Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आर्थिक साक्षरता म्हणजे काय? What is Financial Literacy?

What is Financial Literacy

Financial Literacy : भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन करणे किंवा पैसे कुठे आणि कशासाठी खर्च करायला हवेत ह्या गोष्टींचे ज्ञान असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. ही एक जगण्याची कला आहे; असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही.

पैसे हा प्रकार नेमका काय आहे? त्या पैशांचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो. त्या पैशाची एखादी व्यक्तीमधील व्यवस्थापित करण्याची क्षमता,भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन करणे किंवा पैसे कुठे आणि कशासाठी खर्च करायला हवेत ह्या गोष्टींचे ज्ञान असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. ही एक जगण्याची कला आहे; असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही आणि ती भविष्यासाठी उपयोगी आहे, हे देखील समजून घेतले पाहिजे. आर्थिक साक्षरतेमध्ये बचत अनुशासन, पगार, गुंतवणूक, शिक्षण, विमा आणि कर्जाचा हप्ता – व्याज (Financial Literacy includes Saving Discipline, Salary, Investment, Education, Insurance & Loan EMI-Interest Rate) यांचा समावेश होतो.

आधी फायनान्शियल संकल्पना समजून घेऊयात (Financial Concepts)

आर्थिक साक्षरता म्हणजे तुमच्या जवळील पैशाचे केलेलं नियोजन किंवा ते पैसे योग्य हाताळण्याची तुमच्यातील क्षमता जसे बजेट (आर्थिक मर्यादांनुसार जमा-खर्चाची तोंड मिळवणी करण्याची कला), गुंतवणूक , क्रेडिट मॅनेजमेंट आणि आर्थिक मॅनेजमेंट इत्यादी सारख्या आर्थिक संकल्पना समजून घेऊन ते अंगिकारणे हे सर्व आर्थिक साक्षरतेत येतं. हे आर्थिक नियोजन जीवनात विविध टप्प्यावर तुमची मदत करेल. भविष्यात आपल्या बजेटनुसार आधीच केलेलं नियोजन ज्यामुळे अशा व्यक्ती निराश होत नाहीत त्याच्यात उमेद कायम असते आणि त्याची फसवणूक होत नाही. भविष्याची तरतूद असल्यामुळे ते वर्तमान काळातही सुखी,समाधानी असतात. 

पण आर्थिक साक्षर नसलेला व्यक्ती हा उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक करतो. नियोजनाच्या अभावामुळे गुंतवणूक कमी होते आणि खर्च जास्त असतो. यातून कर्ज निर्माण होते, बँकेतील क्रेडिट स्कोअर कमी होतो. 


आर्थिक साक्षरता समजून घेताना खालील घटक प्रभावी ठरतात. 

बचत (Savings)

बचत ही आर्थिक सुरक्षा, स्थिर वर्तमान आणि उज्ज्वल भविष्याची हमी देते. बचत भविष्याची काळजी कमी तर करतेच पण अनावश्यक खर्चही आपसूक कमी करते. एक सुनिश्चितता जीवनात बचत हा प्रकार आणते.  हे आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचे आहे; तसेच आर्थिक अनुशासनात मदत होऊ शकते. नियमित बचत खात्यासह, तुम्ही प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम भरण्यास वचनबद्ध आहात. त्या बदल्यात, बँक किंवा बिल्डिंग सोसायटी तुम्हाला त्यांचे चालू खाते किंवा सामान्य बचत खात्यात मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त व्याजदर देते.

गुंतवणूक (Investment)

गुंतवणूक म्हणजे स्वतःचे किंवा आपल्या व्यवस्थापनाचे जास्तीचे पैसे अधिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने बँकेच्या स्वाधीन करणे वा दुसऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला त्याच्या उद्योगासाठी देणे. गुंतवणूक अतिरिक्त मासिक उत्पन्न मिळवण्याचा मार्ग आहे तसेच भविष्यात अनेक फायदे करून देईल. इक्विटी, डेब्ट साधने, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट आणि गोल्ड हे सर्वात लोकप्रिय इन्व्हेस्टमेंट शक्यता आहेत.

What is Financial literacy

बजेट (Budget) 

आपले बजेट काय आहे. त्यावर आर्थिक नियोजनाचा पाया रचला जातो. आपण किती खर्च करणार आहोत आणि किती बचत याचे नियोजन कारणं गरजेचं आहे. विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमा-खर्चाची तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प असतो. पारिवारिक किंवा व्यक्ती असोत आर्थिक धोरण, व्यावहारिक योजना हे आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी बजेट मांडणं आणि त्याचं ताळमेळ राखणं महत्त्वाचे आहे. 

कर्ज (Loan)

स्वतःकडे पैसे किंवा आर्थिक स्रोत नसल्यामुळे दुसऱ्याकडून उधार घेतलेले पैसे किंवा आर्थिक साहाय्य आणि हे कर्ज कुणालाच घ्यायला आवडत नाही पण पारिवारिक गरजा, शिक्षण, आजारपण या अत्यावश्यक गरजांसाठी कर्ज घेणं योग्य आहे. पण विनाकारण कर्ज घेऊ नका आणि घेतलं, तरी ते भरण्याचे आधीच नियोजन करा.

आर्थिक साक्षरतेचे फायदे (Benefits of Financial Literacy)

• पैशाचे योग्य नियोजन 
• अर्थपूर्ण गुंतवणूक 
• हुशारीने आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता
• आर्थिक सुसंगतपणा 
• सुनिश्चित आर्थिक ध्येयप्राप्ती 
• खर्चावर नियंत्रण आणि बचत 
• आर्थिक भविष्य नियोजन 
• विमा, कर्ज, गुंतवणूक आणि क्रेडिट कार्ड वापरताना नैतिक निर्णय घेण्यात वाढ
• बचत करण्याची आपसूक सवय लागते 
• आर्थिक साक्षरतेचे घटक