Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

VI Facing Challenges In India: एकेकाळी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी होती वोडाफोन, आता मोजतेय शेवटच्या घटका!

vodafone idea

Vodafone Idia: देशातील तिसरी आणि जगातील 11वी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाला (VI) आपला उद्योग बंद करावा लागू शकतो. ग्राहकांची संख्या सतत कमी होत आहे आणि कर्ज वाढत आहे. एकेकाळी ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी होती. रिलायन्स जिओने (Jio) टेलिकॉम बाजारात प्रवेश केल्यानंतर वोडाफोनल कंपनीला उतरती कळा लागली.

कर्जात बुडालेली दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडियाच्या (VI) अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी उत्तम कनेक्टिव्हिटी व परवडणाऱ्या दरात प्लॅन लाँच करून ग्राहकांचा विश्वास कमावला आहे. भारतातील तिसरी आणि जगातील 11वी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियावर 2.3 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. एका अहवालानुसार, दूरसंचार क्षेत्रातील वाढती स्पर्धा, वाढते कर्ज आणि आवश्यक निधी उभारण्यास लागणारा वेळ यामुळे पुढील काही महिन्यांत वोडाफोन आयडिया आपला देशातील उद्योग बंद करू शकतात.

वोडाफोन आयडिया या दोन कंपन्यांचे एकेकाळी देशातील टेलिकॉम क्षेत्रात वर्चस्व होते.  टाटा समूहाची देखील यात गुंतवणूक होती. मात्र VI ही कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. कंपनीचा शेअर 52 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे.

Vodafone Idea ही आदित्य बिर्ला समूह आणि UK स्थित Vodafone Inc यांचा संयुक्त उद्यम आहे. 1995 मध्ये बिर्ला कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणून या कंपनीची सुरूवात झाली. त्याच वर्षी कंपनीला गुजरात आणि महाराष्ट्र सर्कलमध्ये GSM (ग्लोबल सिस्टिम फॉर मोबाईल कम्युनिकेशन ) आधारित सेवांसाठी परवाना मिळाला. यानंतर 1996 मध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज आणि अमेरिका स्थित कंपनी एटीअँडटी यांनी या व्यवसायात गुंतवणूक केली. यानंतर कंपनीचे नाव बिरला एअँडटी कम्यूनीकेशन्स हे झाले. 2002 टाटा सेल्युलर लिमिटेड यात कंपनीचे विलिनीकरण झाल्यानंतर कंपनीचे नाव पुन्हा बदलून बिरला टाटा एअँडटी असे झाले यावर्षी कंपनीने संयुक्त गुंतवणुकीतून आयडिया लाँच केले 2004 पासून कंपनीने नफा कमवायला सुरुवात केली होती.

2006 मध्ये, टाटा समूहाने कंपनीतील आपले संपूर्ण शेअरहोल्डिंग आदित्य बिर्ला समूहाकडे हस्तांतरित केले. अशा प्रकारे टाटा समूह या कंपनीपासून पूर्णपणे वेगळा झाला. 2009 मध्ये कंपनीने देशभरात आपली सेवा सुरू केली. कंपनीचे काम चांगले चालले होते, पण 2016 मध्ये रिलायन्स जिओने प्रवेश केला आणि टेलिकॉम क्षेत्रातील इतर सर्व कंपन्यांचे अस्तित्व डबघाईला येऊ लागले. Jio लाँच होताच डेटाच्या किमतीत मोठी घट झाली. एक काळ असा होता की एक जीबी डेटाची किंमत 250 रुपये होती. तेव्हा ग्राहकांना मासिक डेटा 154 एमबी मिळायचा. पण जिओच्या आगमनानंतर, हाय स्पीड 4G डेटाची किंमत सुमारे 13 रुपये प्रति जीबीवर आली आहे.

31 डिसेंबर 2022 च्या आकडेवारीनुसार, वोडाफोन आयडियाचे देशात सुमारे 23 कोटी ग्राहक आहेत. पण यातील बहुतांश ग्राहक 2G आणि 3G आहेत. यामुळे कंपनीचे  प्रति वापरकर्ता सरासरी उत्पन्न खूपच कमी आहे. पुढील प्रगतशील तंत्रज्ञान पाहता वोडाफोन आयडियाआवश्यक गुंतवणूक करू शकणार नाही आणि 5G सेवा सुरू करू शकणार नाही. यामुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या आणखी कमी होईल. कंपनीवर 2.3 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.  आर्थिक भार पेलवला नाही तर वोडाफोन आयडियावर भारतातील सेवा बंद करण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.  

News Source :  navbharattimes.com