Saffron Price Hike: काश्मिरी केशर आणि चांदीचा वर्ख यांचा वापर मिठाईमध्ये केला जातो. यातील काश्मिर केशरने किंमतीचा नवा उच्चांक गाठला आहे. 1 किलो केशरची किंमत सुमारे 5 लाख रुपये झाली आहे. काश्मिरी केशरला भौगोलिक मानांकन (GI) मिळाल्यापासून केशरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी केशरची किंमत साडेतीन लाख रुपये किलोच्या दरम्यान होती. त्यात आता दीड लाखांनी वाढ झाली आहे.
मिठाई आणि स्वीटमध्ये सर्रास वापर
भारतात केशर आणि चांदीचा वर्ख मिठाईमध्ये मुघल काळापासून वापरात आहे. सजावटीसोबतच मिठाईची चवही वाढते. जुन्या काळात राजे महाराजे श्रीमंती दाखवण्यासाठी असे पदार्थ अन्नपदार्थात वापरत.
www.gulfnews.com
आता केशर महाग झाल्याने मिठाईसुद्धा महाग होण्याची शक्यता आहे. चांदीचा वर्ख सुद्धा मिठाईमध्ये वापरला जातो. मात्र, केशरपेक्षा किंमत कमी आहे. चांदीचा वर्ख बाजारामध्ये 800 रुपयांना 10 ग्रॅम या दराने विकला जात आहे. तर 10 ग्रॅम केशरची किंमत 4,950 आहे. म्हणजेच 1 किलो केशरसाठी सुमारे 5 लाख रुपये मोजावे लागतील.
सुवर्ण पत्र सर्वात महाग
दरम्यान, चांदीचा वर्ख आणि केशरपेक्षाही महाग सुवर्ण पत्र (गोल्डन लिफ) मिळते. सुवर्ण पत्र म्हणजे सोन्याचा ठोकून अतिशय पातळ केलेला पत्रा. हा पत्रा डेकोरेशन, सजावट आणि वस्तूंना चमक देण्यासाठी वापरला जातो. 10 ग्रॅम सुवर्ण पत्राची किंमत 59,000 हजार रुपये आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी सुवर्ण पत्राच्या किंमतीत 40% ची वाढ झाली. सुवर्ण पत्रापेक्षा स्वस्त मिळत असल्याने चांदीच्या वर्खाची सर्वाधिक विक्री होते.
काश्मिरी केशरचा ब्रँड
काश्मिरमधील केशर चांगल्या प्रतिचे असल्याने भारत सरकारने त्यास GI टॅग दिला आहे. एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या पिकास किंवा वस्तूस जीआय टॅग दिला जातो. हे एक उच्च दर्जाचे प्रतिक समजले जाते. काश्मिरी केशरला जीआय टॅग मिळाल्यापासून त्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील महिन्यात दीड लाख किलो पर्यंत दर होते. ते आता पाच लाखांच्या घरात पोहचले आहेत.