Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Apple India Store: अॅपल भारतीय मार्केट कसं काबीज करणार? CEO टीम कूक यांच्या भेटीचे संकेत काय सांगतात?

मुंबईतील बिकेसी येथे उद्या (18 एप्रिल) आणि दिल्लीतील साकेत येथे 20 तारखेला अॅपलची स्वत:ची दोन रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला Apple चे सीइओ टीम कूक हे देखील उपस्थित राहतील, अशी माहिती समोर येत आहे. भारतातील प्रिमियम गॅझेट बाजारपेठ काबीज करण्याचे नियोजन कंपनीने आखले आहे. सोबतच अॅपल निर्मिती प्रकल्पही उभे राहत आहेत. पुढील काही वर्षात अॅपलचा भारतातील प्रवास कसा असेल, जाणून घ्या.

Read More

IT Industry Lay-Off : यंदा आयटी कर्मचाऱ्यांची पगार वाढ होणार की नाही

IT Industry Lay-Off : गेल्या अनेक दिवसांपासून आयटी क्षेत्रात मंदीचे वारे सुरु आहेत. अनेक मोठ-मोठ्या आयटी कंपन्यांनी प्रचंड प्रमाणात कर्मचारी कपात केलेली आहे. या तिमाहीत देखील आयटी क्षेत्राची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी दिसून आली. या सगळ्याचा या क्षेत्रातल्या नोकर भरतीवर नेमका काय परिणाम होईल, पाहूया...

Read More

Advertising in Sport Event: मोठ्या स्पोर्ट्स इवेंटमध्ये कोट्यवधींची उलाढाल; जाहिरातींमागील अर्थकारण समजून घ्या?

क्रीडा स्पर्धांमध्ये जाहिरात करण्यासाठी कंपन्या पाण्यासारखा पैसा खर्च करतात. एकाच वेळी कोट्यवधी नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी अशा इव्हेंटचा कंपन्या पुरेपुर फायदा करून घेतात. यामागे मोठी आर्थिक उलाढाल असते. जी सर्वसामान्य नागरिकाच्या लक्षात येत नाही. खेळांच्या स्पर्धांसोबत जाहिरातींतून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध ब्रँड्समध्येही स्पर्धा लागलेली असते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Read More

India - China Trade : भारत आपली सर्वाधिक आयात 'या' देशातून करतो

India - China Trade : अरूणाचल प्रदेश व लडाख भागातील सीमावादानंतरही चीनचा भारताचा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. तरी चीनकडून मागवल्या जाणाऱ्या या वस्तुच्या आयातीचे प्रमाण कशा पद्धतीने कमी करता येईल यासाठी केंद्र सरकार विविध पाऊले उचलण्याच्या प्रयत्नात आहे.

Read More

Vaidyanath Sugar Factory : पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर जीएसटीची धाड, काय आहे प्रकरण?

Vaidyanath Sugar Factory : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतल्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर गुरुवारी GST विभागाची धाड पडली. या कारखान्याने 12 कोटी रुपयांचा GST थकवल्याचा आरोप या कारखान्यावर आहे. एरवी ED आणि इतर केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांवर वचक बसवण्यासाठी होतो असा आरोप होतो. पण, इथं भाजपच्याच एका नेत्या रडारवर आहेत. त्यामुळे राजकीय वातावरणही तापलंय. आपण पाहूया हे प्रकरण नेमकं काय आहे...

Read More

Dairy products : डेअरी प्रॉडक्ट्सची आयात तूर्तास नाही, सरकारचा मोठा निर्णय!

Dairy products : देशात दुग्धजन्य पदार्थांची आयात होणार नाही, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आलीय. सध्या देशात दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर हे पदार्थ आयात करणार असल्याच्या बातम्या मागच्या काही काळापासून येत होत्या. यावर आता खुद्द संबंधित खात्याच्या मंत्र्यांनीच स्पष्टीकरण दिलंय.

Read More

Income Tax Evasion: अमेरिकेत बँकिंग संकट ताजे असताना भारतातही घोटाळा? करचुकवेगिरी प्रकरणी HDFC, PolicyBazaar ला नोटीस

बँकिंग आणि विमा क्षेत्रामधील आघाडीच्या कंपन्यांकडून वस्तू व सेवा कर चुकवेगिरी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी GST intelligence विभागाने HDFC Bank, Policy Bazaar, Go Digit या विमा कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. अमेरिका आणि युरोपात बँकिंग क्षेत्र संकटात सापडले असताना भारतीय बँकिंग क्षेत्रातही अनियमितता आढळून येत आहे.

Read More

Growth In Passenger Vehicle Sale: नोकरी करण्याऐवजी भारतीयांची व्यवसायास पसंती; प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ

Growth In Passenger Vehicle Sale: भारतात व्यवसायासाठी उत्तम व्यासपीठ तयार झाले आहे. नोकरी सोडून लोक व्यवसायाची उभारणी करत आहेत, यामुळे देशातील प्रवासी व व्यावसायिक वाहनांची विक्री वाढली आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीचे यावर्षीचे आकडे काय स्पष्ट करतात ते जाणून घेऊ

Read More

Infosys Q4 Result: इन्फोसिसकडून गुंतवणूकदारांची निराशा; Q4 मध्ये अपेक्षेपेक्षा कमी नफा नोंदवला

इन्फोसिस कंपनीने काल (गुरुवार) चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. कंपनीने तिसऱ्या तिमाहीपेक्षा कमी नफा नोंदवला. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत 6% जास्त नफा कमावला. विश्लेषक आणि गुंतवणूक संस्थांनी इन्फोसिस हाती आलेल्या आकडेवारीपेक्षा जास्त नफा कमवेल, असा अंदाज बांधला होता. मात्र, तसे घडले नाही. सोमवारी याचे नकारात्मक पडसाद कंपनीच्या शेअर्सवर दिसू शकतात.

Read More

Apple Store in Mumbai: तब्बल 22 टॉप ब्रॅंड्सला Apple Store च्या आसपास फिरकण्यास बंदी, काय आहे प्रकरण वाचा

Apple Store in Mumbai: मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवळपास 22 ब्रँड्सला अॅपल स्टोअरच्या जवळपास नवीन स्टोअर सुरु करता येणार नाही. एका कायदेशीर करारानुसार हे सगळं घडणार आहे. एवढंच नाही तर स्टोअरच्या आसपास प्रतिस्पर्धी कंपन्या जाहिरातीचे फलक लावू शकणार नाहीत.जाणून घेऊयात कायद्यात अशा प्रकारची तरतूद आहे का?

Read More

IndiGo Summer Offer: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर इंडिगोची स्पेशल सवलत

IndiGo Offer: इंडिगो एअरलाईन्सने उन्हाळी हंगामातील प्रवासासाठी एक ऑफर आणली आहेत. या ऑफरमध्ये देशांतर्गत व आंतराष्ट्रीय प्रवासाचे तिकीट बुकिंग केल्यास 750 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. प्रवाशांनी कूपन कोडवर तिकीट खरेदी केल्यास ही सवलत मिळणार आहे.

Read More

TCS Q4 Results: आयटी जायंट टीसीएसने Q4 मध्ये नोंदवला नफा; गुंतवणूकदारांनाही लाभांश देऊन केले खूश

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस (TCS) कंपनीने काल (बुधवार) चौथ्या तिमाहीतील निकाल जाहीर केला. TCS ने 11,392 कोटीं रुपये नफा नोंदवला. नफ्याची आकडेवारी जाहीर करण्याबरोबरच कंपनीने प्रति शेअर लाभांशही देऊन गुंतवणूकदारांना खूश केले. टीसीएसने प्रति शेअर 24 रुपये डिव्हिडंड जाहीर केला.

Read More