Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

VI Facing Challenges In India: एकेकाळी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी होती वोडाफोन, आता मोजतेय शेवटच्या घटका!

Vodafone Idia: देशातील तिसरी आणि जगातील 11वी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाला (VI) आपला उद्योग बंद करावा लागू शकतो. ग्राहकांची संख्या सतत कमी होत आहे आणि कर्ज वाढत आहे. एकेकाळी ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी होती. रिलायन्स जिओने (Jio) टेलिकॉम बाजारात प्रवेश केल्यानंतर वोडाफोनल कंपनीला उतरती कळा लागली.

Read More

Toll Rates Hike: 'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वरील प्रवास महागला, 1 एप्रिलपासून टोल दरवाढ

Expressway Toll Rates Hike:एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने टोल दरवाढीबाबत सांगितले की टोलच्या शुल्कात दरवर्षी 6% वाढ अपेक्षित आहे. एक्सप्रेस वे वर किती टोल असावा आणि त्यात वार्षिक किती वाढ करावी याबाबत राज्य सरकारने 9 ऑगस्ट 2004 रोजी अध्यादेश जारी केला आहे.

Read More

Mass Layoffs : डिस्नेच्या कर्मचाऱ्यांना भरली धडकी, कॉस्ट कटिंगची पहिली फेरी जाहीर

Mass Layoffs : मनोरंजन क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या डिस्नेनं (Disney) कॉस्ट कटिंग करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांना धडकी भरलीय. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात (Cost Cutting) केली जाणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय. त्यातच ही तर केवळ पहिली फेरी असणार आहे. त्यामुळे कंपनी नेमकी काय भूमिका घेते, हे महत्त्वाचं आहे.

Read More

Vande Bharat train seats : 'वंदे भारत'चं 225 कोटींचं कंत्राट टाटा स्टीलला... प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा

Tata Steel : मेक इन इंडिया (Make in India) या उपक्रमांतर्गत वंदे भारत या अत्याधुनिक रेल्वेत चकचकीत अशा आसनांची व्यवस्था करण्यात आलीय. टाटा उद्योगसमुहाच्या टाटा स्टीलनं याचं कंत्राट मिळवलं आहे. वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) या गाडीसाठी जागतिक दर्जाची आसनव्यवस्था आणि इंटिरिअरचं हे काम टाटा स्टीलकडे आहे.

Read More

Stamp Duty may Hike In Maharashtra: घर खरेदी महागणार, राज्य सरकार स्टॅम्प ड्युटी वाढण्याच्या तयारीत

Stamp Duty may Hike In Maharashtra: येत्या 1 एप्रिल 2023 पासून राज्यात दस्त नोंदणीवरील मुद्रांक शुल्क 1% ने वाढण्याची शक्यता आहे. स्टॅम्प ड्युटीबरोबरच रेडी रेकनरचे देखील सुधारित एप्रिलपासून लागू होणार असल्याची चर्चा सध्या वरिष्ठ पातळीवर सुरु आहे.

Read More

Maharashtra Export: राज्यातील निर्यातीत घसरण, 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी निर्यातवाढ आवश्यक

Maharashtra Export: मागील सहा वर्षात महाराष्ट्रातून होणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीत घसरण झाली आहे. देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा मागील पाच वर्षात 8% घसरल्याची आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. राज्याला 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कारखाना उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Read More

Investments in J&K : पुण्यामुंबईसारखं जम्मू काश्मीरंही IT हब होईल; पण, दहशतवादासोबतच 'ही' आहेत आव्हाने

पुण्यामुंबईसारखं जम्मू काश्मीरही IT हब होण्याच्या मार्गावर आहे. दुबईतील एमार ग्रुपने नुकतेच काश्मिरात 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच इतरही गुंतवणुकदार काश्मिरात गुंतवणूक करण्यास तयार आहेत. मात्र, हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या भूप्रदेशाचा विकास होण्यामध्ये अनेक अडथळे आहेत. दहशतवादासोबतच इतर आव्हानांमुळे काश्मिरच्या विकासात अडथळे येत आहेत.

Read More

Amazon Layoffs: अमेझॉनची पुन्हा कर्मचारी कपातीची घोषणा, आणखी 9000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले

Amazon Cuts 9000 Jobs: जगभरात कर्मचारी कपातीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक दिग्गज कंपन्या त्यांच्या एकूण वर्क फोर्स मधून मोठी कर्मचारी कपात करत आहेत. टेक जायंट अॅमेझॉनने 9000 कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

Read More

Adani Group News : हिंडेनबर्ग अहवालाचा इफेक्ट, अदानी समूहाकडून 34900 कोटींचा PVC प्रकल्प स्थगित

Adani PVC Project: हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहात मोठी हालचाल बघायला मिळाली आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात अदानी एन्टरप्राइजेस लिमिटेडने (AEL) स्पेशल इकॉनॉमिक झोन अंतर्गत जमिनीवर कोळसा टू पीव्हीसी (Coal To PVC) निर्मिती करण्यात येणार आहे. मुंद्रा पेट्रोकेम लिमिटेड येथील जागा या प्रकल्पासाठी निर्धारित केली आहे. मात्र नुकतेच अदानी समूहाने या प्रकल्पाचे काम स्थगित केले आहे.

Read More

TCS CEO Resign: 'टीसीएस'चे सीईओ राजेश गोपीनाथन यांचा तडकाफडकी राजीनामा, कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनात मोठा उलटफेर

TCS CEO Resign: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गोपीनाथन यांनी गुरुवारी 15 मार्च 2023 रोजी राजीनामा दिल्याचे टीसीएसने म्हटले आहे. गोपीनाथन यांच्या जागी के. कृतिवासन यांची नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Read More

Salary Hike 2023: पगारवाढीची गुड न्यूज मिळणार! सॅलरी वाढवताना कंपनी कोणत्या गोष्टी विचारात घेते माहितीये का?

वर्षभर काम केल्यानंतर एखादा कर्मचारी कंपनीकडून जर कोणती अपेक्षा ठेवत असेल तर ती चांगल्या पगारवाढीची. महागाईने कंबरडे मोडलं असताना पगारवाढ तेवढीच मदतीला धावून येते. आधीच कोरोनामुळे दोन वर्षांपासून अनेक कंपन्यांनी चांगली पगारवाढ दिली नाही. आयटी कंपन्यांचा यास अपवाद आहे. मात्र, आता नोकरकपातीतून त्याचे पडसादही दिसत आहेत. भारतात यावर्षी कंपन्या सरासरी किती पगारवाढ करतील, याचा अंदाज या लेखात पाहूया

Read More

HP DAM and PUShP Portal: उन्हाळ्यात विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने सुरु केले HP DAM आणि PUShP पोर्टल

HP DAM and PUShP Portal: उन्हाळा ऋतूत कूलर, Ac व फ्रीज यांचा वापर जास्त प्रमाणात होतो ही मागणी लक्षात घेऊन सरकारने हाय प्राइज डे अहेड (HP-DAM) आणि सरप्लस पॉवर पोर्टल (PUShP) हे सुरू केले आहे. जाणून घेऊया या दोन विभागांबद्दल.

Read More