हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहात मोठी हालचाल बघायला मिळाली आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात अदानी एन्टरप्राइजेस लिमिटेडने (AEL) स्पेशल इकॉनॉमिक झोन अंतर्गत जमिनीवर कोळसा टू पीव्हीसी (Coal To PVC) निर्मिती करण्यात येणार आहे. मुंद्रा पेट्रोकेम लिमिटेड येथील जागा या प्रकल्पासाठी निर्धारित केली आहे. मात्र नुकतेच अदानी समूहाने या प्रकल्पाचे काम स्थगित केले आहे.
गुजरामधील मुंद्रा येथील 34900 कोटी रुपयांचा PVC प्रकल्प अदानी समूहाने स्थगित केला आहे. कारण समूहाला आर्थिक संसधानांच्या एकत्रिकरणावर सध्या भर द्यायची आहे. हिंडेनबर्गच्या खळबळजनक अहवालानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या अहवालामुळे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीतून 140 अब्ज डॉलर्सची घट झालेली आहे. यामुळे गुंतवणूकदार समूहात गुंतवणूक करण्याबाबत सावध भूमिका घेत आहेत. गुंतवणूक दारांच्या विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी समूहाचे अतोनात प्रयत्न चालले आहे. समूह लवकरच या उद्योगात पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
समूहाने यापूर्वीच हिंडेनबर्गने लावलेले आरोप नाकारले आहेत. समूहातील आर्थिक व्यवस्थापनेच्या दृष्टीने समूहातील हालचालींना वेग आला आहे. यामुळे सध्या हा प्रकल्प अदानी समूहाने अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे.
काय होता पीव्हीसी प्रकल्प (What was the PVC project?)
PVC हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वापरात असलेला प्लॅस्टिकचा प्रकार आहे. भारतात पीव्हीसीची मागणी दरवर्षी 7 टक्के दराने वाढत आहे. यामुळे अदानी समूहाने या प्रकल्पाची योजना आखली होती. 1.4 लाख टन दरवर्षी देशभरात PVCची निर्मिती होते तरीही देश बाहेरील देशांतून होत असलेल्या निर्यातीवर अवलंबून आहे. अदानी समूहाने हे लक्षात घेऊन देशभरात योग्य पुरवठा होईल अशा प्रकल्पाची पायाभरणी केली होती मात्र आता हा प्रकल्प स्थगित झाला आहे.
समूहाने खरेदी केली यंत्रसामग्री (Machinery purchased by the group)
कोळसा ते पीव्हीसी तयार करण्यासाठी अदानी समूहाने 7000 कोटींची यंत्रसामग्री देखील खरेदी केली होती. मात्र प्रकल्प संपुष्टात आला आहे. आम्ही लवकरच या प्रकल्पात पुरनागमन करू असे अदानी समूहाने स्पष्ट केले आहे.
“समूहातील प्रत्येक प्रकल्पाचे आर्थिक नियोजन झालेले आहे. उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेली क्षमता समूहात आहे. लवकरच आमच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकीचा योग्य परतावा मिळवून देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे” असे समूहातील एका सूत्राने सांगितले.