जेट एअरवेज ही दिवाळखोर कंपनी मागील काही काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत होती. आता यासाठी जालान-कॅलरॉक कन्सोर्शियमना (Jalan kalrock consortium) परवानगी देण्यात आली आहे. कन्सोर्टियमनं याबाबत माहिती दिली आहे. डीजीसीए म्हणजेच विमान वाहतूक नियमन (Directorate General of Civil Aviation) या विभागाकडून विमान परमिट जारी केलं जातं. मागे दोनवेळा जेट एअरवेजला परमिट देण्यात आलं होतं. मात्र कंपनी उड्डाण घेऊ शकली नव्हती. कालमर्यादा संपल्यानं त्या परमिटची मुदतही निघून गेली होती. आता पुन्हा एकदा परमिट जारी करण्यात आलं आहे.
काय म्हटलं कन्सोर्शियमने?
जालान-कॅलरॉक कन्सोर्शियमनं यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. आम्ही लवकरात लवकर जेट एअरवेजचं उड्डाण करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. याविषयीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. 28 जुलै 2023ला डीजीसीएकडून एओसीदेखील (An air operator's certificate) मिळालं आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पुढची दिशा ठरवली जाईल, असं कन्सोर्शियमनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
#Jalan-Kalrock Consortium, which is the resolution applicant for the cash-strapped #JetAirways, has successfully secured the renewal of the air operator certificate (#AOC) for the airline from the Directorate General of Civil Aviation (#DGCA). pic.twitter.com/fsitYz4HiM
— IANS (@ians_india) July 31, 2023
आर्थिक संकटांचा करावा लागला सामना
जेट एअरवेजला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मागच्या 4 वर्षांपासून म्हणजेच 17 एप्रिल 2019पासून कंपनीचे फ्लाइट बंद आहे. दिवाळखोरीच्या प्रक्रियेत कंपनी गेली. यात जालान-कॅलरॉक कन्सोर्शियमनं बोली लावली. खरं तर या बोलीनंतर मागच्या वर्षीच डीजीसीएनं विमान उड्डाण करण्यास कंपनीला परवानगी दिली होती. मात्र कंपनी यात यशस्वी ठरली नाही. आता कंपनीचे फ्लाइट कधी आकाशात झेपावणार याची उत्सुकता असणार आहे.
शेअर बाजारात काय स्थिती?
जेट एअरवेजची विमानसेवा पुन्हा सुरू होण्याच्या वृत्तानंतर मुंबई शेअर बाजारात कंपनीचे शेअरनं उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. जवळपास 5 टक्क्यांनी शेअर मजबूत झाले अन् 51 रुपयांच्या पुढे गेले. 52 आठवड्यांच्या उच्चांक 107 रुपये आहे.