Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Farmers Helpline: शेतकरी अडचणीत असल्यास ‘या’ व्हाट्सॲप नंबरवर करा तक्रार, कृषी विभागाकडून होईल मदत

Farmers in Maharashtra

Farmers Helpline: शेती करत असतांना शेतकऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी नैसर्गिक आपत्ती, कधी बियाणे बोगस निघणे या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी शासनाकडून एक व्हाट्सॲप नंबर दिला आहे. त्या नंबर व्हाट्सॲप नंबर वरून तक्रार नोंदवावी लागते.तो नंबर 9822446655 हा आहे, याबाबत माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Farmer Grievance Redressal : शेती करत असताना शेतकऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी नैसर्गिक आपत्ती, कधी बियाणे बोगस निघणे या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी शासनाकडून एक व्हाट्सॲप नंबर दिला आहे. त्यानंबर व्हाट्सॲप नंबरवरुन तक्रार नोंदवावी लागते. तो नंबर 9822446655 हा आहे. याबाबत माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

या मेलवरही करू शकता तक्रार 

कृषि आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन केले आहे. हा कक्ष 24 X 7 कार्यरत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी controlroom.qc.maharashtra@gmail.com हा इमेल सुद्धा दिला आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे कोणालाही सांगण्यात येणार नाही, ते गोपनीय स्वरूपात ठेवण्यात येतील.

बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी 

खरीप हंगामात राज्यात सरासरी 142 लाख हेक्टर पेरणी झाली आहे. म्हणजेच जुलैच्या अखेर 81 टक्के पेरणी झाली आहे. काही पिकांची पुनर्लागवडही झाली आहे. चालू खरीप हंगामामध्ये प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. राज्यामध्ये 19.30 लाख क्विंटल बियाण्याचापुरवठा झाला आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काही गोष्टी काळजीपूर्वक केल्या पाहिजेत. जेणेकरून त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. आर्थिक नुकसान होणार नाही. 

अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी केले पाहिजे. तेथून मिळाळलेली पावती व टॅग जपून ठेवावे. अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 31जुलै 2023 आहे. सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या विमा योजनेत नोंद केली पाहिजे. पीक विमा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. 

कृषी विभागाशी संपर्क करू शकता 

खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते, कीटकनाशके किंवा बियाणे याबाबत तक्रार करायची असल्यास 8446117500, 8446221750, 8446331759 यावर कॉनटॅक्ट करा. कृषिविषयक योजनांच्या माहितीसाठी 18002334000 हा कृषी विभागाचा हेल्पलाईन क्रमांक आहे. शेतकरी बांधव आवश्यकतेनुसार याचा वापर करू शकतात, असेही विभागामार्फत सांगण्यात आले आहे.