Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Zoom Job Cut: मंदीची झळ आणखी एका अमेरिकन कंपनीला, आधी 1300 कर्मचाऱ्यांना काढले आता अध्यक्षांचीच सुट्टी केली

Zoom Job Cut: कोरोना लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन बैठकांकरिता लोकप्रिय झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म झूममध्ये 15% कर्मचारी कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजेच कोणतेही कारण न देता अध्यक्षांना कामावरुन काढून टाकण्यात आल्याने अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे.

Read More

Flight Fares to Goa, Dubai : गोव्याला, दुबईला जाण्यासाठी फ्लाइटच्या भाड्यात वाढ

यावर्षी होळीनिमित्त अनेकांनी कुठेतरी भेट देण्याचा बेत आखला असेल. बाजाराचा कल पाहता, गोवा, जयपूर, काश्मीर सारखी भारतीय ठिकाणे तसेच दुबई आणि सिंगापूर सारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांना सर्वाधिक मागणी आहे. अशा स्थितीत या ठिकाणांवरील फ्लाइट्सचे बुकिंग जवळपास पूर्ण होत आहे आणि पण विमान भाड्यात 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Read More

India Crude Oil Import: रशियन क्रूड ऑइलची विक्रमी आयात, भारत ठरला सर्वात मोठा खरेदीदार

India Crude Oil Import भारताने वर्षभरात इतर देशातून आयात केलेल्या क्रूड ऑइलपैकी (Crude Oil) एक तृतीयांश ऑइलच पुरवठा करणारा हा देशाचा एकमेव सर्वात मोठा पुरवठादार आहे. भारताची रशियाकडून क्रूड ऑईलची आयात फेब्रुवारीमध्ये विक्रमी 1.6 दशलक्ष बॅरल प्रतिदिन झाली आहे आणि ती आता पारंपारिक पुरवठादार इराक आणि सौदी अरेबियाकडून होणाऱ्या एकत्रित आयातीपेक्षा जास्त आहे.

Read More

Expensive Rewards to Employees : ‘या’ पाच कंपन्यांनी जगात ले-ऑफ सुरू असताना कर्मचाऱ्यांना दिल्या महागड्या गिफ्ट्स

Expensive Rewards to Employees : एकीकडे मेटा, गुगल, ट्विटर सारख्या मोठ्या टेक कंपन्यांमध्ये नोकर कपातीचं सत्र सुरू आहे. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना महागडी गिफ्ट्स दिली आहेत.

Read More

IndiGo Aircraft Deal: इंडिगो करणार विमानांची सर्वात मोठी खरेदी; नुकताच एअर इंडियाने केलेला विक्रम काढणार मोडीत

IndiGo Aircraft Deal: भारतीय एअरलाईन इंडिगो (IndiGo) विमान निर्माती कंपनी बोईंग (Boing) आणि वर्तमान पुरवठादार एअरबस (Airbus) या दोघांशी 500 हून अधिक प्रवासी विमाने ऑर्डर करण्यासाठी प्राथमिक बोलणी करत आहे. एअर इंडिया'ने (Air India) नुकताच सर्वाधिक विमाने खरेदी करण्याचा विक्रम आपल्या नावी केला आहे. अनेकांच्या मतानुसार इंडिगो विमान खरेदीच्या एका नवीन विक्रमाला गवसणी घालणार आहे.

Read More

Mukesh Ambani’s announcement: 40 हजार कोटींची गुंतवणूक करून आंध्रमध्ये सर्वात मोठे डिजिटल नेटवर्क बनवणार

Mukesh Ambani’s announcement: मुकेश अंबानी म्हणाले की, यामध्ये आमच्या 4G नेटवर्कमध्ये राज्यातील 98 टक्के लोकांचा समावेश आहे. ते म्हणाले की 2023 च्या अखेरीस संपूर्ण भारतात 5G चे रोलआउट पूर्ण होईल. याचा अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राला फायदा होईल आणि आंध्र प्रदेशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

Read More

Swiggy Cloud Kitchen Buisness: स्विगीने क्लाउड किचन बिझनेस का विकला? जाणून घ्या

कंपनीने (Swiggy Cloud Kitchen Business) आपला क्लाउड किचन व्यवसाय Kitchens@ ला विकला आहे. शेअर स्वॅपिंग हे या डीलचे सर्वात मोठे कारण असल्याचे मानले जात आहे.

Read More

Consumer Goods Price Hike: रेफ्रिजरेटर, एसीसह पॅकेज्ड फूडच्या किंमती वाढणार; उन्हाळ्यातील शॉपिंग महागणार

यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनरच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. आता उन्हाळ्यात (समर शॉपिंग) करताना ग्राहकांना घामाच्या धारा लागू शकतात. रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरच्या किंमतींमध्ये वाढ होणार असल्याचे ही इलेक्ट्रिक उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे. सोबतच पॅकेज्ड फूड, मद्य आणि आयात केलेल्या तयार कपड्यांच्या किंमतीही वाढतील असे समोर आले आहे.

Read More

Union Cabinet Contract With L&T: 3100 कोटी रुपयांच्या प्रशिक्षण जहाजांसाठी एल अँड टी सोबत करार

Union Cabinet Contract With L&T: केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रोक्योरमेंट (इंडियन-आयडीडीएम) श्रेणी अंतर्गत 3 हजार 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांसाठी (Cships) L&T सोबत करारावर स्वाक्षरी करण्यास मंजुरी दिली आहे. जहाजांची डिलिव्हरी 2026 मध्ये सुरू होणार आहे. हा करार भारतीय-IDDM (स्वदेशी डिझाइन, विकसित आणि उत्पादित) खरेदी श्रेणी अंतर्गत मंजूर करण्यात आला.

Read More

MahaRERA Probe: बांधकाम व्यावसायिकांचा बेकायदेशीर व्यवहार उघड; 1,781 प्रकल्प महारेराच्या रडारवर

राज्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या कारभाराची चौकशी महारेराने (Maharashtra Real Estate Regulatory Authority) सुरू केली होती. यामध्ये अनेक बिल्डर महारेराच्या नियमांचे पालन करत नसून बेकायदेशीर व्यवहार करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. एका बांधकाम प्रकल्पासाठी एकच बँक खाते लिंक करावे, असा महारेराचा नियम आहे. मात्र, राज्यातील 1,781 प्रकल्पांनी या नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.

Read More

Google Investment in India: गुगलने भारतीय स्टार्टअप कंपनी NoBroker मध्ये केली 'इतक्या' कोटींची गुंतवणूक

NoBroker Investment: गुगलने भारतीय स्टार्ट अप कंपनी NoBrokar.com मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे नो ब्रोकर कंपनीमधील 0.5 टक्के हिस्सा Google च्या मालकीचा झाला आहे. या गुंतवणुकीचा नो ब्रोकरला कसा फायदा होईल, हे जाणून घ्या.

Read More

Expensive Cities In World: जगातील महागड्या शहरात मुंबईचा नंबर कितवा? आलिशान घरांच्या किंमतीमध्ये 37 व्या क्रमांकावर

भारताची आर्थिक राजधानी मुंबईतील आलिशान घरांच्या किंमती ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. आलिशान घरांच्या किंमतीमध्ये जगात मुंबईचा क्रमांक 37 वा आहे. तसेच महागड्या शहरांच्या यादीतही मुंबई 18 व्या क्रमांकावर आहे. दिल्ली, बंगळुरु शहरातील आलिशान घरांचे दर किती आहेत, माहिती करुन घ्या. लक्झ्युरियस घरांच्या मागणीत दुबई पहिल्या क्रमांकावर आहे.

Read More