Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget Friendly Pilgrimage Places:अधिक मासात देवदर्शनासाठी विदर्भातील बजेट फ्रेंडली तीर्थक्षेत्र माहित आहेत का?

Budget friendly places

Budget friendly Sites of Pilgrimage: असं म्हणतात की अधिक मासात जास्तीत जास्त धार्मिक कामे केली जातात. तुम्हाला जर देव दर्शनाला जायचं असेल तर किती खर्च येऊ शकतो? विदर्भातील कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही देव दर्शनाला जाऊ शकता? ते जाणून घेऊया.

Budget friendly places : 18 जुलै रोजी अधिक मास सुरू झाला आहे. या महिन्यामध्ये अनेक भाविक भक्त विविध ठिकाणी दर्शनाला जातात. असं म्हणतात की, या महिन्यामध्ये जास्तीत जास्त धार्मिक कामे केली जातात. तुम्हाला जर देव दर्शनाला जायचं असेल तर किती खर्च येऊ शकतो? विदर्भातील कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही देव दर्शनाला जाऊ शकता? ते जाणून घेऊया. विदर्भामध्ये शेगांव, धापेवाडा, आदासा, अमरावती, नागपूर याठिकाणी अधिक महिन्यामध्ये देव दर्शनासाठी जाऊ शकता. या ठिकाणीपैकी सर्व ठिकाणी बस आणि ट्रेनने प्रवास करता येऊ शकतो. नागपूरवरून काही ठिकाणे अगदी 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 

शेगांव

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नागपूरहून हे ठिकाण 318 किलोमीटर आहे. शेगावला पोहोचण्यासाठी नागपूरवरून बस आणि ट्रेनची सेवा आहे. नागपूरहून शेगांव जाण्यासाठी खर्च 1000 रुपये होतो. रेल्वेने कमी खर्चात तुम्ही शेगावला पोहोचू शकता. शेगावला श्री संत गजानन महाराजांची समाधी आहे. तिथे दररोज हजारो भाविकांची गर्दी असते. 

धापेवाडा 

धापेवाडा हे ठिकाण नागपूरवरून 25 किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी तुम्ही नागपूहून बसने, ऑटोने, बाईकने जाऊ शकता. तिथे विठ्ठल रुख्मिणीचे प्राचीन मंदिर आहे. धापेवाडा हे विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. कमीत कमी खर्चात तुम्ही धापेवाडाला पोहचू शकता. तिथे गेल्यानंतर तुम्हाला पंढरपूरमध्ये गेल्याचा आनंद मिळतो. 

आदासा

आदासा हे ठिकाण नागपूरवरून 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. कळमेश्वर तालुक्यातील या ठिकाणी गणपतीचे प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही नागपूरवरून बसने, ऑटोने, बाईकने जाऊ शकता. अधिक महिन्यामध्ये तुम्ही प्रथम दर्शन येथील गणपतीचे घेऊ शकता. विदर्भातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून आदासा या गावाला ओळखले जाते.

अमरावती

अमरावतीमध्ये अंबादेवीचे प्राचीन मंदिर आहे. नवरात्री, अधिक मासमध्ये या मंदिरामध्ये खूप गर्दी असते. अधिक महिन्यामध्ये देवीची ओटी भरण्यासाठी तिथे महिला श्रद्धेने येतात. नागपूरवरून अमरावतीसाठी बसेसची सुविधा असते . त्याचबरोबर ट्रेनने सुद्धा तुम्ही प्रवास करू शकता.

नागपूर

विदर्भातील नागपूरमध्ये अनेक भक्तिधाम आहेत. त्यापैकी स्वामी नारायण मंदिर हे तेथील आकर्षण ठरले आहे. दिल्ली येथील अक्षरधामची प्रतिकृती या मंदिराला आकारली आहे. नागपूरमधून तुम्ही सिटी बस आणि खासगी वाहनाने त्या ठिकाणी पोहचू शकता. कमीत कमी खर्चात अधिक महिन्यामध्ये तुम्ही विदर्भातील तीर्थक्षेत्राचे दर्शन घेऊ शकता.