Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

अमेरिकन AMD कंपनी 400 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार? बंगळुरुत उभे राहणार सर्वात मोठे डिझाइन सेंटर

AMD investment in India

Image Source : www.seekingalpha.com

पर्सनल कॉम्प्युटर, डेटा सेंटर्स, गेमिंगसह अनेक ठिकाणी एएमडी कंपनीने तयार केलेल्या चीप वापरल्या जातात. Nvidia Corp, इंटेल या कंपनीच्या प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. AMD भारतामध्ये 400 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे. यातून भारतामध्ये रोजगार निर्मिती होईल.

AMD Investment In India: सेमीकंडक्टर, ग्राफिक आणि मायक्रो चीप निर्मीतीमधील अमेरिकन कंपनी AMD भारतामध्ये 400 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे. कंपनी कर्नाटकातील बंगळुरू येथे सर्वात मोठे डिझाइन सेंटर देखील उभारणार आहे. फॉक्सकॉन-वेदांता डील फिस्कटल्यानंतर सेमीकंडक्टर निर्मिती उद्योगातील मोठी गुंतवणूक भारतात येणार आहे.

AMD म्हणजे Advanced Micro Devices असे या अमेरिकन कंपनीचे नाव आहे. ग्राफिक आणि मायक्रो चीप निर्मितीमधील AMD एक आघाडीची कंपनी आहे. पुढील पाच वर्षांमध्ये कंपनीकडून भारतामध्ये गुंतवणूक केली जाईल. यातून देशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.

पर्सनल कॉम्प्युटर, गेमिंग, डेटासेंटरसाठी चीप निर्मिती

पर्सनल कॉम्प्युटर, डेटा सेंटर्स, गेमिंगसह अनेक ठिकाणी एएमडी कंपनीने तयार केलेल्या चीप वापरल्या जातात. Nvidia Corp, इंटेल या कंपनीच्या प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. (AMD Investment In India )तैवानची TSMC आणि साउथ कोरियातील सॅमसंग या दोन कंपन्या चीप निर्मितीमध्ये वर्ल्ड लिडर आहेत. इतर कंपन्या या कंपन्यांकडून चीप निर्मिती करून घेतात. मात्र, यापुढे देशात चीप निर्मिती व्हावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. 

कंपनीचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर मार्क पॅमरेमस्टर यांनी गुजरातमध्ये आयोजित वार्षिक सेमीकंडक्टर परिषदेमध्ये या निर्णयाची घोषणा केली. मायक्रॉन, आणि फॉक्सकॉन या चीप निर्मिती कंपन्यांचे प्रमुखही या परिषदेला उपस्थित होते. सेमीकंडक्टर चीप निर्मितीचे हब म्हणून चीन, तैवानकडे पाहिले जाते.

3 हजार इंजिनिअर्सला मिळणार रोजगार

2023 वर्षाच्या शेवटपर्यंत AMD बंगळुरू शहरामध्ये डिझाइन सेंटर उभारणार आहे. यामध्ये 3 हजार इंजिनिअर्सला नोकरी मिळेल. या सेंटर्समध्ये चीपची डिझाइन तयार केली जाईल तसेच रिसर्च केला जाईल. भारतात सध्या 6500 कर्मचारी आहेत. बंगळुरुमध्ये डिझाइन सेंटर उभे राहिल्यास भारतातील 10 शहरांत कंपनीचे कार्यालय असेल.

कोविडनंतर भारताला जाग

कोविडनंतर भारत चीप निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहे. कारण, कोरोना काळात चीपचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक उद्योगांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे आता सेमीकंडक्टर निर्मिती उद्योगांना अनेक सरकारी योजनांचा लाभ दिला जात आहे. प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह ही यातील एक प्रमुख योजना आहे. फॉक्सकॉन-वेदांता डील फिस्कटल्यानंतर फॉक्सकॉनने PLI योजनेंतर्गत भारतात चीप निर्मिती करण्यासाठी सरकारकडे अर्ज केला आहे.

मायक्रॉन 825 कोटींची गुंतवणूक करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी जून महिन्यात तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा मायक्रॉन या चीन निर्मिती करणाऱ्या कंपनीने भारतात 825 मिलियन डॉलर गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. गुजरात राज्यामध्ये कंपनीचा पहिला प्रकल्प उभा राहील. यातून 5 हजार थेट रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच अप्रत्यक्ष रोजगारामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लागेल.