वंदे भारत एक्स्प्रेस ही अत्याधुनिक रेल्वे गाडी केंद्र सरकारने प्रवाशांच्या सेवेत दाखल केली. यामध्ये प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. यातली सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे आसनव्यवस्था. या गाडीतल्या आसनांची व्यवस्था टाटा स्टीलकडून करण्यात आलीय. वजनानं अत्यंत हलक्या स्वरुपाची ही आसनं आहेत. टाटा स्टीलचे (Tata steel) तंत्रज्ञान विभागाचे उपाध्यक्ष देबाशीष भट्टाचार्जी यांनी याविषयी माहिती दिली. वंदे भारत रेल्वेच्या गाड्यांसाठी आसनं आणि इंटिरिअरची जबाबदारी आमच्याकडे आहे. 225 कोटी रुपयांचं हे कंत्राट आहे. हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनच्या जवळपास 23 डब्यांसाठी हलक्या वजनाची आसनं आणि 16 डब्यांसाठी फायबर-रिइन्फोर्स्ड पॉलिमर कंपोझिट यावर आधारित इंटिरिअर पॅनेल टाटा स्टील पुरवणार आहे, असं भट्टाचार्य म्हणाले.
कोचचंही कंत्राट टाटा स्टीलला, काय सत्य?
वंदे भारत हायस्पीड ट्रेनसाठीच्या कोचचं कंत्राटही टाटा स्टीलला मिळाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर टाटा स्टीलनं स्पष्टीकरण दिलंय. याबाबतची माहिती पूर्णत: चुकीची आहे. हे वृत्त निराधार आहे. यासंबंधीच्या कोणत्याही ऑर्डर्स आमच्याकडे नाहीत. राष्ट्रीय ट्रान्सपोर्टर (रेल्वे) या माध्यमातून बोली लावण्यात आली होती. या प्रक्रियेनंतरच टाटा स्टीलला संबंधित कंत्राट मिळालं आहे. याचं मूल्य जवळपास 225 कोटी रुपये असल्याचं भट्टाचार्य यांनी सांगितलं आहे.
Under the '#MakeInIndia' initiative, we've employed fibre reinforced composites to create world-class seating systems & interior solutions for the #VandeBharatExpress. A big impact indeed towards India's progress!#TataSteel #SmallRoleBigImpact #SmallRoleHugeImpact #VandeBharat pic.twitter.com/GwDZneibR1
— Tata Steel (@TataSteelLtd) March 23, 2023
फायबर-रिइन्फोर्स्ड पॉलिमर कंपोझिट डिझाइन सीट
चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (Integral Coach Factory) वंदे भारत या हायस्पीड ट्रेन्सची निर्मिती करते. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत हा विभाग कार्य करतो.तर टाटा स्टील या इंटिग्रल कोच फॅक्टरीला देशभर पसरलेल्या भागीदार सुविधांच्या मार्फत उपकरणं पुरवते. काही गाड्यांसाठी आम्ही आधीच साहित्य पुरवलं आहे. फायबर-रिइन्फोर्स्ड पॉलिमर कंपोझिट डिझाइन सीट बेंगळुरू-म्हैसूर सेक्टरमध्ये आधीपासूनच वापरले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. अशा अत्याधुनिक उपकरणांसह टाटा स्टील नवीन उत्पादनं विकसित करत राहणार आहे. भविष्यातदेखील रेल्वे आणि त्यासंबंधीच्या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी टाटा स्टील योगदान देईल, असं त्यांनी सांगितलं.
वंदे भारत हायस्पीड ट्रेनविषयी...
चेन्नईतल्या आयसीएफमध्ये या ट्रेनचा जन्म झाला. 2016 ते 2018 यादरम्यान पहिल्या दोन ट्रेनची निर्मिती झाली. त्यानंतर त्याची चाचणी करण्यात आली. चाचणीवेळी ट्रेनचा वेग सर्वाधित ताशी 180 किमी होता. या चाचण्या साधारणपणे 2018 मध्ये पूर्ण करण्यात आल्या. तर 15 फेब्रुवारी 2019 या साली दिल्ली ते वाराणसी मार्गावर पहिली वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली.