भारत पेट्रोलियमनं (Bharat Petroleum Corporation Limited) नुकतेच आपले तिमाहीचे आकडे जाहीर केले. यात कंपनीला झालेला नफा (Profit) भुवया उंचावणारा आहे. बीपीसीएल ही सार्वजनिक क्षेत्रातली एक कंपनी आहे. कंपनीनं या आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीत 10 हजार 664 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीनं जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब सिद्ध झाली आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा 6 हजार 147.94 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. शेअर बाजाराला (Share market) उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीत कंपनीनं तिमाहीचे डिटेल्स दिले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चं तेल स्वस्त
एकीकडे कच्च्या तेलाच्या दरात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी घसरण झाली, मात्र याचा परिणाम इंधनाच्या दरावर अद्यापही झालेला नाही. सर्वसामान्यांना अजूनही चढ्या दरानं इंधन खरेदी करावं लागत आहे. काही आंतरराष्ट्रीय घडामोडी, युद्धजन्य परिस्थिती यामुळे तेलाच्या किंमती वाढल्या होत्या. मात्र कालांतरानं त्यात घसरणही झाली. तरीदेखील पेट्रोल-डिझेलचे दर मात्र अद्यापही स्थिर आहेत. ते कमी झालेले नाहीत. दरम्यान, भारत आपल्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास 85 टक्के तेल आयात करतो.
Driven by exceptional marketing and refining performance, we are delighted to share yet another outstanding performance of BPCL in Q1 FY 23-24.#Q1Results #Quarterly #Results #BPCL pic.twitter.com/yEB1Yobmle
— Bharat Petroleum (@BPCLimited) July 26, 2023
मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक फायदा
बीपीसीएलचं करपूर्व उत्पन्न जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या तुलनेत 41.8 टक्क्यांनी वाढलं आहे. ते 15 हजार 809.7 टक्के इतकं नोंदवलं गेलं. मागच्या वर्षी म्हणजेच 2022-23मध्ये कंपनीनं 2 हजार 892.34 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. तर या वर्षी तो 10 हजार 664 कोटी रुपये इतका प्रचंड प्रमाणात नोंदवला गेला आहे.
ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीपासून नफा
कच्च्या तेलाच्या किंमती कमी होऊनही पेट्रोल-डिझेलचे दर कंपन्यांनी कमी केले नाहीत. याचा फायदा कंपन्यांना झाला. बीपीसीएलची आकडेवारी पाहता, मागच्या वर्षीचा झालेला तोटा कंपनीनं यंदा भरून काढला आहे. बीपीसीएलसोबत इतर सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनीदेखील किंमती कमी केल्या नाहीत. यात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑइल यांचा समावेश आहे. मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर-डिसेंबरच्या (2022) तिमाहीपासून या तिनही कंपन्या नफा कमावत आहेत.