! वझीरएक्स आणि टॅक्सनोड्स यांच्यात भागीदारी

Tax On Crypto: नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, क्रिप्टो वापरण्याच्या बाबतीत भारत पहिल्या दहा देशांमध्ये आहे. क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्स आणि तज्ज्ञांच्या सहाय्याने आयकर फाइलिंगसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारे टॅक्सनोड्स यांच्यातील भागीदारीमुळे गुंतवणूकदारांना त्यांचे क्रिप्टो कर भरणे सोपे करेल.

Read More

Bittrex Crypto exchange: क्रिप्टो मार्केटमध्ये पुन्हा भूकंप; Bittrex एक्सचेंजकडून दिवाळखोरी अर्ज दाखल

2022 मध्ये जगातील सर्वात मोठा क्रिप्टो एक्सचेंज FTX दिवाळखोरीत निघाला होता. त्यानंतर आता पुन्हा क्रिप्टो मार्केटला हादरा बसला आहे. अमेरिकेतील Bittrex क्रिप्टो एक्सचेंजने सरकारकडे दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला आहे. अमेरिकेतील क्रिप्टो गुंतवणूकदारांचे पैसे यामुळे अडकून पडले आहेत.

Read More

Cryptocurrency Regulation: क्रिप्टोकरन्सीवर G20 बैठकीत चर्चा व्हावी, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची अपेक्षा

क्रिप्टोकरन्सीवर अद्याप जागतिक स्तरावर कोणतेही धोरण नाही. मागील काही वर्षात क्रिप्टो मार्केट अनेक वेळा कोलमडले आहे. त्यामुळे G20 बैठकीत याबाबत सखोल चर्चा व्हावी अशी अपेक्षा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केली आहे. IMF आणि FSB कडून क्रिप्टोवर टेक्निकल पेपर सादर करण्यात येणार आहे. या पेपरच्या आधारे पॉलिसी तयार केली जाऊ शकते.

Read More