Bajaj Auto Plant In Brazil: देशी वाहन निर्मितीतील आघाडीची कंपनी बजाज ऑटो परदेशात आपला पहिला प्रकल्प उभारणार आहे. यापूर्वी बजाज ऑटोकडून विविध देशात फक्त गाड्यांची अॅसेंब्ली केली जायची. निर्मिती भारतातच होत असे. मात्र, आता ब्राझीलमध्ये पहिला निर्मिती प्रकल्प सुरू होणार आहे. दुचाकी आणि तीनचाकी गाड्या निर्यात करणारी बजाज ऑटो ही आघाडीची कंपनी आहे.
पल्सर आणि डॉमिनर ब्राझीलमध्ये प्रसिद्ध
बजाज कंपनीची Bajaj Do Brasil ही सहकंपनी ब्राझीलमध्ये निर्मिती प्रकल्पाचे काम पाहणार आहे. लॅटिन अमेरिकेमध्ये बजाज ऑटोने बाजारपेठ काबीज केली आहे. (Bajaj Auto plant in Brazil) स्थानिक बाजारपेठेत निर्मिती प्रकल्प सुरू केल्याने गाड्यांची अधिक चांगल्या प्रकारे निर्मिती करता येईल.
तसेच ग्राहकांच्या गरजा, मागणीनुसार उत्पादनात तत्काळ बदल करता येतील, असे कंपनीचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांनी म्हटले. पल्सर आणि डॉमीनर या दुचाकी ब्राझीलमध्ये प्रसिद्ध आहेत. इतर गाड्यांसह या दोन मॉडेलची निर्मीती नव्या प्रकल्पात केली जाईल.
90 देशांमध्ये बजाज कंपनीच्या गाड्यांची विक्री
बजाज ऑटोचे मुख्यालय पुणे येथे आहे. कंपनीच्या 90 पेक्षा जास्त देशांमध्ये गाड्यांची निर्यात होतात. कंपनी वितरकांमार्फत परदेशी बाजारात गाड्यांची विक्री करते. निर्मिती प्रकल्प अद्याप परदेशात नव्हता. (Bajaj Auto plant in Brazil) ब्राझीलमधील पहिला प्रकल्प उत्तर ब्राझीलमधील Manaus Special Economic Zone मध्ये असेल. या प्लांटमधून महिन्याला 20 हजार गाड्यांची निर्मिती केली जाईल. पुढील वर्षभरात काम सुरू होईल, असे शर्मा यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रियन कंपनी केटीएममध्ये बजाजचे 48% शेअर्स आहेत. या KTM स्पोर्ट्स गाड्यांची निर्मितीही ब्राझीलच्या प्लांटमध्ये केली जाईल. ब्रिटनची दुचाकी निर्मिती कंपनी Triumph सोबतही बजाजचा सहकार्य करार आहे. या कंपनीचा निर्मिती प्रकल्प आधीपासून ब्राझीलमध्ये आहे.
लॅटिन अमेरिकेतील दुचाकी बाजारपेठ
ब्राझील, अर्जेंटिना, चीली, मेक्सिको सह इतर अनेक देश लॅटिन अमेरिकेत येतात. या सर्व देशांमध्ये बजाजच्या दुचाकी आणि तीनचाकी गाड्यांची विक्री होती. यातील प्रमुख बाजारपेठ ब्राझील आहे. बजाजच्या एकूण निर्यात होणाऱ्या गाड्यांपैकी 20% गाड्या ब्राझीलमध्ये निर्यात होतात. 2022 मध्ये ब्राझीलमधील दुचाकी गाड्यांची विक्री 1 कोटींच्या पुढे गेली आहे. यातील जास्तीत जास्त वाटा कंपनीला मिळावा म्हणून बजाज तेथे प्लांट सुरू करणार आहे.