देश आत्मनिर्भर भारताकडे पुढे सरसावत आहे. देशात नवनवीन व्यवसायांची पायाभरणी होऊन उद्योजक वृत्ती वाढत आहे. हे सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक मानले जात आहे. देशात ईलेक्ट्रॉनिक उत्पादने व वाहनांच्या निर्यात व निर्मितीत वाढ झाली असून भविष्यातील काळ हा उद्योग व स्टार्टअप्सच्या दृष्टीने उत्तम असणार आहे. भारतातील वाहन उद्योग सध्या प्रगतीपथावर असून अनेक लोक प्रवासी व व्यावसायिक वाहनांची खरेदी करत आहेत. गेल्या काही महिन्यात झालेली वाहनांची विक्री पाहता हे लक्षात येते.
उद्योगासाठी सरकारची मदत (Government Assistance to Industry)
केंद्र सरकारने तरुण उद्योजकांना व्यवसाय उभारण्यात मदत करण्यासाठी 2015 साली PMMY (प्रधान मंत्री मुद्रा योजना) आणली आहे. यासाठी व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असेलला व्यक्ती कर्ज करून हे कर्ज मिळवू शकतो. गेल्या 8 वर्षात 41 कोटी भारतीयांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सरकारच्या या योजनेमुळे भावी उद्योजकांना भांडवल मिळवणे सोपे झाले आहे.
व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत वाढ (Commercial Vehicle Sale Increase)
वाहन बाजारपेठेत मार्च महिन्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, प्रवासी वाहनांच्या विक्रीत गेल्या वर्षाच्या तुलनेत 26.7% इतकी वाढ झाली आहे. वर्षभरात देशात 38,90,114 हजार प्रवासी वाहनांची विक्री झाली. वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)ने याबाबत माहिती देताना सांगितले की, गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रवासी वाहनांची विक्री 30,69,499 युनिट्स होती. त्यात यावर्षी 8 लाखांनी वाढ झाल्याचे दिसून येते.
व्यवसायासाठी ईव्ही वाहन खरेदी करण्यास पसंती (EV Car on Demand)
ईव्ही उत्पादनांच्या खरेदीवर सरकारने सबसिडी जाहीर केल्यानंतर व्यावसायिक दृष्टीने इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास अनेक जण पसंती दर्शवत आहेत. यामुळे भारत हा जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक ईव्ही वाहनांची विक्री करणारा देश झाला आहे. सरकारने जागोजागी चार्जिंग स्टेशन व सुविधा उपलब्ध करून दिल्यास या वाहन खरेदीस आणखी प्रोत्साहन मिळेल.