LPG Prices: एलपीजी सिलिंडर बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून, म्हणजेच 1 ऑगस्टपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा या कंपन्यांनी केली असून आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मागील महिन्यात, 4 जुलै 2023 रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी 7 रुपयांची किरकोळ वाढ केली होती. या महिन्यात मात्र 100 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे.
इतर शहरांमध्ये काय असेल भाव?
LPG सिलिंडरच्या किंमती प्रत्येक शहरासाठी वेगवगेळ्या असतात. यात त्या त्या राज्यांचा कर, दळणवळण खर्च व आदी आवश्यक खर्चाचा समावेश असतो. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल झाल्यानंतर मुंबईत त्याची विक्री 1640.50 रुपयांना केली जाणार आहे. तर कोलकातामध्ये याची किंमत 1802.50 रुपये असणार आहे. सोबतच चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1852.50 रुपये इतकी असणार आहे.
?दिलासा: 19 किलोचे व्यावसायिक #lpgcylinder झाले स्वस्त!
— Sagar Bhalerao (@SagarMahamoney) August 1, 2023
?व्यावसायिक #LPG सिलिंडरच्या किमती ₹100 पर्यंत कमी !
?मात्र, 1मार्चपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही. pic.twitter.com/5lwGqgPXBd
घरगुती सिलेंडरच्या किंमतीत बदल नाही!
एकीकडे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली असताना, घरगुती सिलेंडरच्या किंमतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना आहे त्याच किमतीत सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरने हजार रुपयांचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडर 1102 रुपयांना विकला जात आहे.