Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Apple Layoffs : अ‍ॅपलमधून कोणालाही गमवावी लागणार नाही नोकरी, काय म्हणाले टीम कुक?

Apple Layoffs : विविध कंपन्यांमधून नोकरकपात होत असताना अ‍ॅपलमधून मात्र दिलासादायक बातमी समोर आलीय. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी नोकरकपातीसंदर्भात एक वक्तव्य केलं असून यामुळे अनेकांना विशेषत: अ‍ॅपलमधल्या कर्मचाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

Read More

AC and Cooler Business: ऐन उन्हाळ्यात एसी,कुलरच्या मागणीत घट! काय आहेत कारणे,जाणून घ्या

एप्रिल महिन्याच्या मध्यानंतर महाराष्ट्रासह अनेक भागांत अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी तर गारपीट देखील झाली आहे. याचा थेट परिणाम एयर कंडीशनर, फ्रीज आणि कुलरच्या विक्रीवर बघायला मिळतो आहे.मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये काही कंपन्यांची विक्री 15% पर्यंत कमी झाली आहे...

Read More

Union Bank Q4 results: युनियन बँकेच्या नफ्यात 93% वाढ; भागधारकांना लाभांशही जाहीर

युनियन बँकेने चौथ्या तिमाहीत चांगला नफा कमावला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत बँकेच्या निव्वळ नफ्यात 93.27% वाढ झाली आहे. रिटेल, शेती आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांमधील बँकेचा व्यवसाय वाढला आहे. बँकेचे अनुत्पादित कर्जही कमी झाले. तर प्रति शेअर 3 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

Read More

Coca-Cola Plant Closed: कोकाकोलाचा प्लांट तडकाफडकी बंद; शीतपेय निर्मिती करताना नियमांचे उल्लंघन?

कोकाकोला कंपनीच्या शीतपेयांना भारतात मोठी मागणी आहे. थम्सअप, कोकाकोला, स्प्राइटसह इतरही अनेक उत्पादने प्रसिद्ध आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील कोकाकोला कंपनीचा एक निर्मिती प्रकल्प तडकाफडकी बंद करण्यात आला आहे. कंत्राटी पद्धतीने या प्रकल्पात उत्पादन घेतले जाते. मात्र, नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा प्रकल्प तात्पुरता बंद केला आहे.

Read More

Indian Railway's new initiative : भारतीय रेल्वेचा नवा उपक्रम, चालत्या ट्रेनमध्ये कॅमेरे ठेवणार लक्ष!

Indian Railway's new initiative : भारतीय रेल्वेतर्फे आता चालत्या ट्रेनमध्ये कॅमेऱ्याची प्रणाली सुरू केली जाणार आहे. हिंसक कृती तसंच गैरमार्गाच्या प्रकारांना रोखण्यासाठी विविध उपक्रम रेल्वेतर्फे राबवण्यात येतात. त्यातलाच हा एक उपक्रम असून तो लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Read More

Mutual Fund Investors: म्युच्युअल फंडात 96 हजार कोटी तरुणांचे; वाचा कोणत्या योजनांना सर्वाधिक पसंती

मागील काही वर्षात म्युच्युअल फंडमधील तरुणांची गुंतवणूक वाढली आहे. मिलेनियल्स म्युच्युअल फंडमधल्या नक्की कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात हे एका अहवालातून समोर आले आहे. मागील पाच वर्षांचा विचार करता पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांपैकी 54% गुंतवणूकदार हे मिलेनियल्स श्रेणीतील आहेत. सेक्टोरल फंडालाही सर्वाधिक पसंती मिळत आहे. वाचा यंग जनरेशन सर्वाधिक कोठे गुंतवणूक करते.

Read More

India forex reserve: भारताच्या परदेशी चलनाच्या गंगाजळीत वाढ, पहिल्या 5 देशांच्या यादीत समावेश

RBI च्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2021 मध्ये देशाचा परकीय चलन साठा 645 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. आताचा आपला परकीय चलन साठा 57 अब्ज डॉलरने कमी आहे. असे असले तरी जागतिक पातळीवर अन्य देशांपेक्षा हा चलन साठा अधिकच आहे.

Read More

Paytm profit : यूपीआय पेमेंट अ‍ॅप पेटीएमची भरारी, 52 टक्क्यांनी वाढलं उत्पन्न

Paytm profit : यूपीआय पेमेंट अ‍ॅप पेटीएमला अच्छे दिन आलेत. पेटीएमचा नफा अनेकपटीनं वाढला आहे. एकीकडे उत्पन्न वाढलं आहे. जवळपास 52 टक्क्यांनी महसुलात वाढ नोंदवण्यात आलीय. तर दुसरीकडे तोट्यातदेखील कमालीची घट झालेली पाहायला मिळत आहे.

Read More

Amazon Great Summer Sale 2023: फक्त 10 हजारांच्या रेंजमध्ये 'हे' 5 बेस्ट स्मार्टफोन खरेदीची संधी, जाणून घ्या डिटेल्स

Amazon Great Summer Sale 2023: तुम्हीही कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अमेझॉन ग्रेट समर सेल तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते. या सेलमध्ये तुम्हाला 10 हजारापेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत. कोणते आहेत ते स्मार्टफोन, जाणून घेऊयात.

Read More

The Kerala Story Box Office Collection : 'द केरला स्टोरी' विशेष चर्चेत; पहिल्याच दिवशी कमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

The Kerala Story Box Office Collection : सत्य घटनेवर आधारित असलेला आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेला 'द केरला स्टोरी' हा चित्रपट सिनेमागृहात शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची पहिल्या दिवशीची बॉक्स ऑफिसवरील कमाई जाणून घेऊयात.

Read More

Samsung Fab Grab Fest 2023 : कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करा कोणतीही वस्तू, मिळेल भरघोस डिस्काउंट

Samsung Fab Grab Fest 2023 : सॅमसंग कंपनीने खास आपल्या ग्राहकांसाठी सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट 2023 कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सुरु केला आहे. या सेलच्या माध्यमातून ग्राहक त्यांना आवडणाऱ्या उत्पादनांची थेट खरेदी करू शकतील आणि बंपर डिस्काउंट मिळवू शकतील. कंपनी कोणत्या उत्पादनांवर किती डिस्काउंट देत आहे, जाणून घेऊयात.

Read More

Corporate Bond: कॉर्पोरेट बाँडची संख्या रोडावली; कंपन्यांकडून निधी उभारणी संथ गतीने सुरू

कॉर्पोरेट कंपन्यांनी एप्रिल महिन्यात रोख्यांद्वारे (बाँड्स) कमी निधी गोळा केला. मार्च महिन्यामध्ये कॉर्पोरेट बाँड इश्यू करण्याचे प्रमाण तुलनेने जास्त होते. कंपन्यांना निधीची गरज कमी भासल्यामुळे बाँड इश्यू करण्याचे प्रमाण घटले, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. मागील काही दिवसांपासून आरबीआयने व्याजदरात मोठी वाढ केली आहे, त्यामुळे बाँडमधून मिळणारा परतावाही कमी झाला आहे.

Read More