Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investments in J&K : पुण्यामुंबईसारखं जम्मू काश्मीरंही IT हब होईल; पण, दहशतवादासोबतच 'ही' आहेत आव्हाने

Investments in J&K

पुण्यामुंबईसारखं जम्मू काश्मीरही IT हब होण्याच्या मार्गावर आहे. दुबईतील एमार ग्रुपने नुकतेच काश्मिरात 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच इतरही गुंतवणुकदार काश्मिरात गुंतवणूक करण्यास तयार आहेत. मात्र, हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या भूप्रदेशाचा विकास होण्यामध्ये अनेक अडथळे आहेत. दहशतवादासोबतच इतर आव्हानांमुळे काश्मिरच्या विकासात अडथळे येत आहेत.

Challenges in Kashmir development: भारताच्या उत्तर दिशेचं टोक म्हणजे जम्मू काश्मीर. हिमालय पर्वतरांगा आणि निसर्ग सौंदर्यामुळे काश्मीर कायमच आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. पर्यटन आणि कृषी हाच काश्मीरच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मात्र, येत्या काळात काश्मीरसुद्धा आयटी हब म्हणून नावारुपाला येऊ शकतं. परदेशी गुंतवणुकदारांनी काश्मीरमध्ये उद्योग उभारणीस सुरुवात केली आहे.

मॉल, आयटी पार्क आणि इतरही उद्योग उभे करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीतील एमार (UAE investment in Jammu Kashmir) या कंपनीने काश्मीरमध्ये 500 कोटी रुपये गुंतवण्यास तयारी दर्शवली आहे. यापैकी 250 कोटीचा 10 हजार स्केअर फूटावर मॉल उभा राहणार आहे. श्रीनगरमध्ये हा भव्य मॉल सुरू होईल. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले आहे. दिल्लीतील रिअल इस्टेट क्षेत्रातील काही कंपन्यांनी देखील काश्मिरात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

जम्मू काश्मीर राज्यासाठी नवी इंडस्ट्रीयल पॉलिसी सुमारे दोन वर्षांपूर्वी आखण्यात आली होती. त्याला आता यश मिळताना दिसत आहे. 5 हजारांपेक्षा जास्त स्थानिक आणि परकीय कंपन्यांचे गुंतवणुकीबाबतचे प्रस्ताव आले आहेत. सोबतच लहानमोठे उद्योग दरदिवशी नव्याने सुरू होत आहेत. त्यामुळे काश्मीरी नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. काश्मीर खोऱ्यात उद्योगधंदे जरी सुरू होत असले तरी अनेक आव्हानेही आहेत, (Challenges in Kashmir development) ज्याचा परिणाम काश्मीरच्या विकासावर होऊ शकतो.

काश्मीरच्या विकासातील प्रमुख आव्हाने

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद (Terrorism in Kashmir Valley)

काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरू आहेत. पाकिस्तानकडून काश्मीरवर दावा सांगितला जातो. इतकेच नाही तर पाक पुरस्कृत दहशतवादही खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. काश्मीरमधे विकास होऊ द्यायचा नाही, काश्मीर बाहेरील नागरिकांना प्रदेशात येऊ द्यायचे नाही, असा पवित्रा दहशतवादी गटांनी आणि फुटीरतावादी गटांनी घेतला आहे. त्यामुळे इंडस्ट्रीयल भागात घातपाती कारवाया होण्याची दाट शक्यता आहे. काश्मीरमधे भविष्यात आयटी हब उभे राहिल्यास त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

सोबतच फुटीरतावादी गटांकडून काश्मीरात दंगली आणि जाणीवपूर्वक बंद घडवून आणण्यात येतात. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास इंटरनेट सेवाही बंद केली जाते. कित्येक आठवडे याआधीही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. याचा परिणाम उद्योगधंद्यांवर होऊ शकतो. उद्योगांच्या वाढीसाठी प्रादेशिक स्थैर्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्फ्यु, संपर्क व्यवस्थेतील अडथळ्यांमुळे उद्योगांना तोटा होऊ शकतो. 

उद्योग व्यवसायांसाठी मनुष्यबळ उपलब्धता (Skilled Labour availability)

काश्मीर खोऱ्यात उद्योग व्यवसाय उभे राहिल्याने स्थानिकांना रोजगार मिळती ही खरी बाब आहे. मात्र, कुशल मनुष्यबळाची गरज भारतातील इतर भागांतून पूर्ण करावी लागेल. जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर येथे भारतातील कोणत्याही व्यक्तीला नागरिकत्व मिळू शकते. काश्मिरात नागरिकत्व मिळवणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

दरम्यान, काश्मीर बाहेरील व्यक्तींवर जीवघेणे हल्ला होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. 'टार्गेटेड किलिंग' च्या अनेक घटना घडल्या आहेत. बाहेरच्या राज्यातून आलेले मजूर आणि उद्योजकांनाही ठार मारण्यात आले होते. त्यामुळे जर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांकडून टार्गेटेड किलिंग्ज वाढल्या तर काश्मीरात नोकरी व्यवसायासाठी इतर भागातून जाण्यास नागरिक धजावणार नाहीत. याचा परिणाम उद्योग व्यवसायांवर होऊ शकतो. 

major-challenges-in-industrial-development-of-kashmir.jpg

थेट केंद्र शासनाचे नियंत्रण - (Control From central govt)

जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर लेफ्टनंट गव्हर्नरची नियुक्ती प्रशासक म्हणून करण्यात आली आहे. मात्र, सर्व निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जातात. केंद्रातील सरकार बदलल्यानंतर त्याचा परिणाम काश्मीरबाबतच्या धोरणांवर होऊ शकते. काश्मीरात उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदार स्थिर सरकारची अपेक्षा ठेवतील. मात्र, फुटीरतावादी, पाक पुरस्कृत दहशतवाद आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे काश्मीरातील सरकारी धोरणांमध्ये सातत्याने बदल पाहायला मिळू शकतात.

पर्यावरणाची हानी (Impact on Jammu Kashmir environment due to Industrialization)

काश्मीर खोरे हे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र आहे. येत्या काळात काश्मीरात उद्योगधंदे सुरू झाले तर पर्यावरणाला हानी पोहचू शकते. इतर राज्यांच्या तुलनेत काश्मीरमधील प्रदूषण कमी आहे. मात्र, उद्योगांकडून तेथील नद्या आणि पर्वतीय प्रदेशात सांडपाणी सोडल्यास त्याचा पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावरही होऊ शकतो. अतिक्रमण, डोंगर सपाटीकरण, वृक्षतोड, पाणी, हवा प्रदूषण न होऊ देता औद्योगिक विकास करणे हे मोठे आव्हान आहे. अन्यथा पुढील काही वर्षात काश्मीर पर्यटनस्थळ म्हणून स्थान गमावू शकते.