Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

GST on Hostels: वसतिगृहात राहणे महागणार, 12 टक्के जीएसटी लागू करण्याचा सरकारचा निर्णय!

वसतिगृहाचे भाडे वाढणार असल्यामुळे सर्वाधिक फटका हा विद्यार्थ्यांना बसणार आहे. जे विद्यार्थी शिक्षणासाठी त्यांच्या राहत्या घरापासून दूर राहतात त्यांना वसतिगृहाचा किंवा पीजीचा ऑप्शन निवडावा लागतो. परगावी शिक्षणासाठीचा खर्च, शैक्षणिक साहित्यांवर लागू झालेला जीएसटी आणि आता वसतिगृहावर देखील लावला गेलेला जीएसटीमुळे शिक्षण महाग होणार आहे.

Read More

Motilal Oswal: मोतीलाल ओसवाल कंपनीच्या प्रमोटर्सचा मोठा निर्णय; 10% शेअर्स समाजोपयोगी कामांसाठी दान करणार

मोतीलाल ओसवाल कंपनीच्या प्रमोटर्सने कंपनीतील 10% हिस्सा समाजोपयोगी कामांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त असून सुमारे दीड कोटी शेअर्सवरील हक्क सोडून देणार आहेत.

Read More

Palm Oil चा वापर वाढवण्यासाठी सरकार करणार प्रयत्न, विशेष अभियानाला सुरुवात

भारतात मुख्यत्वे इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमधून पाम तेलाची आयात केली जाते. भारतातील एकूण खाद्य तेलापैकी 60% पाम टेल वापरले जाते. येत्या काळात पाम तेलाचा मुख्य उत्पादक देश म्हणून भारताला पुढे आणण्यासाठी सरकार हे प्रयत्न करत आहे.

Read More

Manipur Violence: मणिपूरमधील वांशिक हिंसाचारामुळे अर्थव्यवस्था कोलमडली; 80% निर्यात रोडावली

मणिपूरमध्ये तयार होणारे हातमागावरील कापड जगभरात निर्यात होते. औषधी वनस्पती आणि खाद्यपदार्थांचीही राज्यातून निर्यात होते. मात्र, वांशिक हिंसाचारामुळे 80% निर्यात रोडावली आहे.

Read More

Bajaj Auto: बजाज ऑटो चालली परदेशात; 'या' देशात उभारणार पहिला निर्मिती प्रकल्प

बजाज ऑटो परदेशात आपला पहिला निर्मिती प्रकल्प सुरू करणार आहे. दुचाकी आणि तीनचाकी वाहन निर्यातीमध्ये बजाज आघाडीची कंपनी आहे. मात्र, लॅटिन अमेरिकेत आता निर्मिती प्रकल्प सुरू करण्याची निर्णय कंपनीने घेतला आहे. या प्लांटमध्ये KTM या स्पोर्ट बाइकचीही निर्मिती होणार आहे.

Read More

Veterinary Course: महाराष्ट्रात सध्या 6 हजारहून अधिक पशुवैद्यक पदवीधरांची आवश्यकता, तुम्ही घेऊ शकता संधीचा फायदा

Department Of Animal Husbandry : महाराष्ट्रात प्रत्येक फील्डमधील अनेक महाविद्यालये आहेत. पण पशुवैद्यकीय महाविद्यालये ही बोटावर मोजण्या जोगी आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठांतर्गत प्रायवेट पशुवैद्यकीय महाविद्यालये सुरू करता येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रात सध्या 6 हजारहून अधिक पशुवैद्यक पदवीधरांची आवश्यकता आहे. या संधीचा फायदा तुम्ही घेऊ शकता.

Read More

Maharashtra Tour Package: IRCTC कडून नवीन टुर पॅकेज, कमीत कमी खर्चात करु शकता महाराष्ट्र दर्शन

Maharashtra Tour Package: औरंगाबाद विशेषतः प्राचीन किल्ले, गुहा आणि ऐतिहासिक इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. या सर्व ठिकाणी जाण्याची तुमची इच्छा असेल तर IRCTC कडून तुमच्यासाठी एक चांगला चान्स आहे. जर तुम्हालाही बजेटमध्ये ट्रीप करायची असेल तर जाणून घ्या बुकिंग कशी करायची?

Read More

Farmers Helpline: शेतकरी अडचणीत असल्यास ‘या’ व्हाट्सॲप नंबरवर करा तक्रार, कृषी विभागाकडून होईल मदत

Farmers Helpline: शेती करत असतांना शेतकऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी नैसर्गिक आपत्ती, कधी बियाणे बोगस निघणे या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी शासनाकडून एक व्हाट्सॲप नंबर दिला आहे. त्या नंबर व्हाट्सॲप नंबर वरून तक्रार नोंदवावी लागते.तो नंबर 9822446655 हा आहे, याबाबत माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Read More

Menstrual leave for female : 'वर्किंग वुमेन्स'ला मासिक पाळी काळात मिळू शकेल वेतन रजा; विधानसभेत विधेयक सादर

प्रत्येक महिलेस मासिक पाळीच्या काळात आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातच अनेक महिला घर सांभाळून नोकरी करत असतात. त्यामुळे नोकरदार महिलांसाठी मासिक पाळीच्या काळात वेतन रजा मिळावी, अशा मागणीचे विधेयक राज्याच्या विधिमंडळात मांडण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास महिलांना या पुढे आरोग्याच्या दृष्टीने दिलासा मिळणार आहे.

Read More

Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेस आता नव्या रुपात! जुन्या डब्यांच्या जागी येणार नवे चकचकीत आरामदायी कोच

Vande Bharat Express: देशातली सुपरफास्ट ट्रेन म्हणून ओळख असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस गाडीला आता आणखी नवं रूप मिळणार आहे. वंदे भारतच्या ट्रेन्सना आता नवीन आणि चकचकीत असे डबे जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगला प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

Read More

Pomegranate Export: अमेरिकेने डाळिंबावरील निर्यात बंदी हटवली, शेतकऱ्यांना होणार फायदा!

देशांतर्गत डाळिंबाला मिळणारा भाव कमी असल्यामुळे आणि परदेशात डाळिंबाला चांगली मागणी आणि चांगला भाव असल्याकारणाने शेतकरी डाळिंब परदेशी निर्यात करत होते. अमेरिकेत या फळाला चांगली मागणी होती, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आर्थिक मोबदला मिळत होता. आता अमेरिकेने ही निर्यात बंदी मागे घेतल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Read More

Ratan Tata: महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार रतन टाटांना जाहीर

देशाच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या उद्योगपतींचा गौरव व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने यंदापासून 'उद्योगरत्न' पुरस्कार सुरु करण्याची घोषणा केली आहे. पहिला पुरस्कार प्रथितयश उद्योगपती रतन टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे...

Read More