Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Star Series Notes: सिरियल नंबरमध्ये स्टार चिन्ह असलेल्या नोटा खऱ्या की खोट्या? आरबीआयने दिले स्पष्टीकरण

Indian Currency

सोशल मीडियावर काय अफवा पसरेल याचा काही नेम नाही. स्टार (*) नंबर सिरिज असलेल्या नोटा बनावट असल्याचे संदेश सोशल मीडियावरून फिरत होते. त्यामुळे या प्रकरणी आरबीआयने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे.

Star Series Notes: सोशल मीडियावर काय अफवा पसरेल याचा काही नेम नाही. स्टार (*) नंबर सिरिज असलेल्या नोटा बनावट असल्याचे संदेश सोशल मीडियावरून फिरत होते. त्यामुळे या प्रकरणी आरबीआयने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे जनतेतील चर्चेला विराम मिळाला आहे.

स्टार सिरियलच्या नोटा खऱ्या की खोट्या?

नोटांवरील सिरियल क्रमांकामध्ये (*) चिन्ह असलेल्या नोटा खऱ्या आणि कायदेशीर असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. नोटांची छपाई करताना ज्या नोटा खराब होतात, त्या नोटांची पुन्हा छपाई केली जाते. मात्र, पुन्हा छपाई करताना या नोटांच्या सिरियल नंबरमध्ये * हे चिन्ह टाकले जाते. त्यामुळे पुन्हा छपाई केलेल्या नोटा कोणत्या हे लक्षात येते, असे RBI ने म्हटले आहे. 

100 च्या पटीत चलनी नोटांची एकावेळी छपाई केली जाते. या नोटा एका सिरियलमध्ये असतात. मात्र, या ज्या नोटांची छपाई नीट होत नाही त्या नोटा आम्ही पुन्हा छापतो. तेव्हा (*) चिन्हाची गरज पडते. या * चिन्ह असलेल्या नोटा इतर नोटांप्रमाणेच अधिकृत आहेत, असे आरबीआयने म्हटले आहे.

सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा?

ज्या नोटांमध्ये स्टार चिन्ह आहे या नोटा अधिकृत नसून बनावट आहेत, अशा अफवा सोशल मीडियावर पसरली होती. स्टार सिरिज असलेल्या नोटांचे व्यवहार करताना नागरिक सावधगिरी बाळगत होते. मात्र, आता आरबीआयने या नोटा खऱ्या असल्याचे सांगितल्याने नागरिकांनी काळजी कण्याची गरज नाही. 

डिसेंबर 2016 साली RBI ने 500 रुपयांच्या नोटांच्या सिरियल नंबरमध्ये (*) चिन्ह समाविष्ट केले. तर 2006 पासून 10,20,50 आणि 100 रुपयांच्या नोटांच्या सिरियल नंबरमध्ये * चिन्ह आहे. त्यामुळे या सर्व नोटा अधिकृत आहेत, असे आरबीआयाने म्हटले आहे.