Maharashtra Tour Package: महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळे आहेत. जे वर्षभर फिरून सुद्धा संपणार नाहीत. पावसाळ्याच्या दिवसांत अनेक लोकं ट्रीप प्लान करतात. काही वेळा पैशाच्या अभावी ते राहून जाते. महाराष्ट्राला लाभलेली ड्रीम सिटी मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया हे अतिशय सुंदर स्थळ आहे. त्याचबरोबर औरंगाबाद विशेषतः प्राचीन किल्ले, गुहा आणि ऐतिहासिक इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. या सर्व ठिकाणी जाण्याची तुमची इच्छा असेल तर IRCTC कडून तुमच्यासाठी एक चांगला चान्स आहे. जर तुम्हालाही बजेटमध्ये ट्रीप करायची असेल तर जाणून घ्या बुकिंग कशी करायची?
Table of contents [Show]
पॅकेज डिटेल्स
पॅकेजचे नाव | मार्व्हेल्स ऑफ महाराष्ट्र एक्स हैदराबाद |
पॅकेज कालावधी | 3 रात्री आणि 4 दिवस |
प्रवास मोड | फ्लाइट |
कव्हर केलेले स्टेशन | औरंगाबाद, एलोरा, नाशिक, शिर्डी |
पॅकेजमध्ये मिळणाऱ्या सुविधा
- येण्या-जाण्यासाठी फ्लाइट तिकीट
- राहण्यासाठी हॉटेलची व्यवस्था
- 3 दिवस नाश्ता 2 रात्री जेवण
- ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा
- हा टुर 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
प्रवासासाठी किती शुल्क आकारले जाईल
- एका व्यक्तीसाठी 25,550 रुपये
- 2 व्यक्तीसाठी प्रति व्यक्ती 21,200 रुपये
- 3 व्यक्तीसाठी प्रति व्यक्ती 20,950 रुपये
- मुलांसाठी बेडसह 20,000 (5-11 वर्षे)
- बेडशिवाय 12,150
पॅकेजबाबत विशेष माहिती
या पॅकेजला महाराष्ट्रातून जॉइन करण्यासाठी तुम्ही ट्विटमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. त्यांच्याकडे जागा उपलब्ध असल्यास तुम्ही महाराष्ट्रातून हा टुर जॉइन करू शकता, आणि फ्लाइटचा प्रवास करून महाराष्ट्र दर्शन करू शकता.
बुकिंग कशी करायची?
या पॅकेजमधून ट्रीप करण्यासाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुकिंग करू शकता. त्याचबरोबर IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करू शकता. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.