Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Global Job Market: ‘या’ क्षेत्रात वाढणार रोजगाराच्या संधी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सर्वेक्षण

The Future of Jobs Report 2023 मध्ये जगभरातील 800 पेक्षा अधिक कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कंपन्यांचे मालक, कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा अहवाल बनवला गेलाय. अहवालानुसार येत्या 5 वर्षात 69 दशलक्ष नवे रोजगार निर्माण होतील तर 83 दशलक्ष रोजगार कमी होतील असे म्हटले आहे. जाणून घ्या येत्या काळात कुठल्या क्षेत्रात रोजगार निर्मिती अधिक होणार आहे...

Read More

Tax Policy for online gaming : गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन गेमिंगवर कर?

Tax Policy for online gaming : जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन गेमिंगवर कर आकारला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंबंधीची माहिती दिलीय. ऑनलाइन गेमिंगसाठी कर आकारणी धोरणावर चर्चा केली जात असल्याचं त्या म्हणाल्या.

Read More

Cognizant साडेतीन हजार कर्मचारी कपात करणार; कार्यालये बंद करून खर्च कमी करण्याची वेळ

cognizant layoffs: कॉग्निझंट ही अमेरिकास्थित माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. मात्र, त्यांचे सर्वाधिक कामकाज भारतातून चालते. सध्या अमेरिकेत मंदीसदृश्य परिस्थिती असल्याने कंपनीकडील कामाचा ओघ कमी झाला आहे. कर्मचारी कपातीबरोबरच कार्यालये बंद करण्याचा निर्णयही कंपनीने घेतला आहे. 80 हजार कर्मचारी बसू शकतील एवढ्या जागेवरच्या कार्यालयातील कामकाज बंद करणार आहे.

Read More

Media and Entertainment Industry:डिजिटल इंडियाला चालना, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राने ओलांडला 2 लाख कोटींचा टप्पा

Media and Entertainment Industry: जागतिक पातळीवर भारत झपाट्याने मिडीया अ‍ॅंड एंटरटेंन्मेंट इंडस्ट्रीजची मोठी बाजारपेठ म्हणून विकसित होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतीयांकडून सर्व प्रकारच्या कॉंटेटची मागणी वाढत आहे. यामुळे कोरोना संकटातून झपाट्याने सावरणारे क्षेत्र म्हणून मिडिया अ‍ॅंड एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीकडे बघितले जाते,

Read More

MSRTC Travel Scheme: आपल्या 'लाल परी'ची ही भन्नाट ऑफर तुम्हाला माहित आहे का?

MSRTC Travel Scheme: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation-MSRTC) म्हणजेच एसटी महामंडळ राज्यातील प्रवाशांसाठी 'आवडेल तिथे प्रवास' ही भन्नाट योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत तुम्ही राज्याबाहेरही स्वस्तात प्रवास करू शकता.

Read More

PPF Scheme: मुलांच्या उच्च शिक्षणासाठी महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक, 15 वर्षानंतर मिळेल 40 लाखांहून अधिक रक्कम

PPF Scheme: तुम्हाला देखील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी एक मोठा फंड तयार करायचा आहे का? जर उत्तर हो असेल, तर तुम्ही सरकारच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये (PPF) गुंतवणूक करू शकता. या योजनेत 15 वर्ष सलग गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 40 लाखाहून अधिक परतावा मिळेल. मात्र त्यासाठी मासिक स्वरूपात किती गुंतवणूक करावी लागेल, याचे गणित समजून घ्या.

Read More

Yes Bank लवकरच 'ग्लोबल कलेक्शन सर्व्हिस' सुरू करणार, 'या' खातेधारकांना होणार फायदा

Yes Bank New Payment Collection Service : देशातील खासगी क्षेत्रातील येस बँक लवकरच आपल्या एक्सपोर्ट ग्राहकांसाठी एक खास पेमेंट कलेक्शन सेवा (Payment Collection Service) सुरु करणार आहे. या सेवेचे नाव 'ग्लोबल कलेक्शन सर्व्हिस' (Global Collection Service) असे ठेवण्यात आले आहे. यामुळे एक्सपोर्टधारकांना परदेशी चलन सहज स्वीकारणे आणि त्याला भारतीय रुपयात बदलणे शक्य होणार आहे.

Read More

Ajay Banga : जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी अजय बंगा यांची निवड; 2 जूनपासून कार्यभार सांभाळणार

Ajay Banga: जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंगा यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पदावर भारतीय वंशाची व्यक्ती पदभार सांभाळण्याची ही पहिलीच वेळ आहे. येत्या 2 जून 2023पासून ते कार्यभार स्वीकारतील.

Read More

Bank News : आठवड्यात केवळ 5 दिवस चालू असणार बँकेचे कामकाज!

Bank Open Only 5 Days : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना रविवार वगळता दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. मात्र आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळू शकते. ती म्हणजे सरकारी बँकांना लवकरच आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. आणि या प्रस्तावाला वित्त मंत्रालयाची लवकरच मंजुरी मिळू शकते.

Read More

US Fed Rate Hike: युएस फेडरल बँक पुन्हा दरवाढ करणार? भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल

भारतीय वेळेनुसार आज (बुधवार) रात्री 11 वाजता अमेरिकेची फेडरल बँक व्याजदर वाढ करणार की नाही हे स्पष्ट होईल. 25 बेसिस पॉइंट व्याजदर वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकेची फेडरल बँक महागाई रोखण्यासाठी सलग 14 महिन्यांपासून दरवाढ करत आहे. आज जर पुन्हा दरवाढ झाली तर 2007 च्या मंदीनंतरची ही सर्वात मोठी व्याजदरवाढ असेल.

Read More

Cotton Rate in India: भारतात कापसाची आवक वाढली; दर वाढणार की घटणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Cotton Rate in India: आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या (ICAC) म्हणण्यानुसार देशातील शेतकऱ्यांनी कापसाला जास्त दर मिळावा यासाठी कापसाचा पुरवठा कमी प्रमाणात करायला सुरुवात केली. परिणामी बाजारपेठेत कापसाचे दर वाढले. डिसेंबर महिन्यात कापसाच्या दरात आणखी वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला. ज्यामुळे सध्या कापसाचे दर घटण्याचे संकेत देण्यात येत आहेत.

Read More

Manappuram Finance ED raid: मणप्पुरम फायनान्सच्या कार्यालयावर ED ची रेड! ठेवीदारांकडून पैसे घेताना नियमांचे उल्लंघन

Manappuram Finance ED raid: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप कंपनीवर आहे. RBI ची नियमावली डावलून मणप्पुरम फायनान्ससने 150 कोटींच्या ठेवी नागरिकांकडून गोळा केल्याचा आरोप आहे. केरळमधील चार कार्यालयांवर इडीने छापा मारला. KYC नियमांचे उल्लंघन करुन रोखीने व्यवहार केल्याचा आरोपही कंपनीवर आहे. कार्यालयांवरील छाप्याची माहिती पसरताच कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांनी कोसळले.

Read More