जगभरात कर्मचारी कपातीचे प्रमाण वाढत आहे. अनेक दिग्गज कंपन्या त्यांच्या एकूण वर्कफोर्समधून मोठी कपात करत आहेत. टेक जायंट अॅमेझॉनने आणखी 9000 कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. Amazon ने दुसऱ्यांदा मोठी कर्मचारी कपात केली आहे. कंपनीने विविध विभागांमधून हजारो कर्मचारी कमी केले आहेत. हा निर्णय कठीण असला तरी कंपनीच्या भवितव्यासाठी तो आवश्यक होता असे अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी (Amazon CEO Andy Jassi) यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी मेटाने (Meta) 10000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते. याआधी Amazon कंपनीने 18000 कर्मचाऱ्यांना कर्मचारी कमी करण्याची कंपनीची ही दुसरी वेळ होती. टेक कंपन्यांची वाढती नोकर कपात अनेकांसाठी डोकेदुखी ठरली. यामुळे अनेकांना नोकरीवर गदा येण्याची भीती आहेत. गेल्या तीन महिन्यात कंपनीने एकूण 27000 कर्मचारी कपात केली आहे. AWS (Amazon Web Services) व ट्विच विभागात ही 9000 कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जाहिरात क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश असणार आहे.
ऐच्छीकपणे कंपनी सोडण्याची ऑफर (Voluntary Company Exit Offer In 2022)
नोव्हेंबर 2022 मध्ये सीईओ जॅसी यांनी PXT (People Experience and Technology Solutions) मधील काही कर्मचाऱ्यांना ऐच्छीक कंपनी सोडण्याची ऑफर दिली होती आणि या कर्मचारी कपातीबद्दल त्यांना सूचना देखील देण्यात आली होती. जॅसी यांनी सांगितल्याप्रमाणे कर्मचारी कपातीचा निर्णय स्वतंत्र होता. कंपनीने सध्यस्थिती बघून व अवश्यकतेनुसार हा निर्णय घेतला आहे.
माजी कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य (Financial Assistance to Ex Employees)
Amazon कंपनीने घेतलेल्या कर्मचारी कपातीच्या निर्णयामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळे आर्थिक नियोजनावर थेट परिणाम झाला आहे. यामुळे नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनी आर्थिक सहाय्य, विमा व प्लेसमेंट साठी मदत या सुविधा पुरवणार आहे. इतर टेक दिग्गज कंपन्यांनी देखील मोठी कर्मचारी कपात केली आहे. Google, अल्फाबेट इंक व मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांचा यात समावेश आहे.