Google Pay वरून तुम्ही कधी पेमेंट करताना Error U28 अनुभवली असेल. यात नेमकं होतं काय तर, तुम्ही UPI स्कॅन करून पेमेंट करताना पैसे पुढच्या व्यक्तीला पाठवलेच जात नाही. परिणामी तुम्ही चिंतेत पडता की पैसे कापले तर गेले नसतील? परंतु अशावेळी घाबरण्याचे काहीही कारण नाही. ही एरर का येते याबद्दल थोडेसे जाणून घेऊयात.
तसे पाहायला गेले तर ही एक सामान्य समस्या आहे. यात जेव्हा युजर्स पेमेंट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा गुगल पे ॲपवर एक मेसेज येतो. हा एरर कोड सामान्यतः Google Pay ॲप आणि पेमेंट प्रोसेसिंग सर्व्हर यांच्यातील काही तांत्रिक समस्या दर्शवतो. याचा तुमच्या बँक खात्याशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे उगाचच पॅनिक होण्याचे,घाबरण्याचे काहीही कारण नाही हे लक्षात असू द्या.
कधी येते समस्या?
खरे तर एरर U28 चे नेमके कारण वेगवेगळे असू शकते. तुमचे गुगल पे ॲप आणि बँकेचे सर्वर यांच्यादरम्यान कम्युनिकेशन होत नसल्याने तुमचे पेमेंट पूर्ण होत नाही. अनेकदा नेटवर्क कनेक्टिव्हिटी समस्या असल्याने हे घडते.
डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या समस्या किंवा डिव्हाइसवर सुरू असलेल्या इतर अॅप्समुळे देखील असे होऊ शकते. त्यामुळे शक्यतो गुगल पे वरून पेमेंट करताना इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित तपासून घ्या. तुमच्याच इंटरनेट डेटावरून तुम्ही पेमेंट करत आहात याची खात्री करून घ्या.तसेच पेमेंट करताना इतर कुठलेही मोबाईल ॲप वापरणे टाळा.
अशावेळी काय कराल?
गुगल पे ॲपवरील U28 समस्याचे निवारण करण्यासाठी, आधी सांगितल्यानुसार युजर्सने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांचे डिव्हाइस इंटरनेट कनेक्शनशी व्यवस्थित कनेक्ट केलेले आहे. तसेच अशी एरर आल्यास युजर्स Google Pay ॲप क्लोज करून पुन्हा सुरू करून बघू शकता. तसेच डिव्हाइस सेटिंग्जमध्ये ॲपची कॅशे आणि डेटा इरेज करू शकतात.
या सगळ्या उपाययोजना करूनही जर समस्या कायम राहिली तर, युजर्स त्यांचे डिव्हाइस रीस्टार्ट करण्याचा किंवा Google Pay ॲपवर गुगल पे चे अपडेटेड व्हर्जन डाऊनलोड करू शकतात.
वारंवार समस्या येत असेल तर?
वर उल्लेख केलेल्या सगळ्या स्टेप्सचे अनुकरण करून देखील समस्येचे निराकरण होत नसल्यास तुम्ही Google Pay च्या ग्राहक प्रतिनिधीशी संपर्क करू शकता. तुमच्या या समस्येचे निराकरण त्यांच्याकडून जरूर केले जाईल. परंतु आधीच माहिती दिल्याप्रमाणे तुमचे पैसे बँक खात्यातून कापले जात नाही आणि इंटरनेट कनेक्शन रिस्टोअर झाल्यानंतर तुमचे बँक व्यवहार पूर्ण होतात.