वंदे भारत ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा असाव्यात, या उद्देशानं रेल्वेतर्फे काही निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे विस्तारालाही चालना मिळेल. अधिकाधिक प्रवासी आकर्षित होतील. त्याचाच एक भाग म्हणून वंदे भारत ट्रेनचे कोच बदलण्यात येणार आहेत. पुढच्या काही वर्षांत तब्बल 8000 नवे कोच तयार केले जाण्याची ही योजना आहे. जुन्या कोचच्या जागी हे नवे कोच बसवले जातील.
Table of contents [Show]
कोचसह विस्तारही होणार
वंदे भारत ट्रेन केवळ फास्टच नाही तर विविध सुविधांनी युक्त अशी ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये सध्या 16 कोच आहेत. मात्र त्यातला कोचची संख्या प्रतिसादानुसार बदलता येवू शकते. दोन तृतियांश नवे डबे करण्याची सध्या योजना आहे. सध्या विविध राज्यांत ही ट्रेन सुरू आहे. टप्प्याटप्प्यानं यात वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.
खर्च किती?
वंदे भारतच्या या नव्या डब्यांसाठी जवळपास 130 कोटी रुपयांचा खर्च होण्याचा अंदाज आहे. या नव्या डब्यांच्या कामाला सुरुवातही झाली आहे. स्लीपर व्हेरिएंट असणारे जवळपास 3200 कोच तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. चेन्नईतल्या इंटिग्रल कोच फॅक्टरी याठिकाणी 1600 नवे डबे बनवले जात आहेत. त्यासह एमसीएफ रायबरेली आणि कपूरथला याठिकाणीदेखील नव्या कोचचं उत्पादन केलं जाणार आहे. दरम्यान, सध्याची वंदे भारतही अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे.
कमाल के फीचर्स से लैस अत्याधुनिक #VandeBharatExpress ट्रेन! pic.twitter.com/Fv15A5QohG
— Ministry of Railways (@RailMinIndia) July 28, 2023
काय म्हणाले रेल्वे मंत्री?
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या कोचविषयी त्यातही स्पीपर कोचविषयी माहिती दिली. वंदे भारत ट्रेनचं स्लीपर व्हर्जन पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. सध्या ज्याप्रमाणे लॉन्ग रूटच्या गाड्या आहेत, त्याचप्रमाणे याही ट्रेन चालतील. नवे डबे वैशिष्ट्यपूर्ण असतील. सध्या तरी त्याचं डिझाइन दोनप्रकारे असणार आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. सध्याच्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचं प्रमाण 25 आहे. यातदेखील वाढ केली जाणार आहे.
वंदे भारत ट्रेनच्या कोचचं उत्पादन करण्यासाठी विविध कंपन्यांना निविदा देण्यात आल्या आहेत. भारताच्या रेल विकास निगम लिमिटेडसोबत रशियन रोलिंग स्टॉक प्रमुख टीएमएचची भागीदारी असणार आहे. यामार्फत 120 स्पीपर कोच तयार केले जातील. भेल BHEL जवळपास 80 कोच तयार करणार आहे. फ्रान्सिसी प्रमुख एल्सटॉम 100 वंदे भारत ट्रेन तयार करेल. यात अॅल्युमिनियमचा वापर केला जाणार आहे.