Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TCS CEO Resign: 'टीसीएस'चे सीईओ राजेश गोपीनाथन यांचा तडकाफडकी राजीनामा, कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनात मोठा उलटफेर

TCS CEO Rajesh Gopinathan Resigned

Image Source : www.business-standard.com

TCS CEO Resign: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गोपीनाथन यांनी गुरुवारी 15 मार्च 2023 रोजी राजीनामा दिल्याचे टीसीएसने म्हटले आहे. गोपीनाथन यांच्या जागी के. कृतिवासन यांची नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गोपीनाथन यांनी गुरुवारी 15 मार्च 2023 रोजी राजीनामा दिल्याचे टीसीएसने म्हटले आहे. गोपीनाथन यांच्या जागी के. कृतिवासन यांची नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (TCS CEO Rajesh Gopinathan Resigned With K Krithivasan Set To Take Over) ‘टीसीएस’मध्ये वरिष्ठ व्यवस्थापनात झालेला उलटफेर शेअर्सवर परिणाम करेल, असा अंदाज शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने एन. चंद्रशेखरन यांच्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये राजेश गोपीनाथन यांच्याकडे टीसीएसचे नेतृत्व सोपवले होते. एन. चंद्रशेखरन यांच्या मार्गदर्शनाखाली गोपीनाथन यांनी काम केले होते. गेल्याच वर्षी 2022 मध्ये राजेश गोपीनाथन यांना कंपनीच्या संचालक मंडळाने पाच वर्षांची मुदतवाढ दिली होती. आता अचानक कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजेश गोपीनाथन यांनी राजीनामा दिल्याने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गोपीनाथन यांचा राजीनामा 15 सप्टेंबर 2023 पासून लागू होणार आहे. 

टीसीएस देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. राजेश गोपीनाथन यांच्या राजीनामा का दिला याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, राजीनाम्यानंतर राजेश गोपीनाथन यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचे आभार मानले आहेत. टीसीएसमध्ये 22 वर्षांचा कार्यकाळ उत्साही होता. त्यात मागील 6 वर्ष नेतृत्व करताना टीसीएसने यशाची अनेक शिखरे गाठली. कंपनीचा महसूल 10 बिलियन डॉलर्सने वाढला आणि मार्केटकॅप 70 बिलियन डॉलर्सपर्यंत वाढल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. आपल्या मनात काही नवीन आयडिया आहेत ज्या भविष्यात प्रत्यक्षात उतरवायच्या आहेत, अशी प्रतिक्रिया राजेश गोपीनाथन यांनी दिली.

के. कृतिवासन होणार ‘टीसीएस’चे नवे सीईओ

टीसीएसच्या बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि विमा या व्यवसायचे (BFSI) ग्लोबल हेड असलेले के. कृतिवासन यांची टीसीएसचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कृतिवासन 1989 मध्ये टीसीएसमध्ये रुजू झाले होते. 58 वर्षांचे कृतिवासन यांची 34 वर्षांची सेवा झाली आहे. 16 मार्च 2023 पासून ते सीईओ डेजिगनेट म्हणून असतील. 

राजेश गोपीनाथन यांचे किती होते सॅलरी पॅकेज

देशातील दुसरी मोठी मूल्यावान कंपनी असलेल्या टीसीएसच्या सीईओ पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय राजेश गोपीनाथन यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने कॉर्पोरेटमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. टीसीएसचे एमडी आणि सीईओ म्हणून राजेश गोपीनाथन यांना आर्थिक वर्ष 2022 मध्ये 25.75 कोटी इतके सॅलरी पॅकेज होते. टीसीएसच्या 2021-22 वार्षिक अहवालानुसार गोपीनाथन यांच्या वेतनात 26.6% वाढ झाली होती. भारतातील आयटी कंपन्यांमधले सर्वाधिक वेतन घेणाऱ्या सीईओंमध्ये गोपीनाथन पाचव्या स्थानावर आहेत.