Marry Now Pay Later: लग्नाचा सिझन सुरू झाला आहे; पण वाढत्या महागाईमुळे आयुष्यातील आनंदाचा क्षण साजरा करताना हात आखडता घ्यावा लागत आहे. त्यात इतक्या वर्षापासून जमा केलेली जमापुंजी एकाचवेळी खर्च करताना जिवावर येत आहे. तर तुमच्या आनंदात भर घालण्यासाठी फिनटेक कंपन्यांनी Marry Now, Pay Later (MNPL) ही स्कीम आणली आहे. जी तुमच्या लग्नावर खर्च होणारी बाजू सांभाळणार असून त्याची परतफेड तुम्हाला टप्प्याटप्प्याने करावी लागणार आहे.
तुम्ही आतापर्यंत 'बाय नाऊ, पे लेटर' (Buy Now, Pay Later)बद्दल ऐकले असेल किंवा या सुविधेचा फायदा घेत स्मार्टफोन, महागडी गॅझेट किंवा तुमच्या आवडीची वस्तू घेतली असेल. अगदी त्याच पद्धतीने तु्म्ही तुमच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण लग्न! यावर होणारा खर्च Marry Now, Pay Later पद्धतीने करू शकता. यासाठी तु्म्हाला घर गहाण ठेवून कर्ज घेण्याची गरज नाही. कारण Marry Now, Pay Later याचा लाभ घेऊन तुम्ही तुमचे लग्न धुमधडाक्यात साजरे करू शकता.
Table of contents [Show]
Marry Now, Pay Later काय आहे?
मॅरी नाऊ, पे लेटर ही बाय नाऊ पे लेटर या संकल्पनेतीलच एक सिस्टिम आहे. जिच्या सहाय्याने लग्नातील काही ठराविक गोष्टींचा खर्च तुम्ही आता करून त्याचे पैसे नंतर टप्प्याटप्प्या देऊ शकता. यामध्ये विशेषकरून लग्नाचा हॉल, जेवणाची व्यवस्था पाहणारे कॅटरर, डेकोरेशन, फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी, लग्नासाठी लागणाऱ्या महत्त्वाची गोष्टी आणि लग्नाचे नियोजन यासाठी जो खर्च येतो. तो खर्च कंपनीकडून केला जाणार असून त्याची किंमत टप्प्याटप्प्याने चुकवता येणार आहे.
MNPL मुळे लग्नाच्या जमा-खर्चाचा मेळ घालणे सोपे!
MNPL मुळे लग्नातील जमा-खर्चाचा योग्य आणि चांगल्या पद्धतीने मेळ घालण्याची संधी मिळत आहे. साधारण भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा संस्कार मानला जातो आणि या संस्काराला भारतामध्ये सर्वोच्च स्थान आहे. यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरीने आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार खर्च करत असतो. पण यामुळे काही जणांवर आर्थिक संकटसुद्धा येते. तर काहीजणांना आपल्या इच्छेनुसार लग्नावर खर्च करता येत नाही. बऱ्याच कुटुंबामध्ये आयुष्यभर जमा केलेले पैसे लग्नाच्या खर्चासाठी वापरले जातात. त्यामुळे त्या कुटुंबावर नंतर आर्थिक ताण येतो. अशा सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करणारा पर्याय फिनटेक कंपन्यांनी बाजारात आणला आहे.
MNPL मुळे आता लग्नाच्या खर्चावर आखडता हात घ्यावा लागणार नाही किंवा आयुष्यभर मिळवलेली जमापुंजी एकाचवेळी लग्नासाठी खर्च करावी लागणार नाही. कारण लग्नावर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण खूप वाढले आहे. प्रत्येक गोष्टीचे भाव वाढल्यामुळे त्यासाठी अधिकचे पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यासाठी MNPL फिनटेक कंपन्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर होणारा खर्च भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने लग्नाचा हॉल, जेवणाची व्यवस्था पाहणारे कॅटर्स, डेकोरेशन, फोटोग्राफी-व्हिडिओ आणि इतर गोष्टींवर होणारा खर्च या कंपन्यांकडून केला जाणार आहे आणि नंतर यावर होणाऱ्या खर्चाचे पैसे तुम्हाला टप्प्याटप्प्याने देता येणार आहे.
Marry Now Pay Later सुविधा कशी मिळवायची?
Marry Now Pay Later ची सुविधा मिळवण्यासाठी सध्या काही लिमिटेड पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे पैशांचा विचार न करता लग्न करू शकता. बजाज फिनसर्व्हचा (Bajaj Finserv) मॅरी नाऊ पे लेटर ही संकल्पना भारतात रुजवण्यात मोठा वाटा आहे. बजाज फिनसर्व्ह ही बजाज समुहातीलच एक कंपनी आहे. ही कंपनी लग्नातील लहान-मोठा खर्च भागवण्यासाठी किमान 1 लाखापासून ते 35 लाखापर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देते.
बजाज फिनसर्व्हप्रमाणेच संकष ट्रॅव्हल फिनटेक कंपनीने मॅरी नाऊ पे लेटर स्कीम सुरू केली. संकष कंपनी लोनसाठी मागणी करणाऱ्या उमेदवाराच्या पात्रतेनुसार त्याला 25 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. यामध्ये ईएमआयची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
मॅरी नाऊ पे लेटर फिनटेक
मॅरी नाऊ पे लेटर या नावानेच मार्केटमध्ये एक फिनटेक कंपनी कार्यरत आहे. ही कंपनी ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना लग्नासाठी कर्ज उपलब्ध करून देते. Marry Now Pay Later ही कंपनी ग्राहकाच्या पात्रतेनुसार जास्तीत जास्त 5 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. मॅरी नाऊ पे लेटर कंपनीच्या वेबसाईटवर तुम्ही तुमची पात्रता तपासून या सुविधेचा अर्ज करू शकता.