Table of contents [Show]
बेकार बनवण्याची स्पर्धा
मागच्या काही कालावधीत आयटी, ई-कॉमर्स आणि इतर खासगी क्षेत्रातल्या मोठ-मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा सपाटा लावलाय. संबंधित कर्मचाऱ्यांवरचा खर्च अनावश्यक असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं आहे. अॅमेझॉननं (Amazon) गेल्या वर्षी तब्बल 18,000 कर्मचाऱ्यांना काढलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरमधून (Twitter) मागच्या महिन्यातभरात साडे तीन आणि या महिन्यात आणखी 200 जणांना काढण्यात आलं. अॅक्सेंचरनं 19,000 कर्मचाऱ्यांना कमी केलं. या कंपन्यांच्या यादीत आता डिस्नेची भर पडलीय. इथंही शेकड्यात नाही, तर हजारात आणि तीदेखील टप्प्याटप्प्यात कर्मचारी कपात केली जाणार आहे. त्यामुळे या बड्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना काढून त्यांना बेकार बनवण्याची स्पर्धा लागलीय की काय, अशी चर्चा सुरू झालीय.
45 हजार कोटींची बचत
डिस्नेकडून कॉस्ट कटिंगची पहिली फेरी जाहीर करण्यात आलीय. या पहिल्या फेरीत जवळपास 7 हजार नोकऱ्यांवर परिणाम होणार असल्याचं समोर आलंय. डिस्नेनं दिलेल्या माहितीनुसार, या पहिल्या फेरीत कनिष्ठ कर्मचारी तर कमी होणारच आहेत. मात्र यात दोन वरिष्ठ उपाध्यक्षचांही समावेश असून त्यांना आपली पदं सोडावी लागणार आहेत. कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय. जवळपास 5.5 अब्ज डॉलर्सची बचत होणार आहे. भारतीय रुपयांत विचार करायचं झाल्यास 45 हजार कोटी रुपयांहून अधिकचा पैसा कंपनी वाचवणार आहे.
स्ट्रिमिंग टीव्ही विभाग तोट्यात
डिस्नेचे सीईओ बॉब इगर यांनी सोमवार, 27 मार्चला कर्मचार्यांना मेमो दिला. यात समाविष्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुढच्या चार दिवसांमध्ये अधिकच्या सूचना मिळतील. त्यानुसार त्यांना प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा लगेच पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये असणार आहे. तर त्यानंतरच्या टप्प्यांचं नियोजनही सुरू असून कर्मचारी मात्र सैरभैर झाले आहेत. हजारो कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड यामुळे कोसळणार आहे. कंपनीचा स्ट्रिमिंग टीव्ही विभाग तोट्यात आहे. डिसेंबर 2022ला संपलेल्या तिमाहीमध्ये एक अब्जाहूनही अधिक तोटा कंपनीला सहन करावा लागला. त्यामुळे आर्थिक कामगिरी सुधारण्याच्या हेतूनं ही जबाबदारी इगर या कंपनीला देण्यात आली. नोव्हेंबर 2022मध्ये इगरनं हे काम सुरू केलंय. स्ट्रिमिंग टीव्ही व्यवसाय नफ्यात आणणं हे मोठं आव्हान असणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता कर्मचारी कपात सुरू झालीय.
एप्रिलमध्ये मोठा टप्पा
कंपनीच्या कर्मचार्यांची संख्या कमी झालीय. त्यामुळे ज्यांच्या पदांवर हा परिणाम झालाय, अशा कर्मचार्यांना सूचित करण्यास सुरुवात झालीय. पुढील चार दिवसांत पहिल्या टप्प्यातल्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्याचं काम असणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये एक मोठा टप्पा असणार आहे. तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला अंतिम टप्पा असणार आहे, असं इगरनं आपल्या एका निवेदनात म्हटलं आहे. 7,000 कर्मचारी कपात हे सध्याचं कंपनीचं लक्ष्य असणार आहे. यात कंपनीच्या दोन वरिष्ठ उपाध्यक्षांचा समावेश असणार आहे.
स्टॉक वधारला
या सर्व कर्मचारी कपात प्रक्रियेचा कंपनीच्या सर्व भागांवर परिणाम होणार आहे. थीम पार्क, ईएसपीएन स्पोर्ट्स नेटवर्क याचाही यात समावेश आहे. मात्र कंपनीनं या गोष्टी नाकारल्या असून कर्मचारी कपातीचा कोणताही परिणाम होणार नाही. आमच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. भविष्यात यशस्वी होण्यासाठी काही निर्णय घेत असल्याचं कंपनीनं म्हटलंय. दरम्यान, सोमवारी डिस्नेचा स्टॉक 1.6 टक्क्यांनी वाढून 695.62 डॉलरवर बंद झाला. 2022मध्ये स्टॉक 44 टक्क्यांनी घसरला होता.