युपीआय (UPI) पेमेंट प्रणाली सुरू झाल्यापासून आर्थिक व्यवहार खूपच सोपे झाले आहेत. आता, NPCI ने युपीआय सर्कल (UPI Circle) नावाचे एक नवीन फीचर आणले आहे, ज्यामुळे कुटुंब आणि मित्रांसाठी पैसे पाठवणे आणखी सोपे झाले आहे. या सुविधेद्वारे मुख्य यूजर एकाच युपीआय आयडीचा वापर अनेक विश्वासू लोकांना पेमेंट करण्याची परवानगी देऊ शकतो.
युपीआय सर्कल म्हणजे काय आणि ते कसे सक्रिय करावे?
युपीआय सर्कलमध्ये अनेक लोक एकाच युपीआय आयडी आणि बँक खात्यातून व्यवहार करू शकतात. मुख्य यूजर आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा जोडीदार यांसारख्या विश्वासू व्यक्तीला दुय्यम वापरकर्ता (सेकंडरी यूजर) म्हणून जोडू शकतो. मुख्य यूजर आवश्यकतेनुसार दुय्यम यूजरला परवानगी देऊ किंवा रद्द करू शकतो.
युपीआय सर्कलचा वापर कसा करायचा?
- सर्वप्रथम भीम युपीआय ॲप (App) डाऊनलोड करा आणि ते बँक खात्याशी जोडा.
- ॲपमधील युपीआय सर्कल सेक्शनमध्ये जाऊन कुटुंबीय किंवा मित्रांचे युपीआय आयडी किंवा मोबाईल नंबर टाका.
- त्यानंतर फुल डेलिगेशन किंवा पार्शियल डेलिगेशन यापैकी एक निवडून व्यवहाराची मर्यादा (लिमिट) सेट करावी लागते.
दोन प्रकारचे अधिकार आणि व्यवहाराची मर्यादा
युपीआय सर्कलमध्ये वापरकर्त्यांना दोन प्रकारचे अधिकार देता येतात: पार्शियल डेलिगेशन (अंशतः अधिकार) आणि फुल डेलिगेशन (पूर्ण अधिकार).
पार्शियल डेलिगेशन: या विकल्पात दुय्यम यूजरने प्रत्येकवेळी पेमेंट केले, की मुख्य यूजरला युपीआय पिन टाकून मंजुरी द्यावीच लागते.
फुल डेलिगेशन: यात दुय्यम यूजरला निश्चित केलेल्या मर्यादेपर्यंतचे व्यवहार करण्यासाठी मुख्य यूजरच्या प्रत्येकवेळीच्या मंजुरीची गरज नसते.
या सुविधेमध्ये व्यवहारांवर सुरक्षिततेसाठी मर्यादा आहे: एका डिव्हाइसमधून एका वेळेस ₹5,000 रुपयांपर्यंतचा व्यवहार केला जाऊ शकतो, तर मासिक मर्यादा ₹15,000 रुपये आहे. तसेच, एकाच युपीआय खात्याशी जास्तीत जास्त 5 दुय्यम डिव्हाइस जोडता येतात.
व्यवहाराची प्रक्रिया आणि सुरक्षितता
युपीआय सर्कलद्वारे पेमेंट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. आयओटी ॲप उघडून युपीआय नोंदणी सुरू करावी लागते. नोंदणी पूर्ण झाल्यावर मुख्य वापरकर्ता ॲपमध्ये डिव्हाइसला मर्यादा सेट करतो आणि शेवटी युपीआय पिन किंवा बायोमेट्रिकद्वारे परवानगी देतो. या पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुय्यम वापरकर्ता व्यवहार करू शकतो. नवीन डिव्हाइस जोडल्यानंतर 24 तासांपर्यंत व्यवहाराची मर्यादा ₹2,000 रुपये असते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.