Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IndiGo Summer Offer: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर इंडिगोची स्पेशल सवलत

IndiGo Offer

IndiGo Offer: इंडिगो एअरलाईन्सने उन्हाळी हंगामातील प्रवासासाठी एक ऑफर आणली आहेत. या ऑफरमध्ये देशांतर्गत व आंतराष्ट्रीय प्रवासाचे तिकीट बुकिंग केल्यास 750 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. प्रवाशांनी कूपन कोडवर तिकीट खरेदी केल्यास ही सवलत मिळणार आहे.

इंडिगो एअरलाईन्सने उन्हाळी हंगामात हवाई प्रवासासाठी एक ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार प्रवाशांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून तिकीट बुकिंग केल्यास त्यांना देशांतर्गत व आंतराष्ट्रीय फ्लाईट्सवर 750 व रिटर्न तिकीटवर 1500 रुपयांची सूट मिळणार आहे. यासाठी बुकिंग करताना  "6ETRAVEL" प्रोमोकोड वापरावा लागेल ही ऑफर 5 ते 15 एप्रिलपर्यंत उपलब्ध असणार आहे.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कंपनीकडून काही अटी लादल्या आहेत. तुम्ही 30 एप्रिल 2023 पर्यंतच्या प्रवासासाठी तिकीट बुक केले तर तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. इंडिगो एअरलाईन्स गेल्या अनेक  वर्षांपासून हवाई प्रवाशांना सवलतीच्या दरात तिकिटे ऑफर करत आहे. उन्हाळ्यातील सुट्ट्यांचा हंगाम पाहून इंडिगोने ही ऑफर आणली आहे.  

ऑफर संदर्भात महच्त्त्वाच्या गोष्टी

  • इंडिगो एअरलाईन्सच्या वेबसाईटवर जाहीर केल्यानुसार, ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. इंडिगोने ठरवल्यास हीऑफर कालावधीपूर्वी रद्द केली जाऊ शकते. 
  • बुकिंगद्वारे मिळणारी सवलत फक्त फ्लाईट तिकिटाच्या मूळ भाड्यावर मिळणार आहे. विमानतळ शुल्क आणि सरकारी करात कोणतीही सूट मिळणार नाही. 
  • इंडिगोच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईटवर प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. 
  • प्रवासी या ऑफरसह इतर कोणतीही ऑफर, कूपन कोड किंवा प्रमोशन कोड यांना सोबत जोडू शकत नाहीत. 
  • इंडिगोच्या ग्रुप फ्लाईट तिकीट बुकिंगवर प्रवाशी या ऑफरचा लाभ घेऊ शकणार नाही. 

GoFirst कडून मोफत तिकीट 

GoFirst एअरलाईनने आपल्या 17 व्या वर्धापनदिनानिमित्त 17 वर्षांच्या प्रवाशांना मोफत विमान तिकिटे दिली जाणार आहेत. ही ऑफर फक्त 4 नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या प्रवासासाठी वैध असणार आहेत. यासाठी 1 डिसेंबर 2022 पर्यंत प्रवाशाचे वय 17 वर्षांपेक्षा जास्त आणि 18 वर्षांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना वैध ओळखपत्र (आधार, पासपोर्ट) सादर करावे लागेल.

Source- www.zeebiz.com