Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

अमेरिकन AMD कंपनी 400 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार? बंगळुरुत उभे राहणार सर्वात मोठे डिझाइन सेंटर

पर्सनल कॉम्प्युटर, डेटा सेंटर्स, गेमिंगसह अनेक ठिकाणी एएमडी कंपनीने तयार केलेल्या चीप वापरल्या जातात. Nvidia Corp, इंटेल या कंपनीच्या प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. AMD भारतामध्ये 400 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे. यातून भारतामध्ये रोजगार निर्मिती होईल.

Read More

Disney+ Hotstar आता Netflix च्या वाटेवर! पासवर्ड शेअरिंग करणार मर्यादित

काही दिवसांपूर्वीच Netflix ने त्यांच्या पासवर्ड शेअरिंगवर बंदी आणल्याची बातमी सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत Disney+ Hotstar पासवर्ड शेअरिंग मर्यादित करण्याची योजना आखत आहेत. ही स्ट्रीमिंग सर्व्हिस सध्या त्यांच्या प्रीमियम खात्याच्या पासवर्डला 10 लोकांसह शेअर करण्याची परवानगी देते. मात्र, आता यावरच रोख लागणार आहे.

Read More

Saffron Price: काश्मिरी केशरची किंमत 5 लाख रुपये किलो; चांदी वर्खच्या किंमतीलाही टाकले मागे

मिठाई आणि गोड पदार्थांमध्ये केशरचा वापर सर्रास केला जातो. मात्र, उच्च दर्जाच्या काश्मिरी केशरच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. 1 किलो केशरची किंमत सुमारे 5 लाख रुपये झाली आहे. चांदीच्या वर्खच्या किंमतीला केशरने मागे टाकले आहे.

Read More

Star Series Notes: सिरियल नंबरमध्ये स्टार चिन्ह असलेल्या नोटा खऱ्या की खोट्या? आरबीआयने दिले स्पष्टीकरण

सोशल मीडियावर काय अफवा पसरेल याचा काही नेम नाही. स्टार (*) नंबर सिरिज असलेल्या नोटा बनावट असल्याचे संदेश सोशल मीडियावरून फिरत होते. त्यामुळे या प्रकरणी आरबीआयने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे.

Read More

Budget Friendly Pilgrimage Places:अधिक मासात देवदर्शनासाठी विदर्भातील बजेट फ्रेंडली तीर्थक्षेत्र माहित आहेत का?

Budget friendly Sites of Pilgrimage: असं म्हणतात की अधिक मासात जास्तीत जास्त धार्मिक कामे केली जातात. तुम्हाला जर देव दर्शनाला जायचं असेल तर किती खर्च येऊ शकतो? विदर्भातील कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही देव दर्शनाला जाऊ शकता? ते जाणून घेऊया.

Read More

Amazon one: हात दाखवा अन् पेमेंट करा, कार्डची गरजच नाही! 'अ‍ॅमेझॉन'ची अफलातून सर्व्हिस

Amazon one: पेमेंटच्या विविध पर्यायांचा वापर आपण दररोज करत असतो. त्यात सध्या सर्वात जास्त वापरला जाणारा पर्याय म्हणजे यूपीआय. याशिवाय इतरही अनेक पर्याय आहेत. मात्र त्यातही सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे आणि हा पर्याय आणला आहे अ‍ॅमेझॉननं...

Read More

Business idea: ब्रेडचा व्यवसाय करून देईल लाखोंची कमाई! गुंतवणूक आणि नफ्याचं गणित काय?

Business idea: ब्रेकफास्टला किंवा चहासोबत ब्रेड न खाणारा शोधूनही सापडणार नाही. ब्रेड हा आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य असा भाग किंवा पदार्थ म्हणता येईल. याच ब्रेडच्या व्यवसायाबद्दल काही महत्त्वाची माहिती सविस्तर पाहू...

Read More

Tax exemption: केमिकल सेक्टरला करातून सूट देण्याची सरकारची तयारी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संकेत

Tax exemption: देशातल्या केमिकल सेक्टर म्हणजेच रसायन उद्योगाला करातून सूट मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच याबाबतचे संकेत दिले आहेत. रसायन क्षेत्र हे एक मोठं क्षेत्र असून देशाच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राला विशेष स्थान आहे.

Read More

Seasonable business : हंगामी व्यवसाय करुन मिळवू शकता भरघोस उत्पन्न; जाणून घ्या कोणते व्यवसाय करू शकता?

Seasonable business : प्रत्येक वस्तूचे, पदार्थाचा एक हंगाम असतो. त्याच सिजनमध्ये जास्त मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन तुम्हीही व्यवसाय सुरू करू शकता. अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील म्हातारे आजी -आजोबा सिजनेबल व्यवसाय चालवून आपला उदरनिर्वाह करतात. जाणून घेऊया, ते कोणकोणते व्यवसाय चालवतात?

Read More

Ministry of Railways: दगडफेकीमुळे वंदे भारत एक्सप्रेसचे 55 लाखांचे नुकसान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

Vande Bharat Express: भारतामध्ये सध्या 10 पेक्षा अधिक वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. अत्याधुनिक उपकरनांनी सुसज्ज असलेल्या या सेमी हाय स्पीड ट्रेन मुळे प्रवाशांचा प्रचंड वेळ वाचण्यास मदत झाली. तसेच अनेक शहरांसोबतची कनेक्टीव्हीटी वाढली. परंतु, वंदे भारत एक्सप्रेसवर विविध ठिकाणी काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने 2019 पासून ते जून 2023 पर्यंत रेल्वेला 55.60 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

Read More

Admission Fee Refund: प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्याला मिळणार संपूर्ण प्रवेश शुल्क, UGC चे निर्देश!

विद्यार्थ्याने जर पूर्ण शुल्क भरून प्रवेश घेतला असेल आणि तो प्रवेश रद्द करून अन्य संस्थेत त्याला प्रवेश घ्यायचा असेल अशावेळी शिक्षण संस्थेला विद्यार्थ्याने भरलेले संपूर्ण पैसे आणि त्याची कागदपत्रे परत करावी लागतील असे खुद्द विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)ने स्पष्ट केले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीच्या शुल्क परतावा धोरणात विद्यापीठ अनुदान आयोगाने ही भूमिका जाहीर केली आहे.

Read More

Road Projects: देशभरातील 674 रस्ते प्रकल्पांची कामे रखडली; सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्रातील

देशातील महत्त्वाचे 674 महामार्ग बांधकाम प्रकल्प रखडल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली. सर्वाधिक रेंगाळलेले प्रकल्प महाराष्ट्र राज्यात आहेत. त्याखालोखाल आंध्रप्रदेशचा नंबर लागतो.

Read More