Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharashtra Budget 2023 Live : आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, शिष्यवृत्ती रक्कम वाढवली- बजेटमध्ये घोषणा

LIVE BLOG

Maharashtra Budget 2023 Live

Maharashtra Budget 2023 Live: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गुरुवारी 9 मार्च 2023 रोजी वर्ष 2023-24 साठीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. विद्यार्थ्यां शिष्यवृत्तीत मोठी वाढ करण्यात आली. त्यानुसार 5 ते 7 वीसाठी शिष्यवृत्ती रक्कम 1000 वरुन 5000 रुपये, 8 ते 10 वीसाठी 1500 वरुन 7500 रुपये वाढ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 8पर्यंत मोफत गणवेश देण्याची फडणवीसांची घोषणा

Maharashtra Budget 2023 Live: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गुरुवारी 9 मार्च 2023 रोजी वर्ष 2023-24 साठीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. दुपारी 2 वाजता फडणवीस विधानसभेत बजेटचे वाचन सुरु केले.  यात राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे वार्षिक 6000 रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये मिळणार आहेत. आर्थिक पाहणी अहवालानुसार वर्ष 2021-22 मध्ये राज्यात्या जीडीपीत  (राष्ट्रीय उत्पन्न) गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.3% वाढून 23296,345 कोटी रुपये अंदाजित आहे. राज्यातील शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्रांचा विचार करता राज्याचा 2022-23 मधील दर 10.2% आहे. राज्याचा उद्योग क्षेत्राचा वृद्धिदर 6.1% आहे. सेवा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा 2022-23 मधील दर 6.4% आहे. 

Mar 09, 2023 12:17 IST

Maharashtra Budget 2023 Live: बजेटमध्ये विभागवार मिळालेली तरतूद

maharashtra-budget.jpg
 

Mar 09, 2023 10:34 IST

Maharashtra Budget 2023 Live: राज्यातील धार्मिक क्षेत्रांचा विकास होणार, बजेटमध्ये शेकडो कोटींची तरतूद

भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची घोषणा फडवणीस यांनी केली.  याशिवाय श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकासासाठी 500 कोटी, श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरणासाठी 50 कोटी, श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी 25 कोटी,
श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी देण्यात आल्याचे फडवणीस यांनी सांगितले. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी,  गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी 25 कोटी, नागपूर येथे श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरीसाठी 6 कोटी, श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) येथील विकासकामांसाठी 25 कोटी रुपये निधी देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

Mar 09, 2023 10:34 IST

Maharashtra Budget 2023 Live: राज्याच्या अर्थसंकल्पात उद्योग आणि रोजगार निर्मितीला चालना, विभागांसाठी भरीव तरतूद

उद्योग विभाग : 934 कोटी, वस्त्रोद्योग विभाग : 708 कोटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभाग : 738 कोटी रुपये
शालेय शिक्षण विभाग : 2707 कोटी रुपये, उच्च व तंत्रशिक्षण विभाग : 1920 कोटी रुपये, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग : 2355 कोटी रुपये, क्रीडा विभाग : 491 कोटी रुपये, पर्यटन विभाग : 1805 कोटी रुपये

Mar 09, 2023 10:29 IST

Maharashtra Budget 2023 Live: राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी भरीव निधी

 मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : 1729 कोटी रुपये,  एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण, ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार: 424 कोटी रुपये , गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांसाठी 162.20 कोटींची तरतूद

mumbai-gateway-boating.jpg
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mar 09, 2023 10:12 IST

Maharashtra Budget 2023 Live: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

Mar 09, 2023 10:02 IST

Maharashtra Budget 2023 Live: विद्यार्थ्यां शिष्यवृत्तीत मोठी वाढ, मोफत गणवेश मिळणार

विद्यार्थ्यां शिष्यवृत्तीत मोठी वाढ करण्यात आली. त्यानुसार 5 ते 7 वीसाठी शिष्यवृत्ती रक्कम 1000 वरुन 5000 रुपये, 8 ते 10 वीसाठी 1500 वरुन 7500 रुपये वाढ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 8पर्यंत मोफत गणवेश देण्याची फडणवीसांची घोषणा

school-student-uniform.jpg

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mar 09, 2023 10:02 IST

Maharashtra Budget 2023 Live: राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी भरीव तरतूद

मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुंबईतील नवीन प्रकल्पांमध्ये मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी, मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये, मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये, नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी, पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर, अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो या कामांसाठी बजेटमध्ये भरीव तरतूद करण्यात आली आहे. 

mumbai-metro-t1.jpg
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mar 09, 2023 09:57 IST

Maharashtra Budget 2023 Live: रेल्वे प्रकल्पांसाठी आणि एसटी बसस्थानकांचे आधुनिकीकरण करणार, 400 कोटी खर्च करणार

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये. नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार, सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल, 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटींची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Mar 09, 2023 09:55 IST

Maharashtra Budget 2023 Live: स्टार्टअप योजनेला पाठबळ देण्यासाठी कळंबोली येथे नवीन ट्रेनिंग सेंटर उभारणार.

Maharashtra Budget 2023 Live: स्टार्टअप योजनेला पाठबळ देण्यासाठी कळंबोली येथे नवीन ट्रेनिंग सेंटर उभारणार.

Mar 09, 2023 09:54 IST

Maharashtra Budget 2023 Live: कुलाबा रेडिओ क्लब येथे प्रवासी जेट्टी उभारणार

कुलाबा रेडिओ क्लब येथे प्रवासी जेट्टी उभारणार , त्यासाठी 100 कोटींची घोषणा, येथून कल्याण, वसई विरार येथे जलवाहतुकीला चालना मिळणार 

Mar 09, 2023 09:44 IST

Maharashtra Budget 2023 Live: रस्ते आणि पूलांसाठी 14000 कोटींची घोषणा

राज्यातील रस्ते आणि पूल यांच्यासाठी बजेटमध्ये 14000 कोटींची घोषणा, 10 हजार कामे पूर्ण करणार

Mar 09, 2023 09:42 IST

Maharashtra Budget 2023 Live: पायाभूत सेवा क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य, समृद्ध महामार्गाचा विकास करणार

पायाभूत सेवा क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य, समृद्ध महामार्गाचा विकास करणार, शक्तीपीठांना जोडणारा महामार्ग 86300 कोटींचा खर्च, पुणे रिंगरोडसाठी 1000 कोटींची तरतूद, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेसाठी विशेष तरतूद, विरार अलिबाग मल्टी मॉडेल लिंकसाठी 40 हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mar 09, 2023 09:38 IST

Maharashtra Budget 2023 Live: मोदी आवास घरकुल आवास योजनेची घोषणा.

 मोदी आवास घरकुल आवास योजनेची घोषणा, इतर मागास वर्गासाठी तीन वर्षात 10 लाख घरे बांधणार, यासाठी 12000 कोटींची घोषणा

Mar 09, 2023 09:35 IST

Maharashtra Budget 2023 Live: विविध जातीजमातींसाठी विशेष आर्थिक महामंडळाची घोषणा

लिंगायत समाजातील तरूणांसाठी बसवेश्वर आर्थिक विकस महामंडळ, रामोशी आणि वडार समाजासाठी विशेष आर्थिक मागास महामंडळांची घोषणा, प्रत्येकी 50 कोटींचा निधी देणार 

Mar 09, 2023 09:33 IST

Maharashtra Budget 2023 Live: राज्यातील 1 कोटी 63 लाख लाभार्थी कुटुंबियांना आनंदाचा शिधा देणार

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील 1 कोटी 63 लाख लाभार्थी कुटुंबियांना आनंदाचा शिधा देणार, फडणवीस यांची घोषणा 

Mar 09, 2023 09:31 IST

Maharashtra Budget 2023 Live: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यभरात 700 आपला दवाखाना

महात्मा जोतिराव फुले योजनेची मर्यादा 1.50 लाखावरून 5 लाख रुपये केल्याची फडणवीस यांची घोषणा,  मुंबईत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यभरात 700 आपला दवाखाना सुरु करणार 

Mar 09, 2023 09:30 IST

Maharashtra Budget 2023 Live: राज्यांतील महिलांना एसटी प्रवासासाठी सरसकट 50% सवलत मिळणार

 राज्यांतील महिलांना एसटी प्रवासासाठी सरसकट 50% सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. शक्ती सदन योजनेद्वारे पिडित महिलांना आश्रय, समुपदेशन सुविधा देणार. अंगणवाडी सेविकांचे 20 हजार पदे भरणार

st-bus.jpg

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mar 09, 2023 09:26 IST

Maharashtra Budget 2023 Live: शेती आणि शेतीशी संबंधित विविध विकास योजनांसाठी 29163 कोटी रुपयांची तरतदू

Maharashtra Budget 2023 Live: शेती आणि शेतीशी संबंधित विविध विकास योजनांसाठी 29163 कोटी रुपयांची तरतदू

Mar 09, 2023 09:25 IST

Maharashtra Budget 2023 Live: जलयुक्त शिवार दुसरा टप्पा, 5000 गावांमध्ये ही योजना राबवणार

मधल्या काळात बंद झालेली  जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा, 5000 गावांमध्ये ही योजना राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Mar 09, 2023 09:24 IST

Maharashtra Budget 2023 Live: राज्यातील 17 लाख 72 हजार कुटुंबांना नळ जोडणी देणार

केंद्र सरकारच्या जल जीवन मिशनअंतर्गत राज्यातील 17 लाख 72 हजार कुटुंबांना नळ जोडणी देणार, या योजनेसाठी बजेटमध्ये 20 हजार कोटींची घोषणा

Mar 09, 2023 09:17 IST

Maharashtra Budget 2023 Live: मत्सविकास कोषची स्थापन करणार, 85 हजार मच्छीधारकांना लाभ घेता येणार. 269 कोटी रुपयांची तरतूद

Maharashtra Budget 2023 Live:  मत्सविकास कोषची स्थापन करणार, 85 हजार मच्छीधारकांना लाभ घेता येणार. 269 कोटी रुपयांची तरतूद केल्याची फडणवीस यांची बजेटमध्ये घोषणा, मच्छीमारांसाठी 5 लाख विमा कवच पुरवणार

Mar 09, 2023 09:16 IST

Maharashtra Budget 2023 Live: 2023 तृणधान्य वर्षानिमित्ता श्री अन्न योजनेसाठी बजेटमधील विशेष तरतूद

2023 तृणधान्य वर्षानिमित्ता श्री अन्न योजनेसाठी विशेष तरतूद बजेटमध्ये घोषणा

Mar 09, 2023 09:14 IST

Maharashtra Budget 2023 Live: विदर्भातील 14 जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकांना रोख अनुदान

Maharashtra Budget 2023 Live:  विदर्भातील 14 जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारकांना वार्षिक प्रती व्यक्ती 1800 रुपये रोख बँक खात्यात जमा करणार, फडणवीस यांची बजेटमध्ये घोषणा

Mar 09, 2023 09:13 IST

Maharashtra Budget 2023 Live: कोकणासाठी काजू फळ विकास योजना, 1,300 कोटी रुपयांची घोषणा

2016 मधील पीक विमा योजनेतील शेतकऱ्याचा हिस्सा राज्य सरकार भरणार. शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरावा लागणार
शेतीच्या शाश्वत विकासासाठी महाकृषि अभियान योजना राबवणार , पुढील 3 वर्षांसाठी 5 कोटी रुपये उपलब्ध करून देणार कोकणासाठी काजू फळ विकास योजना - आगामी 5 वर्षांसाठी 1,300 कोटी रुपयांची तरतूद करण्याची फडणवीसांची घोषणा

Mar 09, 2023 09:10 IST

Maharashtra Budget 2023 Live: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा,  राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे वार्षिक 6000 रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये मिळणार आहेत. 

Mar 09, 2023 09:07 IST

Maharashtra Budget 2023 Live: छ्त्रपती शिवाजी महाराजांंचे स्थान शिवनेरीवर संंग्राहलय उभारणार यासाठी 300 कोटींची घोषणा

केंद्राच्या 5 ट्रिलिअन अर्थव्यवस्थेत राज्याचा वाटा 1 ट्रिलिअन असावा अशी योजना, छ्त्रपती शिवाजी महाराजांंचे स्थान शिवनेरीवर संंग्राहलय उभारणार यासाठी 300 कोटींची घोषणा फडणवीस यांनी केली. 

Mar 09, 2023 09:03 IST

Maharashtra Budget 2023 Live: संत तुकारामांना वंदन करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बजेट भाषणाला सुरुवात

 संत तुकारामांना वंदन करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेट भाषणाला सुरुवात केली. यंदा डिजिटल पद्धतीने बजेट सादर करण्यात येणार आहे. फडणवीस टॅबलेटवर वाचन सुरु केले.  

Image
 
 
 
 
 
 
 
 

Mar 09, 2023 09:03 IST

MahaBudget2023 : बजेटसाठी विधिमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात दाखल, विरोधी पक्षांनी केली '50 खोके' घोषणाबाजी

MahaBudget2023 : बजेटसाठी विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात दाखल झाले. विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे, छगन भुजबळ सभागृहात दाखल झाले.विरोधी पक्षांनी केली '50 खोके' घोषणाबाजी

Mar 09, 2023 09:00 IST

Maharashtra Budget 2023 Live: पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? बजेटमध्ये व्हॅटबाबत सरकार करणार घोषणा

राज्यात जुलै 2022 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंधनावरील व्हॅट (VAT On Petrol and Diesel) कमी केला होता. त्यामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी आणि डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले होते. नुकताच शेजारच्या गुजरातने अर्थसंकल्पात सीएनजी आणि पीएनजीवरील कर 15% ने कमी केला होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारसुद्धा इंधनावरील व्हॅट कमी करणार का? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. थोड्याच वेळात विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.

petrol-and-diesel.jpg

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mar 09, 2023 08:44 IST

MahaBudget 2023 Live: राज्याच्या बजेटवर शेतकऱ्यांचे लक्ष, कर्जमुक्तीसाठी किती तरतूद होणार याची उत्सुकता

राज्यात जुलै 2022 पासून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली जात आहे. (Agri Farm Loan Waiver Scheme) या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. 2022-23 मध्ये डिसेंबरपर्यंत 8.13 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना सरकारने 2,982 कोटी रुपयांची मदत केली. यंदाच्या बजेटमध्ये या योजनेसाठी किती तरतूद करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

farmers-loan-waiver.jpg
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mar 09, 2023 08:33 IST

MahaBudget 2023 Live: विधानसभेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार

MahaBudget 2023 Live :  विधानसभेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. Maharashtra Assembly Live या यू ट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपण होणार आहे. दुपारी 2 वाजता बजेट सादर करण्यात येईल.

 

Mar 09, 2023 08:14 IST

MahaBudget2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बजेट सादर करणार

MahaBudget2023: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे अर्थमंत्री  म्हणून पहिल्यांदाच अधिवेशनात बजेट सादर करणार आहेत. राज्यात जुलै 2022 मध्ये सत्तांतर झाले होते. त्यानंतरचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शेतकरी, सर्वसामन्य, महिला या प्रमाणेच उद्योजकांच्या महाराष्ट्राच्या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. 

Load more