Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Electricity Bill: वीज बिल भरताना केवळ 5 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार रोखीने, महावितरणचा निर्णय!

राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार ग्राहकांना येत्या 1 ऑगस्ट 2023 पासून केवळ पाच हजार रुपये पर्यंतची वीज बिले रोखीने भरता येणार आहेत. ज्या ग्राहकांची वीज बिले 5 हजारांपेक्षा अधिक असतील त्यांना ऑनलाइन पद्धतीने वीज वितरण कंपनीच्या खात्यात पैसे जमा करावे लागणार आहेत.

Read More

Tail Strike Incidents: इंडिगो एअर लाइन्सला 30 लाखांचा दंड; लँडिंग करताना सहा महिन्यात 4 अपघात

इंडिगो एअरलाइन्सला नागरी उड्डाण विभागाने 30 लाख रुपये दंड केला आहे. विमान लँड करताना मागील सहा महिन्यात चार अपघात झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. 'टेल स्ट्राइक' अपघात म्हणजे काय जाणून घ्या.

Read More

कफ सिरप प्रकरण! गांबिया सरकार भारतावर कायदेशीर कारवाई करणार

भारताला फार्मसी ऑफ द वर्ल्ड असे म्हटले जाते. मात्र, काही फार्मा कंपन्यांनी दूषित आणि बनावट औषधे परदेशात निर्यात केल्याचे भारतीय आरोग्य यंत्रणांच्याही तपासात उघड झाले होते. भारतीय कफ सिरपच्या सेवनामुळे 70 बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Read More

Vedanta group: फॉक्सकॉननं साथ सोडली मात्र आता निवडला जागतिक दर्जाचा जोडीदार, वेदांताची कोणासोबत भागीदारी?

Vedanta group: वेदांता ग्रुपसोबतची भागीदारी फॉक्सकॉननं सोडली. त्यानंतर वेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल यांनी नव्या भागीदाराचा शोध सुरू केला. आता त्यांच्या शोधाला यश आलं आहे. एक जागतिक दर्जाच्या कंपनीसोबत त्यांची भागीदारी होणार आहे.

Read More

Sweet Corn Farming : स्वीट कॉर्न ठरतंय जास्तीचा नफा देणारे पीक; जाणून घ्या कशी करावी लागवड ?

Sweet Corn Farming : पावसाळा सुरू होताच प्रत्येकाला मक्याचे गरम कणीस खायची इच्छा होते. त्यामुळेच या दिवसात कणसांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. शिवाय मागणी वाढल्यामुळे कणसांना चांगला भावही मिळतो. शेतकऱ्यांसाठी मका हे चांगले आर्थिक उत्पन्न देणारे पीक आहे. त्याच दृष्टीने जाणून घेऊया, स्वीट कॉर्न लागवड कशी केली जाते?

Read More

WhatsApp Scammers : सावधान! 'ही' ट्रीक वापरून, स्कॅमर्स काढताय पैसे

ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करण्यासाठी स्कॅमर्सना विविध मार्ग मोकळे आहेत. कारण, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि डेटा पॅक फुल असल्याने बऱ्यापैकी सर्वजण मोबाईलवरच वेळ घालवतात. या गोष्टीमुळे स्कॅमर्सना फसवणूक करण्याची आयती संधी मिळाली आहे. यावेळी स्कॅमर्सनी जागतिक योग दिनाला (World Yoga Day) टार्गेट करत लोकांची फसवणूक केली आहे. नेमका हा काय प्रकार होता ते जाणून घेऊया.

Read More

Panic Rice Buying: तांदूळ खरेदीसाठी अमेरिकेत भारतीयांची झुंबड! केंद्र सरकारच्या निर्णयाचा 'NRI'ला फटका

Panic Rice Buying: संयुक्त राज्य अमेरिकेत सध्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या रांगा एखाद्या तिकीट खिडकीवरच्या नाहीत, तर तांदूळ खरेदीसाठी मॉलबाहेर तसंच रेस्टॉरंटबाहेर लागल्याचं दिसत आहे. विशेषत: तिथल्या भारतीयांवर ही वेळ आली आहे. काय आहेत कारणं? पाहू...

Read More

भारताच्या बिगर बासमती तांदूळ निर्यात बंदीचे जगभर पडसाद, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केंद्र सरकारला केली 'ही' विनंती

Rice Export Ban: 20 जुलै 2023 रोजी भारताने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. जगभरात तांदूळ निर्यात करण्यामध्ये भारताचा 40 % वाटा आहे. त्यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश असल्याने, इतर देशांची तांदळा बाबत होणारी अडचण लक्षात घेता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) केंद्र सरकारला ही बंदी उठवण्याची विनंती केली आहे.

Read More

LED bulb special offer : एलईडी बल्बवर खास डिस्काउंट! जाणून घ्या Amazon वरील ऑफर

LED bulb special offer : विजेची बचत करण्यासाठी घरातील सामान्य बल्ब बदलून एलईडी बल्ब लावले जात आहे. कारण बाजारात परवडणाऱ्या किमतीत एलईडी बल्बचे अनेक ऑप्शन आहेत. एलईडी बल्ब हे सामान्य बल्बपेक्षा चांगला प्रकाश देतात. एलईडी बल्ब जास्त काळ चालतो, त्याची गॅरंटी दिली असते. एलईडी बल्बवर खास ऑफर्स दिले जात आहे, जाणून घेऊया.

Read More

YouTuberला इन्कम टॅक्स विभागाची 2.6 कोटींची नोटीस; तुम्ही असा निष्काळजीपणा करू नका!

Income Tax Notice to YouTuber: यूट्यूबवर न्यूज चॅनेल चालवणाऱ्या एका यूट्यूबरला इन्कम टॅक्स विभागाने तब्बल 2.6 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. IT डिपार्टमेंटने त्याला ही सहावी नोटीस पाठवली आहे.

Read More

Crop loss due to Heavy rain: महागाईत पावसाची भर, विविध राज्यांत कमी-जास्त पाऊस; पिकांचं अतोनात नुकसान

Crop loss due to Heavy rain: अतिवृष्टीनं देशभरातल्या विविध राज्यांत धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. विशेषत: शेतकऱ्यांच्या पिकांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून हाताशी आलेलं पीक वाहून गेलं आहे, तर कुठे साठवलेला माल वाया गेला आहे.

Read More

Fuel Price: इंधन दरवाढीनं सर्वसामान्य बेजार, तेल कंपन्या मात्र कमावत आहेत प्रचंड नफा

Fuel Price: इंधन दरवाढीनं सर्वसामान्य अक्षरश: हैराण झाला आहे. पेट्रोलच्या किंमती शंभरीपार गेल्या आहेत. तर डिझेल शंभरीजवळ आहे. त्यामुळे महागाईदेखील वाढली आहे. ही एकीकडे परिस्थिती असताना दुसरीकडे तेल कंपन्यांना मात्र सर्वसामान्यांशी काहीही देणेघेणे दिसत नाही. नफ्याच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे.

Read More