आयटी क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्या TCS आणि Infosys यांच्या तिमाही उत्पन्नाचा अंदाज शेअर मार्केटच्या अंदाजापेक्षा देखील कमी आला आहे. त्यामुळे येत्या चौथ्या तिमाहीत देखील आयटी क्षेत्राची कामगिरी खराब राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी परिस्थिती आणखी एक-दोन तिमाही पर्यंत राहण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा तज्ञ व्यक्त करत आहे. देशातील आघाडीच्या आयची कंपनी TCS आणि Infosys यांच्या तिमाही उत्पन्नाचा आणि कंपनीच्या एकुण कामगिरीचा घेतलेला आढावा हा विचार करायला लावणारा आहे. दोन्ही कंपन्या BFSI आणि आयटी सर्विस आणि यूएस मार्केटमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगून आहे.
नवीन ऑर्डरसाठी 1-2 तिमाही लागतील
2022-23 आर्थिक वर्षाची चौथी तिमाही आयटी कंपन्यांच्या एकुण प्रगतीसाठी संथ असेल. परंतु त्याचा प्रभाव आणि व्याप्ती कंपन्याच्या वैयक्तिक प्रोफाइल आणि धोरणावर अवलंबून असेल. एप्रिल आणि जूनच्या तिमाहीत यूएस मार्केटमधील अनिश्चितता कमी होईल, अशी माहिती उद्योगातील दिग्गज आणि इन्फोसिस टीव्हीचे माजी संचालक मोहनदास पै यांनी दिली. तसेच नवीन ऑर्डर येण्यास एक ते दोन तिमाही आणखी लागतील, त्यानंतरच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना पगार वाढीचे संकेत आणि नवीन कर्मचाऱ्यांना संधी देण्याचा काळ परत सुरु होईल, अशी आशा पै यांनी व्यक्त केली.
भारतीय आयटी उद्योगात प्रचंड ताकत
भारतीय आयटी उद्योग क्षेत्राचे नाव आज जागतिक स्तरावर आहे. भारताजवळ प्रचंड जागतिक तंत्रज्ञान सामर्थ्य आहे. भारतीय आयटी उद्योगाची निर्यात आज 200 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. तसेच, जागतिक बाजारपेठेत टॉप-5 कंपन्या आता मोठी भूमिका बजावतात.
तीन-चार महिने आणखी मंदीचा काळ
मोठ्या आयटी कंपन्यांच्या बाबतीत जो काही आर्थिक कमकुवतपणा आज सुरु आहे, तो काही महिन्यानंतर रुळावर येण्याची शक्यता आहे. तर काही मोठ्या आयटी कंपण्या आपल्या उद्योगाला रिशेड्यूल, न्यू प्लॅन आऊट करण्यासाठी मुद्दाम कर्मचारी कपात करीत आहेत, असे मत जेनपॅक्टचे संस्थापक प्रमोद भसीन म्हणाले.
तर आयटी क्षेत्राचे सर्वात मोठे ग्राहक बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्र आहे. मात्र याच क्षेत्रात मंदी सुरु असल्याने पुढील तीन-चार तिमाहीत वाढ मंदावू शकते, असे मत देखील तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे यावर्षी आयटी कंपण्यांच्या कर्मचाऱ्यांची पगार वाढ होणार नसल्याचे संकेत मिळत आहे.