Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Investors: म्युच्युअल फंडात 96 हजार कोटी तरुणांचे; वाचा कोणत्या योजनांना सर्वाधिक पसंती

Mutual Fund Investors

मागील काही वर्षात म्युच्युअल फंडमधील तरुणांची गुंतवणूक वाढली आहे. मिलेनियल्स म्युच्युअल फंडमधल्या नक्की कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात हे एका अहवालातून समोर आले आहे. मागील पाच वर्षांचा विचार करता पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांपैकी 54% गुंतवणूकदार हे मिलेनियल्स श्रेणीतील आहेत. सेक्टोरल फंडालाही सर्वाधिक पसंती मिळत आहे. वाचा यंग जनरेशन सर्वाधिक कोठे गुंतवणूक करते.

Mutual Fund Investors: म्युच्युअल फंड योजनांमध्ये भारतीयांची गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. इक्विटी, डेट, हायब्रिड आणि इतरही अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास यंग जनरेश आघाडीवर आहे. जनरेशन, Y, Z मिलेनियल्स अशी तरुण पिढ्यांना दिलेली नावं तुम्ही ऐकली असतील. यातील मिलेनियल्स म्हणजेच 1980 ते 1995 सालादरम्यान जन्म झालेल्या मुला-मुलींची म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक तब्बल 54% आहे. गुंतवणुकीची एकूण रक्कम 96 हजार कोटींच्या जवळपास आहे.

तरुण सर्वाधिक गुंतवणूक कशात करतात?

मिलेनियल्सला Y जनरेशन असेही संबोधले जाते. या जनरेशनमध्ये जन्मलेल्या मुला-मुलींचे विचार, वागणूक, करियर गोल्स, अपेक्षा या थोड्याबहूत प्रमाणात समान असतात. Y जनरेशनमध्ये जन्मलेली पिढी आता तीस-पस्तीस वयाच्या दरम्यान आहे. शिक्षण पूर्ण होऊन नोकरी व्यवसायात व्यग्र झालेल्या या जनरेशनकडून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जात आहे. जेन Z म्हणजेच 1995 सालानंतर जन्मलेल्या मुला-मुलींचीही भांडवली बाजारातील गुंतवणूक वाढत आहे. येत्या काही वर्षात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

investors-in-mutual-funds-first.jpg

मागील पाच वर्षात सर्वप्रथमच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त गुंतवणूकदार हे मिलेनियल्स कॅटेगरीतील आहेत. Computer Age Management Services या संस्थेने भारतीयांच्या गुंतवणुकीबाबत एक अहवाल सादर केला आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. 2019 ते 2023 या कालावधीत गुंतवणूक केलेल्या 1.6 कोटी गुंतवणूकदारांपैकी 85 लाख गुंतवणूकदार हे मिलेनियल्स आहेत. मागील पाच वर्षात या गुंतवणूकदारांनी 96 हजार कोटी बाजारात गुंतवले आहेत.

147-lakh-investors-in-fy23.jpg

सेक्टोरल( विभागानुसार)फंडात सर्वाधिक गुंतवणूक

सेक्टोरल फंडात तरुणांनी मागील काही वर्षात सर्वाधिक गुंतवणूक केल्याचे अहवालातून दिसून आले आहे. सेक्टोरल फंड म्हणजे असे फंड जे ठराविक क्षेत्रातील कंपन्यांमध्येच गुंतवणूक करतात. उदाहरणार्थ, माहिती तंत्रज्ञान, फार्मा, मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग या क्षेत्रातील कंपन्यांमधील गुंतवणूक. आर्थिक वर्ष 2023 मध्ये 90 टक्के मिलेनियल्सने गुंतवणूक सेक्टोरल फंडात केली. FY19-FY23 या पाच वर्षांचा विचार करता 21% मिलेनियल्सनी सेक्टोरल फंडमध्ये गुंतवणूक केली.

म्युच्युअल फंडमध्ये एकरकमी (lump sum) गुंतवणूक किती जणांनी केली?

FY19-FY23 या कालावधीत गुंतवणूक केलेल्या एकूण 84 लाख मिलेनियल्सपैकी 25 टक्के तरुणांनी एकरकमी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली. इतरांनी सिस्टॅमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक केली. 2021 आर्थिक वर्षात 44 टक्के तरुण गुंतवणुकदारांनी एकरकमी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली. 2022 मध्ये ही टक्केवारी 35% आणि FY23 मध्ये 28 टक्क्यांपर्यंत खाली आली. यातून असे दिसते की, एकरकमी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण घटले आहे.