• 04 Oct, 2022 15:22

FirstRays Ventures Private Limited हे सध्याच्या आधुनिक डिजिटल क्षेत्रात दमदारपणे वाटचाल करण्यासाठी आम्ही टाकलेलं पाऊल आहे. डिजीटलायझेशनच्या क्षेत्रात विविध रंजक कल्पनांचा वापर करून त्यात नाविन्यपूर्ण पध्दतीने गुंतवणूक कारण्याचा आमचा मानस आहे. समाजासाठी सर्वोत्तम देणं हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो. समाजाच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येकाने काहीतरी केले पाहिजे; यावर आमचा ठाम विश्वास आहे. कारण समतोल विकास साधण्याचा हा एकमेव आणि शाश्वत मार्ग आहे.

FirstRays Ventures Private Limited आपल्या समाजाला वर्तमान आणि भविष्यात सक्षमपणे पुढे नेणारा दिशादर्शक आहे. ‘महामनी’ सोशल मिडिया वेबपोर्टल हे त्याचेच प्रतिबिंब आहे. आम्ही आमच्या मूळ तत्त्वांशी कटिबद्ध राहून विविध कल्पनांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही फक्त एक नवीन डिजिटल कंपनी नसून समाजाच्या प्रगतीचे एक ‘कारण’ आहोत. बदलत्या डिजिटल जगताशी सुसंगत राहून मराठी भाषिक समाजातील तळागाळातील सर्व घटकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी MahaMoney.com हे सोशल मिडिया वेबपोर्टल घेऊन आलो आहोत.

प्रत्येकाच्या जीवनात पैशाला किती महत्त्व असते; हे आम्ही जाणतो. पैसा कसे काम करतो? याबद्दल तुम्ही सजग आहातच. म्हणूनच तुम्ही तुमच्या जीवनात अधिक आत्मविश्वासाने यशस्वी वाटचाल करत आहात. पैसा हेच फक्त जीवन आहे, असे नाही. पण सध्याच्या काळात पैशांशिवाय चांगले जीवनही जगता येत नाही. पैसा कमविणे ही जशी गरज आहे; तशी ती एक कला देखील आहे. या कलेचा योग्य वापर करणे ही त्याच्यापेक्षा मोठी कला आहे. चाणक्य नीतीमध्ये म्हटल्याप्रमाणे “पैसा कमवण्यासोबत त्याच्या विनियोगाची कोणतीही योजना तुमच्याकडे नसेल किंवा त्याचा वापर कसा करायचा याची ठोस कारणं नसतील तर तो पैसा कामाचा नाही.”

पैसे साठवून ते वाढणार नाहीत किंवा तुमच्या जीवनशैलीतही काही बदल घडणार नाही. कमावलेला पैसा योग्य पद्धतीने गुंतवणे हे शहाणपणाचे लक्षण मानले जाते. यासाठी गुंतवणुकीच्या विविध पैलुंची आणि आर्थिक विषयातील विविध घटकांची अद्ययावत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. पैशांच्या जगात पहिली पायरी शिक्षणापासून सुरू होते. शिक्षण कधी संपत नाही आणि शिकलेलं कधीच वाया जात नाही. यासाठी आम्ही ‘महामनी’ सोशल मिडिया वेबपोर्टलच्या माध्यमातून आर्थिक विश्वातील अद्ययावत माहिती, वैशिष्ट्यपूर्ण लेख, विविध सरकारी योजना, आर्थिक नियम व अटी, गुंतवणूक करताना सतत पडणारे प्रश्न यावर तज्ज्ञांचे स्मार्ट विश्लेषण अगदी सोप्या मराठी भाषेत घेऊन येत आहोत. आर्थिक साक्षरतेच्या प्रवासात ‘महामनी’ सदैव आपल्या सोबत राहील.