Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Fake Medicines: सन फार्माच्या तक्रारीमुळे 2 कोटींची बनावट औषधे जप्त; मोठ्या शहरांमध्ये फेक ड्रग्जचा पुरवठा

पश्चिम बंगालच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने विविध राज्यात धाडी टाकून आरोपींना अटक केली. अँटिबायोटिक, हृदयरोग यासह विविध आजारांवरील ब्रँडेड कंपन्यांची बनावट औषधे मिळून आली. कोणत्या राज्यांत फेक औषधांचा पुरवठा झाला याचा तपास सुरू आहे.

Read More

Study in India: देशातील सर्व अभ्यासक्रमांची माहिती, नोंदणी एकाच पोर्टलवर; व्हिसा ते ऑफर लेटरची सुविधा एका क्लिकवर

Study in India: स्टडी इन इंडिया हे पोर्टल भारतातील उच्च शिक्षणविषयीची संपूर्ण माहिती देणारे परिपूर्ण असे पोर्टल आहे. या पोर्टलमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमापासून, पीएचडी, तसेच योग, आयुर्वेद, शास्त्रीय कला अशा भारताचे वैशिष्ट्य असलेल्या शाखांच्या अभ्यासक्रमांची माहिती दिली जाणार आहे.

Read More

Food Inflation: डाळी, पालेभाज्या महागल्याने सामान्य जनता चिंतेत, सरकार आणि RBI ला सतर्कतेचा इशारा

जून 2023 च्या Monthly Economic Review मध्ये वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने केंद्र सरकार आणि RBI ला अन्नधान्य महागाई वाढल्याबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे. सरकारने याबाबत योग्य ती कारवाई करावी आणि नेहमीच्या गरजेच्या अन्नधान्यांच्या किंमती नियंत्रणात आणाव्यात असे या अहवालात म्हटले आहे.

Read More

Indian Economy: भारताची अर्थव्यवस्था तेजीत, यंदाचा मान्सून सर्वांसाठी ठरेल फायद्याचा, वित्त मंत्रालयाची माहिती

अलीकडच्या वर्षात सरकारने भांडवली खर्चावर अधिक भर दिला असल्याने आणि पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणात केल्यामुळे खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच यानिमित्ताने खासगी क्षेत्रातील गुंतवणूक, रोजगार निर्मिती, उत्पन्न आणि उत्पादकता देखील वाढली असल्याचे म्हटले आहे.

Read More

आधारकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! UIDAI 'ही' सेवा मोफत देत आहे, तारखेत झाली वाढ!

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आता आधारकार्ड अपडेट करण्याची मुदत 14 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे. ज्या नागरिकांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट केले नाही. ते आता ऑनलाईन त्यांचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकणार आहेत.

Read More

Tata's Kashmiri Saffron : टाटाची कंपनी आता विकणार काश्मिरी केशर; ग्राहकांना मिळणार 100% शुद्ध केशर

यापुढे ग्राहकांना मोठ्या विश्वासाने शुद्ध काश्मिरी केशर खरेदी करता येणार आहे. टाटा समूहाच्या हिमालयन या कंपनीकडून शुद्ध केशरची विक्री केली जाणार आहे. हिमालयन कंपनी आता ग्रेड 1 चे काश्मिरी केशर(kashmiri saffron) ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहे.

Read More

Air India: एअर इंडियाचा तोटा आणखी वाढणार, चालू वर्षात 14000 कोटींचा लॉस होण्याची शक्यता

Air India: एअर इंडियावर टाटा ग्रुपने आतापर्यंत 13000 कोटी खर्च केले होते. मात्र वर्षभरात कंपनीत सुधारणा करण्यात टाटा ग्रुपला मोठा खर्च करावा लागला आहे. याशिवाय नव्या विमानांची देखील ऑर्डर देण्यात आली आहे.

Read More

Home Loan EMI: दोन वर्षात होम लोनचा EMI 20 टक्क्यांनी वाढला; कर्जापेक्षा जास्त व्याज भरण्याची वेळ

गृह कर्जदारांसाठी EMI चा बोजा मागील 2 वर्षात 20 टक्क्यांनी वाढला आहे. कर्जाच्या रकमेपेक्षा एकूण व्याज जास्त देण्याची वेळ ग्राहकांवर येत आहे. तसेच परवडणाऱ्या घरांची विक्री दिवसेंदिवस कमी होत आहे. व्याजदर वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांना होम लोन महागलं आहे.

Read More

US Credit Rating: अमेरिकेच्या क्रेडिट रेटिंगला धक्का! भारतीय भांडवली बाजार कोसळला

एखाद्या देशाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यास पतमानांकन संस्थांकडून क्रेडिट रेटिंग खाली आणले जाते. देशावरील एकूण कर्जाचा बोजा, कर्ज फेडण्याची क्षमता, अर्थव्यवस्थेतील वाढ असे अनेक घटक रेटिंग कमी करण्यास कारणीभूत ठरतात. अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग कमी केल्याचा परिणाम भारतीय भांडवली बाजारावर झाला.

Read More

Cyber Fraud : सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणूक झाल्यास पीडितांना त्वरित भरपाई द्यावी; संसदीय समितीची शिफारस

यापुढे सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील पीडितांना वित्तीय संस्थांकडून पीडितांना तत्काळ पैशाची भरपाई केली जावी, असे आवाहन करणारी शिफारस भाजपचे खासदार जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे.

Read More

Happy IndiGo Day Sale : स्वस्तात विमान प्रवासाची संधी; इंडिगोकडून 17 % पर्यंत डिस्काउंट, 17 रुपयात आवडते सीट

इंडिगो (Indigo)एअर लाइन्सने नागरिकांना तिकिट बुकिंगवर 17% पर्यंत सूट देण्याची ऑफर सुरू केली आहे. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही किमान 2000 रुपयापर्यंत बचत करू शकणार आहात. तसेच इंडिगोने आपल्या 17 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत प्रवाशांना 17 रुपयांपासून आवडते सीट बुक करण्याचीही ऑफर दिली आहे.

Read More

Amazon नंतर आता Flipkart ने जाहीर केला स्पेशल सेल, ग्राहकांची होणार चांदी!

Amazon आणि Flipkart दोन्ही कंपन्यांच्या स्पर्धेत फायदा मात्र ग्राहकांना होणार आहे हे नक्की. दोन्ही कंपन्यांनी आपापल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना इलेक्ट्रोनिक्स वस्तू, टॅबलेट, लॅपटॉप, स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, फ्रीज, कपडे, स्मार्ट वॉच,शूज आदी वस्तूंवर 40-80% पर्यंत सवलत दिली जाणार आहे.

Read More