Private Veterinary College: महाराष्ट्रात प्रत्येक फील्डमधील अनेक महाविद्यालये आहेत. पण पशुवैद्यकीय महाविद्यालये ही बोटावर मोजण्या जोगी आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठांतर्गत प्रायवेट पशुवैद्यकीय महाविद्यालये सुरू करता येणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारने या निर्णयाला मान्यता दिली आहे. हा निर्णय मंजूर झाल्याने पशू आणि मत्स्य व्यवसाय विज्ञान महाविद्यालयांना 23 वर्षांनंतर दुसऱ्या महाविद्यालयाची सोबत मिळणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात पशुवैद्यक फार कमी असल्याने यात तरुणांना संधी मिळणार आहे. जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती.
देशात 75 हजार पशुवैद्यकांची गरज
महाराष्ट्रात अत्यंत कमी पशुवैद्यकीय महाविद्यालये असल्याने अनेक विद्यार्थी हे शिक्षण घेऊ शकत नव्हते. आता ज्या विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये आवड आहेत ते सहज करू शकणार आहेत. आता या निर्णयाला मंजूरी मिळाल्याने झाल्याने मुंबई, नागपूर, शिरवळ, उदगीर येथे असलेल्या पशू आणि मत्स्य व्यवसाय विज्ञान महाविद्यालयांना त्याचबरोबर नवीन तयार झालेल्या महाविद्यालयांना विद्यापीठाची संलग्नता दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रीय पशू विज्ञान अकादमीच्या धोरणात्मक लेखात मिळालेल्या माहितीनुसार, देशात 75 हजार पशुवैद्यकांची गरज आहे, पण त्यातील निम्मेच आपल्याकडे आहेत. 35 हजार 500 इतकेच पशुवैद्य आहेत. म्हणजेच 50 टक्के पशुवैद्य कमी आहेत. भारतीय पशुचिकित्सा परिषदेच्या मानांकनावरून मिळालेल्या माहितीनुसार, 2035 पर्यंत भारतात 1 लाख 25 हजार पशुवैद्य पाहिजे आहेत. अशी माहिती राष्ट्रीय पशू विज्ञान अकादमीने दिली आहे, ही जागा भरून काढण्यासाठी प्रायवेट महाविद्यालय शिवाय आपल्याला पर्याय नाही.
महाराष्ट्रात 6 हजारहून अधिक पशुवैद्यक पदवीधरांची गरज
राष्ट्रीय कृषी आयोगाने प्रत्येकी 50 हजार पशूंसाठी एक पशुवैद्यक जर आपण गृहीत धरला तर महाराष्ट्रात एकूण पशुधनांची संख्या ही 33.1 लाख इतकी आहे. महाराष्ट्रात सध्या 6 हजारहून अधिक पशुवैद्यक पदवीधरांची आवश्यकता आहे. ही तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन जर तुम्ही हा कोर्स पूर्ण केला तर तुम्हाला रोजगार प्राप्त होऊ शकतो.